Bike Sakal
लाइफस्टाइल

झूम : मोटारसायकलचाही दिवस असतो खास!

जगभरात अनेक हौशी मोटारसायकलस्वार आहेत, जे सामाजिक उद्देशाने मोटारसायकल चालवून जनजागृती करतात आणि इतरांसाठीही प्रेरणा बनतात.

प्रणीत पवार

जगभरात अनेक हौशी मोटारसायकलस्वार आहेत, जे सामाजिक उद्देशाने मोटारसायकल चालवून जनजागृती करतात आणि इतरांसाठीही प्रेरणा बनतात.

२१ जून हा दिवस एका खास गोष्टीसाठी साजरा केला जातो, तो म्हणजे मोटारसायकल. हो, अगदी सायकलप्रमाणेच सर्वसामान्य ते उच्चवर्गीयांच्या आयुष्याचा महत्त्वपूर्ण भाग असलेल्या मोटरासायकलचाही दिवस साजरा होतो. अवघ्या काही दिवसांवर आलेल्या या खास दिनानिमित्त काही खास गोष्टी आपण जाणून घेणार आहोत.

जगभरात अनेक हौशी मोटारसायकलस्वार आहेत, जे सामाजिक उद्देशाने मोटारसायकल चालवून जनजागृती करतात आणि इतरांसाठीही प्रेरणा बनतात. त्यापैकीच एक असलेले प्रमोद श्रेष्ठ ज्यांना ‘गूफी’ म्हणूनही ओळखले जाते. ते नेपाळमधील सर्वाधिक अनुभवी रायडर्सपैकी एक आहेत. प्रमोद ‘हिमालयन एनफिल्डर्स’ नावाचा नेपाळमधील पहिला बुलेट क्लब चालवतात. नेपाळमध्ये जन्मलेले, परंतु भारतात शिक्षण घेतलेल्या प्रमोद यांना बाइकद्वारे साहसी राइड करण्याची आवड आहे. मोटारसायकलवरूनच त्यांनी भारत, नेपाळ, तिबेट, भूतान, बांगलादेशची भ्रमंती केली आहे.

नेपाळमध्ये बालविवाहाविरोधात जनजागृती करण्यासाठी प्रमोद यांनी १५ मे २०२२ला जगातील सर्वांत उंच शिखर माउंट एव्हरेस्ट सर केले. शिवाय त्यांनी आपल्याकडील रॉयल एनफिल्ड बुलेट ‘क्लासिक ३५०’वरून नेपाळमधील मेची ते महाकाली या दोन विरुद्ध टोकांचा १४०० किलोमीटरचा प्रवास अवघ्या २२ तास २८ मिनिटात पूर्ण केला. ‘पार्किन्सन्स’ या आजाराच्या जनजागृतीसाठी ही अवघड राईड त्यांनी केली.

प्रमोद देशांतर्गत पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी, सामाजिक उपक्रमांच्या जनजागृतीसाठी नेहमीच मोटारसायकलवरून भ्रमंती करतात. त्यांनी यापूर्वी ‘युनिसेफ’बरोबर ‘साबून, पानी, हात’ या स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या मोहिमेसाठीही राइड केली. नेपाळमध्ये १९९६ ते २००६ दरम्यान झालेल्या गृहयुद्धाच्या विरोधात प्रमोद यांनी दोन शांतता रॅली काढल्या, ज्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यात बाइक रायडर्सही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तेव्हापासून प्रमोद इतर रायडर्सनाही सामाजिक जनजागृतीसाठी प्रोत्साहन देत आहेत.

हिमालय चढाईची ‘विनोद’ गाथा

मुंबईकर असलेले आणि एक पाय नसतानाही साहसी बुलेटस्वारी करणारे विनोद रावत यांचेही मोटारसायकलवर विशेष प्रेम. विनोद हे ‘कॉन्व्हॉय कंट्रोल क्लब’चे संस्थापक आहेत. जो अपंग परंतु बाइकिंगसाठी उत्साही असलेल्यांचा एक समूह आहे. विनोद यांनी कृत्रिम पायाद्वारे स्थानिक मोटारसायकलस्वारांना सोबत घेऊन २० हजार फूट उंच हिमालयाची राईड केली. मोटारसायकल चालवण्याची खरी आवड कशी आयुष्य बदलते, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून विनोद यांच्याकडे पाहू शकतो.

जागतिक मोटारसायकल दिनानिमित्त विनोद सांगतात, की प्रत्येक बाइक रायडरला गार्ड, गर्ड आणि गेज या ‘थ्री-जी’चे पालन करणे आवश्यक आहे. मोटारसायकल चालवणे ही एक क्रिया आहे आणि यात सुरक्षेला खूप महत्त्व आहे. म्हणूनच राइडला निघताना स्वत: आणि आपल्या पाठीमागे बसलेल्याची सुरक्षा जपावी (गार्ड), स्वत:ला त्यांच्यासोबत एकप्रकारे बांधावे (गर्ड) आणि आपल्या सभोवतालच्या स्थितीचा अंदाज घेऊनच बाहेर निघावे (गेज) असे ते सांगतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Maharashtra Election 2024 : उल्हासनगर परिमंडळातील 8 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत 24 ड्रोनचा वॉच, मतदान प्रक्रियेसाठी कंबर कसली

Leopard Attack : चिमुकल्याच्या मृत्यूमुळे आई-वडिलांचा टाहो; एका महिन्यात तीन बळी

Sanapwadi Village Voting : स्वातंत्र्याच्या सत्त्याहत्तर वर्षानंतर प्रथमच सानपवाडीकर करणार स्वतःच्या गावांत विधानसभेसाठी मतदान

Latest Maharashtra News Updates : ७५ पेक्षा जास्त सभा घेतल्या, सरकारनं केलेली कामं लोकांसमोर मांडत गेलो; मुख्यमंत्र्यांनी सांगितला प्रचाराचा लेखाजोखा

SCROLL FOR NEXT