innova high cross sakal
लाइफस्टाइल

झूम : इनोव्हा हायक्रॉस : प्रशस्त, अधिक आरामशीर

टोयोटाच्या इनोव्हा ‘हायक्रॉस’ हायब्रीड या नव्या रूपातील एमपीव्ही (मल्टीपर्पज व्हेईकल) श्रेणीतील कारची सर्व प्रकारच्या रस्त्यांवर सुमारे ६०० किलोमीटरची राईड केली.

प्रणीत पवार

टोयोटाच्या इनोव्हा ‘हायक्रॉस’ हायब्रीड या नव्या रूपातील एमपीव्ही (मल्टीपर्पज व्हेईकल) श्रेणीतील कारची सर्व प्रकारच्या रस्त्यांवर सुमारे ६०० किलोमीटरची राईड केली. सुरुवातीची इनोव्हा, इनोव्हा क्रिस्टापेक्षा हायक्रॉसचा ड्रायव्हिंग एक्सपिरिअन्स खूपच वेगळा आणि चांगला होता. बॉक्सी लूक असलेली इनोव्हा हायक्रॉस बाह्यबाजूने तितकी आकर्षक वाटत नसली तरी आतमध्ये तितकीच लक्झरियस आणि प्रशस्त आहे.

इनोव्हा हायक्रॉस पेट्रोल आणि पेट्रोल+हायब्रीड या इंजिन प्रकारात येते. डिझेल इंजिनचा पर्याय अद्याप देण्यात आलेला नाही. २.० लिटर ‘टीएनजीए’ अर्थात ‘टोयोटा न्यू ग्लोबल आर्किटेक्चर’वर आधारित पेट्रोल इंजिनमध्ये ‘जी-एसएलएफ’ आणि ‘जी-एक्स’ असे दोन व्हेरिएंट्स, ७-८ सीट्सचे पर्याय येतात.

आधुनिक सेल्फ चार्जिंगचे तंत्र असलेल्या पेट्रोल+हायब्रीड इंजिनमध्ये ‘व्हीएक्स’, ‘व्हीएक्स (ओ)’, ‘झेडएक्स’, ‘झेडएक्स (ओ)’ असे व्हेरिएंट्स ७-८ सीट्सच्या पर्यायात येतात. चारही व्हेरिएंट्समध्ये १९८७ सीसी क्षमतेचे इंजिन दिले आहे. पेट्रोल इंजिन १७३ एचपी पॉवर, २०९ एनएम टॉर्क; तर पेट्रोल+हायब्रीड इंजिन १८३ एचपी पॉवर, १८७ एनएम टॉर्क जनरेट करते.

हायक्रॉसच्या पेट्रोल+हायब्रीड इंजिनच्या ‘झेडएक्स’ व्हेरिएंटच्या राईडची संधी मिळाली. सात आसनक्षमता असलेल्या या व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत २९ लाख ३५ हजार इतकी आहे. इनोव्हा हायक्रॉस ‘हाय’ सेफ्टी, परफॉर्मन्स, कम्फर्ट या टॅगलाईनसह बाजारात दाखल करण्यात आली. त्यामुळे आधुनिक सुरक्षेचे सर्व फीचर्स, पूर्वीपेक्षा अधिक स्मूथ ऑन रोड परफॉर्मन्स आणि वर उल्लेख केल्याप्रमाणे अधिक प्रशस्त इंटिरिअर, आरामदायी आसनव्यवस्था ज्यामुळे जवळचा असो, की दूरवरचा कोणताही प्रवास सुखद अनुभूती देतो.

इनोव्हा क्रिस्टा आणि हायक्रॉस हायब्रीडची सर्वच बाबतीत तुलना केल्यास हायक्रॉसच्या रायडिंग क्वालिटीत बरीच सुधारणा झाल्याचे लक्षात येते. ड्रायव्हर सीटपासून सुरुवात केल्यास दृष्यमानता सर्व बाजूने पुरेशी आहे. समोरील पिलर्स रुंद असले, तरी ग्लास एरिया अधिक असल्याने त्यांचा अडथळा जाणवत नाही.

ड्रायव्हर सीट्स हवे तसे ॲडजस्ट करता येत असल्याने उंची आणि दृश्यमानतेचा प्रश्न येत नाही. ड्रायव्हर, सहप्रवाशाला व्हेंटिलेटेड सीट्स, दुसऱ्या रांगेत लाँग स्लाईड सीट्स दिले आहेत. त्यामुळे एखाद्या थिएटरमध्ये बसल्याचा फील येतो. इनोव्हामध्ये पहिल्यांदाच पॅनोरमिक सनरूफ आणि मून लायटिंग दिल्याने प्रवास आणखी सुखद होतो.

बऱ्याच एमपीव्हींमध्ये तिसऱ्या रांगेत बसण्यास अडचण येत असल्याचे जाणवले; परंतु हायक्रॉसमध्ये ही समस्या येत नाही. उंच व्यक्तीसही पाय पसरून बसण्यास (लेग रूम) पुरेशी जागा मिळते; परंतु मागील भाग तुलनेने वर असल्याने पायाखाली टेकू ज्याला ‘अंडर थाय सपोर्ट’ म्हणतो तो तितका मिळत नाही. इनोव्हा हायक्रॉसला प्रशस्त याचसाठी म्हटले, की तिसऱ्या रांगेतही प्रौढ व्यक्ती आरामात बसू शकतो.

रायडिंग क्वालिटी

इनोव्हा हायक्रॉसमध्ये इलेक्ट्रिक मोटर आणि पेट्रोल इंजिनचे चांगले ट्युनिंग केल्याने कार चालवताना मिळणारी पॉवर अधिक आनंद देते. आकारमान मोठे असले, तरी उत्तम ब्रेकिंगमुळे तात्काळ नियंत्रित होते. कमी वेगात क्रिस्टाच्या तुलनेच हायक्रॉसची स्टेअरिंग हाताळणी अधिक हलकी करण्यात आली आहे.

हायक्रॉसला पुढे मॅकफेर्सन स्ट्रट; तर पाठिमागे सेमिइंडिपेंडंट टॉर्शन बिम सस्पेन्शन दिले आहेत. तसेच मोनोकॉक फ्रेममुळे खड्ड्यामधून गेल्यावर तितकेसे धक्के जाणवत नाहीत. अतिवेगातही तीव्र वळणाच्या रस्त्यावर कलंडत नाही.

मायलेज किती?

हायब्रीड इंजिनमुळे ‘कॅमरी’प्रमाणेच ‘हायक्रॉस’ही इलेक्ट्रिक मोटरद्वारे सुरू होते, त्यामुळे इनोव्हाचा टिपिकल इंजिन ‘स्टार्ट नॉईज’ आपण येथे मिस करतो. कमी आरपीएमला हायक्रॉस इलेक्ट्रिक मोटरवरच चालते, तर आरपीएम जसजसे वाढवू, तसे इलेक्ट्रिक+पेट्रोल किंवा पूर्णत: पेट्रोलवर ती धावते. प्रत्यक्ष रस्त्यावर हायब्रीड तंत्र व्यवस्थित लक्षात आल्यास मायलेज अधिक मिळवता येऊ शकते. ६०० किलोमीटरच्या राईडनंतर हायक्रॉसने सरासरी १४ ते १५ चे मायलेज दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP Manoj Kayande Won Sindkhed Raja Election 2024 final result live : 'सिंदखेड राजा'त मनोज कायंदे ठरले 'राजा'? शिंगणेंचा पराभव

Raj Thackeray reaction : अविश्वसनीय ! तूर्तास एवढेच...! निकालानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मोजक्या शब्दात प्रतिक्रिया

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: वांद्रे पूर्वमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वरुण सरदेसाई विजयी

Amgaon Assembly Election Results 2024 : आमगाव मतदारसंघात भाजपने गड राखला! संजय पुरम 110123 बहुमताने विजयी

Samadhan Awatade won Pandharpur Assembly Election: आघाडीमध्ये बिघाडी!समाधान आवताडे यांनी पंढरपूर विधानसभा मतदारसंघामधून सलग दुसऱ्यांदा मारली बाजी

SCROLL FOR NEXT