Prajakta Mali Birthday esakal
लाइफस्टाइल

Prajakta Mali Birthday : चाहत्यांची लाडकी प्राजू स्वत:ला एवढं फिट कसं ठेवते? वाचा तिचं फिटनेस सिक्रेट

साक्षी राऊत

Prajakta Mali Birthday : मराठी इंडस्ट्रीत दमदार व्यक्तिमत्व आणि लोकप्रिय कलाकार अशी प्राजक्ता माळीची ओळख आहे. आज प्राजक्ता माळीचा वाढदिवस. प्राजक्ता माळीने अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये आणि मालिकांमध्ये तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

अभिनेत्री प्राजक्ता माळी ही तिच्या अभिनयासाठी खास ओळखली जाते. तसेच तिचे मराठमोळ्या पोषाखातील लुक्ससुद्धा सोशल मीडियावर फार चर्चेत असतात. प्राजक्ताचा फिटनेस रूटीनदेखील सोशल मीडियावर चर्चेत असतो. ती अनेकदा चाहत्यांना फिटनेसच्या स्मार्ट टिप्स देत असते.

चला तर आज आपण प्राजक्ताच्या फिटनेस, योगा आणि डाएटबाबत थोडक्यात जाणून घेऊया.

प्राजक्ताने असा मेंटेन केला फिटनेस

'प्राजक्ताने जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेत काम केले होते, या मालिकेमुळे तिला खरी ओळख मिळाली होती. या मालिकेत तिने प्रमुख नायिकेची भूमिका पहिल्यांदाच साकारली होती. तिच्यासोबत अभिनेता ललित प्रभाकर हा प्रमुख नायकाच्या भूमिकेत होता.

या मालिकेनंतर प्राजक्ताने तिच्या फिटनेसवर जास्त लक्ष केंद्रित केले. वजन कमी करण्याबरोबरच प्राजक्ताने तिचे डेली रूटीन ठरवून घेतले होते. फिटनेससाठी तिने डाएटविषयीची अनेक महत्वाची पुस्तके वाचली होती.

ही पुस्तके वाचून ती योगासाठी प्रोत्साहित झाली होती. तिने व्यायामाची पारंपारिक शैली आत्मसात करण्यात सुरुवात केली.

अष्टांग योगा

प्राजक्ता आहार आणि योगा दोन्ही गोष्टींना समान महत्व देते. एका मुलाखतीमध्ये बोलताना प्राजक्ताने सांगितले होते की, अष्टांग योगा केल्याने चेहर्‍याची स्किन, शरीर फिट ठेवणे, मनाला आणि शरीराला अंतर्बाह्य संतुलित करणे हे सगळं साध्य केलं जाऊ शकतं. अष्टांग योगा हा शरीरातल्या सगळ्या अवयवांना योग्य वळण देणारा एक चांगला व्यायामप्रकार आहे. प्राजक्ताने तिचे काही योगा व्हिडिओसुद्धा सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

प्राजक्ताचा डाएट

प्राजक्ताच्या डाएटमध्ये सकस अन्नाचा समावेश आहे. व्यायामाबरोबरच आहार देखील तितकाच महत्वाचा आहे असं प्राजक्ता सांगते. व्यायाम आणि आहार व्यवस्थित असेल तर आरोग्य निरोगी राहते. तसेच आपली त्वचा आणि केसदेखील चांगले राहतात असे प्राजक्ता म्हणते.

प्राजक्ताचा डाएट रूटीन

प्राजक्ता सकाळी उठल्यावर २-३ ग्लास गरम पाणी पिते. त्यानंतर ती एक फळ खाते. आणि त्यानंतर २ तासांनी भरपूर नाश्ता करते.

दुपारचे जेवण

तिच्या दुपारच्या जेवणामध्ये, एक ते दीड चपाती, हिरवी पालेभाजी, वरण किंवा कडधान्ये यांचा समावेश असतो. असा सकस आहार असलेले जेवण खायला तिला खूप आवडते. (Lifestyle)

संध्याकाळचा चहा

प्राजक्ताला चहा प्रचंड आवडतो. ती चहामध्ये साखरेऐवजी गूळ घालते.

रात्रीचे जेवण

संध्याकाळचा चहा प्यायल्यानंतर प्राजक्ता साधारण ८-८.३० च्या दरम्यान जेवण करते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet katke IT Raid : महाराष्ट्र केसरी अभिजित कटके याच्या घरी आयकर विभागाची छापेमारी!

त्या रात्री नेमकं काय घडलं ? सलमानच्या गाजलेल्या काळवीट शिकार प्रकरणाची जाणून घ्या पूर्ण स्टोरी

Latest Maharashtra News Updates :30 विमानांना पुन्हा बॉम्बची धमकी, इंडिगो, विस्तारा आणि एअर इंडियाला अलर्ट

Nashik West Vidhan Sabha Election 2024 : सीमा हिरे विरोधकांची अपूर्व हिरेंना गळ; तूर्तास ‘वेट ॲन्ड वॉच’चा सल्ला

Eknath Shinde: या तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल करणार अर्ज, ठाण्यात भव्य शक्तीप्रदर्शन

SCROLL FOR NEXT