Potato For Cleaning  esakal
लाइफस्टाइल

Potato For Cleaning : चांदीच पैजण, काचेचे ग्लास अन् बरंच काही! बटाटा करेल काळपटपणाची सुट्टी!

चेहराच नाहीतर दागिनेही चमकवतो बटाटा

Pooja Karande-Kadam

 Potato For Cleaning : घरातील गृहिणींसाठी हक्काची फळभाजी म्हणजे बटाटा. काहीच भाजी नसली तर बटाटा कामी येतो. केवळ जेवणच नाही. तर, बटाटा आपल्या चाट पदार्थांचाही चव वाढवतो.

स्टीम बटाटा, बटाटा पुरी, पराठा असे बटाट्याचे अनेक फायदे आपल्याला माहिती आहेत. पण, आपल्याला माहित आहे का की बटाटा स्वच्छतेसाठी देखील वापरली जाऊ शकते? बटाट्याचा वापर फक्त खाण्यासाठीच नाही तर साफसफाईतही होऊ शकतो, तुम्ही घरातील या गोष्टी उजळवू शकता.

ज्या प्रकारे बटाट्यामुळे स्वयंपाकाची चव वाढते, त्याच प्रमाणे यातील पोषण तत्त्वांमुळे त्वचेचा रंग देखील उजळण्यात मदत मिळते. तुमच्या त्वचेवर डाग, घरातील फरशीवरील डाग, काचेचे पडलेले तुकडे स्वच्छ करणे अशी सगळी कामं एक बटाटा करतो.

त्वचेच्या समस्या निर्माण झाल्या असल्यास उपाय म्हणून कच्च्या बटाट्याचा उपयोग करावा. नियमित हा उपाय केल्यास तुम्हाला आपल्या त्वचेमध्ये एका आठवड्यातच सकारात्मक बदल पाहायला मिळतील.

बटाट्याला भाज्यांचा राजा म्हटले जात नाही, ते कोणत्याही भाजीत मिसळून शिजवता येते, पण बटाट्याचा वापर स्वच्छतेसाठीही केला जाऊ शकतो हे तुम्हाला माहिती आहे का? जाणून घेऊया या सामान्य भाजीच्या मदतीने आपण घरातील कोणत्या गोष्टी स्वच्छ करू शकतो.

चांदीचे दागिने

दागिने हे नेहमी चमकणारे असावेत. त्याच्यावर काळपटपणा आला की ते शोभून दिसत नाहीत. अनेक दिवस घातल्यानंतर पैजण, चांदीचे ब्रेसलेट असे दागिने काळे पडतात.  ज्यामुळे तुम्ही ते लग्न समारंभात घालू शकत नाही. त्याची चमक परत आणायची असेल तर बटाटा बारीक चिरून पाण्यात उकळून घ्यावा. आता चांदीचे दागिने त्यात सुमारे तासभर बुडवून ठेवा आणि शेवटी ब्रशच्या साहाय्याने स्वच्छ करा.

चाकू स्वच्छ करतो

चाकूला अनेकदा गंज येतो, ज्यामुळे त्याची धार कमकुवत होऊ लागते आणि चमकही नाहीशी होते. त्यासाठी चाकूवर डिशवॉशर लिक्विड आणि बेकिंग पावडर लावा. शेवटी गंजलेल्या भागावर चाकू चोळून स्वच्छ पाण्याने धुवा, इच्छित परिणाम मिळेल.

चष्मा स्वच्छ होतो

अनेकदा मास्कसह चष्मा घातल्यावर आतील काचेत धुके जमा होते, त्यामुळे ते नीट दिसत नाही. ही समस्या टाळायची असेल तर काचेत चिरलेले बटाटे आतून चोळा. त्यामुळे तेथे धुके निर्माण होणार नाही.

पिंपल्स घालवतो

चेहऱ्यावर पिंपल्समुळे काळे डाग दिसू लागतात. अशा वेळी बटाट्याची साल काढून किसून घ्या. आता हे बटाट्याचे तुकडे चेहऱ्यावर चोळा, सुमारे आठवडाभर ही प्रक्रिया पुन्हा करा, तर गडद डाग निघून जातील.

काचेचे तुकडे उचलतो

अनेकदा पाण्याचा ग्लास किंवा ग्लास पडून तुटतो आणि त्याचे तुकडे जमिनीवर विखुरले जातात, तर त्याचे बारीक कण स्वच्छ करणे फार अवघड असते. जर एक तुकडाही शिल्लक राहिला तर तो पायाला इजा पोहोचवू शकतो. अशावेळी बटाटा मधला कापून काचेचे तुकडे बटाट्यावर जमिनीवर चिकटवावेत.

 

काळवंटलेली मान

नितळ व सुंदर त्वचा मिळवण्यासाठी सर्व प्रथम एक छोटा कच्चा बटाटा घ्या आणि स्वच्छ धुऊन त्याची साल काढा. यानंतर बटाटा किसून घ्या. बटाटा किसताना त्याचा रस देखील निघेल, तो फेकू नका. बटाट्याच्या रसामध्ये अर्धा चमचा गुलाब पाणी मिक्स करा आणि बाजूला ठेवून द्या. आता आपला चेहरा पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

SCROLL FOR NEXT