Propose Day 2023 esakal
लाइफस्टाइल

Propose Day 2023 : होकार हवा असेल तर हिच स्टाईल करून करा प्रपोज!

तर तुमची जागा दुसऱ्याने घेतलीच म्हणून समजा

सकाळ डिजिटल टीम

प्रपोज करतांना नक्की काय घालावं हा जरी सर्वांचा वैयक्तिक प्रश्न असला. तरी असं काही घालू नका ज्याने तुमचं इंप्रेशन डाऊन होईल. मुलगा असो वा मुलगी कोणीही प्रपोज करतांना समोरच्या व्यक्तीला जर छान दिसला नाहीत तर तुमची जागा दुसऱ्याने घेतलीच म्हणून समजा.

आपल्या होणाऱ्या पार्टनरला नक्की काय आवडतं, तुम्ही त्यांना प्रपोज नक्की कुठे करता आहात, कसे करता आहात या गोष्टी खूप जास्त गरजेच्या आहेत. या गोष्टींचं भान ठेवत आपला ड्रेसिंग स्टाईल निवडा.

कॅफे स्टाईल लूक

जर तुम्ही शहरातल्या शहरात एखाद्या कॅफेमध्ये किंवा हॉटेल मध्ये प्रपोज करू इच्छित असाल तर त्यानुसार आपला आऊटफिट ट्राय करू शकतात.जर तुम्ही त्यांना एखाद्या कॅफेमध्ये प्रपोज करणार असाल तर मुलांसाठी राऊंड नेकचा टि शर्ट, जिन्स आणि डेनिम जॅकेट हा लूक परफेक्ट आहे.

मुलींनो तुम्ही छान क्रॉप टॉप आणि जिन्सचा किंवा शॉर्ट कुर्तीचा सुद्धा लूक करू शकतात. हे करत असतांना आपल्या ॲक्सेसरीज परफेक्ट निवडा, आपण एका कॅफेमध्ये जातो आहोत त्याच्या आजूबाजूच्या गोष्टी बघून स्टाईल करा.

व्ह्यू पॉइंट लूक

पुण्यात असे अनेक व्ह्यू पॉइंट आहेत जिथून तुम्ही सुंदर निसर्ग बघू शकतात. अशा ठिकाणी जाऊन आपल्या मनातली गोष्ट आपल्या पार्टनरला सांगणं एक अविस्मणीय अनुभव ठरू शकतो.

मुलं इथे तुम्ही जिन्स, स्पोर्ट्स शूज आणि तुमची कूल हुडी ट्राय करू शकतात यावर स्मार्ट वॉच आणि गॉगल परिधान करणं विसरु नका.

मुलींनो तुम्ही इथे आपले छान फ्लोरल वनपिस ट्राय करू शकतात. यावरती छोटे स्कार्फसुद्धा सुंदर दिसतील. तुम्ही यावरती डेनिम जॅकेट आणि सिकर्स सुद्धा घालू शकतात.

पार्टनरला आवडेल असा लूक

अनेकदा स्टायलिंग करण्याच्या नादात आपण आपल्या पार्टनरला काय आवडेल हे बघणच विसरतो असं करू नका. आपल्या पार्टनरला नक्की काय आवडत काय नाही यानुसार आपला ड्रेस फायनल करा.

खूप मुलींना आपला पार्टनर फॉर्मल लूकमध्ये आवडत असतो, शिवाय व्यवस्थित फॉर्मल ड्रेसिंग केली तर मुली तुमच्यावर फिदा झाल्याच म्हणून समजा. त्यामुळे तुम्ही फॉर्मल ड्रेसिंग करू शकतात.

 मुलींनो जर तुमचा पार्टनर फॉर्मल स्टाईल करत असेल तर तुम्हीही त्यांना आवडतात म्हणून लाँग प्लेन स्कर्ट परिधान करू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivajinagar Assembly Election 2024 Result: सिद्धार्थ शिरोळे 36 हजार मतांनी विजयी; सलग दुसऱ्यांदा आले निवडून

Assembly Election Result Viral Memes : महायुतीचा एकतर्फी विजय अन् महाविकास आघाडीचा सपशेल पराभव; सोशल मीडियावर आली Memes ची लाट

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: बेलापूरमध्ये भाजपच्या मंदा म्हात्रे विजयी

Rajesh Kshirsagar Won Kolhapur North Assembly Election : 'कोल्हापूर उत्तर'मधून राजेश क्षीरसागर तब्बल 30 हजार मतांनी विजयी; लाटकरांचा केला पराभव

karmala Assembly Election 2024 Result Live: करमाळ्यात नारायण आबा पाटील यांचा विजय, संजयमामा शिंदे यांना धोबीपछाड, बागल गटाचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT