CNG vehicle sakal
लाइफस्टाइल

झूम : सीएनजी वाहनांसाठी आशादायी बाजारपेठ

गेल्या काही वर्षांपासून सीएनजी वाहनांच्या विक्रीत चढ-उतार दिसून येत आहेत. आताच्या इलेक्ट्रिक वाहनांप्रमाणेच सुरुवातीला सीएनजी वाहने खरेदीत लोकांमध्ये संभ्रम होता.

प्रणीत पवार

गेल्या काही वर्षांपासून सीएनजी वाहनांच्या विक्रीत चढ-उतार दिसून येत आहेत. आताच्या इलेक्ट्रिक वाहनांप्रमाणेच सुरुवातीला सीएनजी वाहने खरेदीत लोकांमध्ये संभ्रम होता; परंतु सीएनजी पंपांची संख्या सुमारे पाच पटीने वाढल्याने या वाहनांनाही प्रतिसाद मिळत आहे. सध्या देशभरात एकूण वाहनांच्या सरासरी ११ टक्के बाजारपेठ सीएनजीने काबिज केली आहे.

केंद्र सरकारच्या ‘वाहन’ संकेतस्थळाच्या आकडेवारीनुसार, जानेवारी ते जून २०२३ या कालावधीत सीएनजी प्रवासी वाहनांची (एलएमव्ही आणि पेट्रोल-सीएनजी) एकत्रित किरकोळ विक्री जानेवारी ते जून २०२२ च्या तुलनेत ५.४७ टक्क्यांनी कमी झाली आहे. सीएनजीच्या साहित्य पुरवठ्यातील अडचणींमुळे २०२३ च्या पहिल्या सहामाहीत किरकोळ विक्री घटली. परिणामी वाहन वितरणावर परिणाम झाला. प्रवासी वाहन विभागात या आर्थिक वर्षात ३ लाख १८ हजार ७५२ सीएनजी कार्सची विक्रमी विक्री नोंदवली गेली, जी मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत ४१ टक्क्यांनी अधिक आहे.

देशात सीएनजी फिलिंग स्टेशन्सची संख्या २०१६-१७ मध्ये १ हजार २३३ होती, ती आता २०२३ पर्यंत सहा हजारांच्या पुढे गेली आहे. हा आकडा सीएनजी वाहनांच्या वाढीस महत्त्वपूर्ण ठरला आहे. कमी प्रवास खर्च, सुरक्षिततेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड हे सीएनजी कारच्या वाढीस कारणीभूत ठरणारे काही मोठे घटक आहेत. कार्बन उत्सर्जनाची जागतिक समस्या आणि त्याबाबत होणारी जनजागृती यामुळे प्रदूषणकारी वाहन खरेदीकडे लोकांचा कल कमी झाला आहे. सीएनजी वाहने त्यांच्या समकक्ष वाहनांपेक्षा कमी प्रदूषणकारी असल्याने ती खरेदी केली जात आहेत.

भारतात सध्या मारुती-सुझुकीसह ह्युंदाई, टाटा आणि टोयोटा कंपनीच्या सीएनजी कार उपलब्ध आहेत. मारुती सुझुकीच्या ‘एस-सीएनजी’ तंत्रज्ञानासह १४, ह्युंदाई, टाटाच्या प्रत्येकी तीन; तर टोयोटा भारतीय बाजारपेठेत दोन सीएनजी कार विक्री करते. दोन वर्षांपूर्वी मारुती-सुझुकीच्या फक्त नऊ सीएनजी कार होत्या. २०२२-२३ या आर्थिक वर्षात भारतामध्ये १४ लाखांहून अधिक एस-सीएनजी वाहने विकून सुमारे १४.४ लाख टन कार्बन उत्सर्जन रोखल्याचे मारुती-सुझुकी इंडियाच्या विपणन आणि विक्री विभागाचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी शशांक श्रीवास्तव यांनी सांगितले.

मारुती-सुझुकीचा वरचष्मा

सध्या सीएनजीचा वाहन उद्योगात ११ टक्के बाजार हिस्सा आहे. सीएनजी वाहनांच्या एकूण विक्रीत मारुती-सुझुकीच्या वाहनांचा हिस्सा ७५ टक्क्यांहून अधिक आहे, असे श्रीवास्तव यांनी सांगितले. ‘आमच्या वाहनांच्या एकूण विक्रीत २७ टक्के वाटा सीएनजी वाहनांचा असतो, हा आकडा दशकभरात ३५ टक्क्यांपर्यंत जाईल. मारुती-सुझुकीच्या यंदाच्या आर्थिक वर्षात जवळपास तीन लाख सीएनजी वाहनांची विक्री झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षात ३.३० लाख वाहनांची विक्री नोंदवली होती, ती यंदा पाच लाखांपर्यंत जाईल,’ असा अंदाज कंपनीने वर्तवला आहे.

एसयूव्ही श्रेणींना प्रतिसाद

मारुती-सुझुकीच्या अर्टिगा, ब्रिझा आणि ग्रँड विटारा या एसयूव्ही कारच्या तुलनेत हॅचबॅक श्रेणीत सीएनजीला कमी प्रतिसाद मिळाल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. अल्टो सीएनजीच्या विक्रीचा सरासरी वाटा ७ टक्के आहे, तर अर्टिगाचा वाटा ५० टक्क्यांहून अधिक आहे. यंदाच्या वर्षी ब्रिझा सीएनजीची २४ टक्के, तर ग्रँड व्हिटारा सीएनजीची १४ टक्के विक्री नोंदवण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : निकालाच्या पार्श्वभूमीवर 'मविआ'च्या प्रमुख नेत्यांत 'हाॅटेल हयात'मध्ये तब्बल अडीच तास चालली बैठक

Satara Crime: कश्‍मिरासह चौघांकडून १४ कोटींची फसवणूक; आणखी एक गुन्हा दाखल

Cyber Fraud Alert : ऑनलाइन फोटो पोस्ट करताय? सावध व्हा! तुमचे फिंगरप्रिंट्स चोरी होऊ शकतात; काय आहे नवा फ्रॉड? सुरक्षेचा उपाय पाहा

Price Hike : लसण, कांदा, खाद्यतेल भडकले...लसण प्रति किलो ४००, खाद्यतेल डब्ब्यामागे २०० रुपयांनी महागले

Maharashtra Politics: ..तर राज्यात लागू होवू शकते राष्ट्रपती राजवट; सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग

SCROLL FOR NEXT