QR Code For Gas Cylinder: घरगुती गॅस सिलिंडरचा वाहनांमध्ये अवैधपणे वापर होतो. हे धोकादायक आहे. घरगुती गॅसचा गैरवापर व काळाबाजार रोखण्यासाठी शासनाने ठोस कारवाई करावी, सिलिंडर वितरणासाठी क्यूआर कोड ट्रॅकिंग पद्धत लागू करावी, अशी मागणी ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशनचे प्रशांत जामगडे व रवींद्र ब्राह्मणे यांनी पत्रकार परिषदेत केली.
जामगडे म्हणाले, ‘‘घरगुती गॅसपेक्षा व्यावसायिक सिलिंडर हे महाग आहे. त्यामुळे घरगुती गॅसचा वापर अवैधपणे होतो. काही ठिकाणी तर चक्क १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरमध्ये १४.२ किलोच्या सिलिंडरमधील गॅस पलटी करण्याचे प्रकारही होतात. अवैध गॅस रीफिलिंग सेंटरवर असे प्रकार सर्रास केले जातात. यात शासनाचा महसूल बुडतो. पलटी करून वाहनामध्ये धोकादायक पद्धतीने गॅस भरला जात असल्याने अपघातही होतात. मागील पाच वर्षांत राज्यात ५ हजार १३१ अपघात झाले.
दरम्यान, सिलिंडरचा होणारा काळाबाजार रोखण्यासाठी संबंधित कंपनी अधिकारी गांभीर्याने घेत नाहीत’’, असा आरोपही त्यांनी केला. घरगुती गॅस सिलिंडर विक्रीचा वाटा ८९ टक्के, तर व्यावसायिक सिलिंडरचा वाटा हा केवळ ९.१ टक्के तसेच (बल्क) औद्योगिक क्षेत्रातील वाटा १.४ टक्के आणि एलपीजी वाहनात उपयोगात येणाऱ्या एलपीजी विक्रीचा वाटा ०.४ टक्के असल्याचा दावाही जामगडे यांनी केला.
या प्रकरणी अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे प्रधान सचिव यांच्यासोबत बैठक झाली. येथील जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनाही याबाबत पत्र देण्यात आले आहे. अवैध गॅस रीफिलिंग सेंटरवर झालेल्या कारवाईबाबत माहिती संकलित केली जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.