Pregnancy Tips eSakal
लाइफस्टाइल

Pregnancy Tips : गर्भवती स्त्रीयांनी कसे बसावे? काय सांगतात डॉक्टर!

गर्भावस्थेत बसूनच योगा करणंही आरामदायक आणि लाभदायक ठरतं

सकाळ डिजिटल टीम

Pregnancy Care Tips : गर्भवती असणं एखाद्या महिलेसाठी खूप महत्त्वाची गोष्ट असते. तिच्या उदरात एक नवा जीव जन्माला येत असतो. त्यामूळे स्वत:सोबत तिला होणाऱ्या बाळाचीही काळजी घ्यायची असते. त्यामूळे तिला सतत काळजी घेण्याचेही सल्ले दिले जातात.

गर्भावस्थेदरम्यान मॉर्निंग सिकनेस ( Morning Sickness) आणि थकवा या गोष्टी अति सामान्य मानल्या जातात. प्रत्येक गर्भवती स्त्री हा त्रास कमी करण्यासाठी विविध उपाय ट्राय करत असते.  त्यातही तिच्या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवणाऱ्या घरातील वृद्ध महिला अधिकच तिची काळजी घेत असतात.

वाढलेल्या पोटामूळे महिला ९ महिन्याच्या काळात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. पालथ झोपण्याचं सुख डावलून एका कडेवर झोपावं लागतं. तसेच, बसता उठता तिला त्रास सहन करावा लागतो. इतकेच नाही तर ती सोबत असताना गाडीही हळू चालवावी लागते.

प्रेग्नंसीत जास्त काळजी महिलांना बसताना घेतली पाहिजे. त्यामूळे पुढे प्रसुतीमध्ये अधिक अडचणी निर्माण होत नाहीत. प्रसुती सहज होते.

गर्भारपणात महिलांकडून अनेकदा छोट्या छोट्या चुका घडतात. त्यामूळे त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. अशाच एका महत्त्वाच्या गोष्टीवर आज आपण चर्चा करणार आहोत. ती म्हणजे गर्भवती महिलांनी कसे बसावे?

एका जागी बसू नका

बसण्याकडे नीट लक्ष देत नाहीत. त्यांना आरामदायक वाटेल असेच बसावे. जर त्या अवघडून बसल्या तर पाठदुखी, पाय सुजणे इत्यादी समस्यांना सामोरे जावे लागते.

गरोदरपणात एका जागी जास्त वेळ बसणे टाळा. बऱ्याचदा डॉक्टरच्या केबिन बाहेर वेटींगला असताना थोडा वेळ उठ बस करा. सोनोग्राफीच्या वेळीही तूम्ही एकाजागी बसून राहू नका. त्यामूळेअसे केल्याने शरीराला घातक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.  

असे बसा

गर्भधारणेदरम्यान बसताना पोटाचा खालचा भाग सरळ ठेवा. तो कशालाही टेकू नये याची काळजी घ्या. पोटाला कशाचा धक्का लागणार नाही याची काळजी घ्या.

नेहमी आरामात बसा

खूर्ची कशी असावी

गर्भधारणेदरम्यान बसण्यासाठी सर्वप्रथम आरामदायक असेल अशीच निवडा. वृद्धांसाठी असलेली आराम खूर्ची प्रेग्नंसीत वापरण्यासाठी कधीही चांगली मानली जाते. कारण, यामूळे शरीराच्या सर्वच अवयवांना आधार मिळतो. त्यामूळे स्नायू रिलॅक्स राहतात.

अशा आराम खुर्चीवर बसताना पाठ टेकून बसावे. जेणेकरून खांद्यांना विश्रांती मिळेल. पाठीला आणि कंबरेलाही आधार मिळतो. त्यामूळे त्यांचे दुखणे कमी होते.

बॅलेन्स बॉल

जर तुम्हाला गर्भधारणेदरम्यान व्यवस्थित बसायचे असेल तर तुम्ही यासाठी बॅलन्स बॉल देखील वापरू शकता. बॅलेन्स बॉल सुरक्षितही आहे आणि आरामदायकही. त्यामूळे तूमच्या पोटालाही आधार मिळतो. त्यामूळे बॅलेन्स बॉलचा वापर करा.

पोटासाठी उशा

वाढलेलं पोट घेऊन सतत झोपून राहणं शक्य नसतं. त्यामूळे ज्यादातर स्त्रीयांना बसून राहणं सोप्प वाटतं. तूम्हालाही झोपून न राहता आरामदायक वाटावं असं वाटत असेल तर पोटाच्या आधारासाठी उशा देखील बाजारात उपलब्ध आहेत. या उशांचा वापर करून तूम्ही पोटाला आधार देऊ शकता.

खांदे वाकवून बसणे टाळा

गरोदरपणात पोटाचे वजन वाढल्याने ते पुढे येते. आणि स्त्रीया वाकून चालायला आणि बसायला सुरूवात करतात. पण अशामूळे तूम्हाला मान, खांद्यांचे दुखणे सुरू होते.त्यामूळे बसताना नेहमी ताठ बसा. ताठ बसण्यासाठी पोटाला कशाचातरी आधार द्या आणि ताठ बसा.

पाय सारखेच ठेवा

बऱ्याच महिलांना पायावर पाय टाकून बसण्याची सवय असते. जेव्हा तूम्ही खूर्चीवर असता तेव्हा असे बसणे बंद करा. कारण, अशामूळे संपूर्ण शरीराचे वजन तुमच्या एका नितंबांवर असते. असे करणे धोकादायक ठरू शकते. त्यामूळे पाय एकमेकांवर टाकून  बसणे टाळा.

वाढलेलं पोट घेऊन असे बसू नका

पाय अंतराळी ठेऊ नका

गरोदरपणात बेड, गाडी, खूर्ची किंवा झोकाळ्यावर पाय अंतराळी सोडू नका. यामूळे तूमच्या पायात सगळं रक्त जमा होतं आणि पायात मुंग्या येणं, पाय सुजन्याचा त्रास सुरू होतो. प्रेग्नंसीत याकडे दुर्लक्ष केल्याने प्रसुतीनंतरही पायावरची सुज राहते. त्याचा त्रास नंतरही जाणवतो.  

अंतराळी पाय न ठेवता. त्याऐवजी नेहमी खूर्चीचा वापर करा. पायाखाली स्टूल किंवा बेडवर मांडी घालून बसावे.

गर्भावस्थेतील योगासने

गर्भावस्थेत बसूनच काही योगासने करू शकता. जी तूम्हा प्रसुती सुलभ होण्यास मदत करतील.

सुखासन

गर्भावस्थेत पाठीचा कणा ताठ ठेवणं अशक्य होतं. या समस्येतून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही साधे आणि सोपे सुखासनाचा सराव करू शकता.

  • योग मॅट किंवा बसताना तुम्हाला त्रास होणार नाही असे कापड घ्या. त्यावर मांडी घालून बसा.

  • मान, पाठीचा कणा आणि पाठ सरळ ठेवा. कुठेही बाक येऊ देऊ नका.

  • हातांना ध्यान मुद्रेमध्ये दोन्हा गुडघ्यांच्या वर ठेवा.

  • यानंतर डोळे बंद करा आणि खांदे सैल सोडा.

  • श्वासोच्छश्वासाची प्रक्रिया सुरू ठेवत आपल्या श्वासांवर लक्ष केंद्रीत करा.

  • स्वतःच्या क्षमतेनुसार सुखासनामध्ये बसा. त्यानंतर डोळे उघडून आरामदायी स्थितीमध्ये बसा.

सुखासन

बटरफ्लाय योगा

  • बद्धकोणासनाची सराव करण्यासाठी सर्वात आधी जमिनीवर मॅट पसरवून त्यावर बसा.

  • आता दोन्ही पाय गुडघ्यात मोडून पायांचे तळवे एकमेकांजवळ आणा.

  • यानंतर दोन्ही हातांच्या बोटांची गुंफण करून त्यांच्या मदतीनं दोन्ही पाय पकडा.

  • यानंतर जेवढे शक्य असेल तेवढं पायांच्या टाचा शरीराजवळ आणण्याचा प्रयत्न करा.

  • दोन्ही गुडघ्यांना जमिनीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. या सर्व प्रक्रिया करताना श्वास कोठून रोखून धरू नका. कंबर सरळ ठेवा. ही झाली बद्धकोणासनाची अंतिम स्थिती

Butterfly Yoga

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT