Radhika Merchant esakal
लाइफस्टाइल

Radhika Merchant: मामेरू सोहळ्यात राधिका मर्चंट नटली गुजराती लुकमध्ये, पण हे मामेरू म्हणजे नक्की काय?

Radhika Merchant Mosalu Ceremony: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट हे कपल १२ जुलैला विवाहबंधनात अडकणार आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Radhika Merchant : भारताचे प्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे एमडी मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीच्या लग्नाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा पहायला मिळतेय.

अनंत आणि राधिका मर्चंट हे कपल १२ जुलैला विवाहबंधनात अडकणार आहे. त्यापूर्वी, त्यांचे २ प्री-वेडिंग फंक्शन पार पडले आहेत. ज्यामध्ये देश-विदेशातील बड्या व्यक्ती सहभागी झाल्या होत्या.

१२ जुलैला हे कपल मुंबईमध्ये लग्न करणार असून, त्यापूर्वी त्यांच्या लग्नाचे विधी सुरू झाले आहेत. ३ जुलैला (बुधवारी) मामेरू (मोसालू) हा विधी पार पडला. गुजराती लग्न समारंभात या मामेरू विधीला फार महत्व आहे. लग्नाच्या काही दिवस आधी पार पडणारा हा पारंपारिक सोहळा आहे.

मामेरू सोहळ्यात वराचे मामा, वराचे आई-वडिल आणि इतर नातेवाईक सहभागी होतात. ते वधुला साडी, दागिने, कपडे आणि इतर भेटवस्तू देऊन तिला आशीर्वाद देतात. हा सोहळा वधू आणि वर दोन्ही कुटुंबांमध्ये पार पडतो. या सोहळ्यात वराचे मामा वधुला 'मामेरू' नावाचा पारंपारिक भेटवस्तूंचा सेट भेट म्हणून देतात.

या मामेरू सोहळ्याला 'मोसालू' म्हणून ही ओळखले जाते. हा सोहळा खरे तर लग्नाचे कुटुंबासाठी असलेले महत्व अधोरेखित करतो. या सोहळ्याला राधिका मर्चंटने मोठ्या दिमाखात हजेरी लावली होती. यावेळी तिने गुजराती लूक कॅरी केला होता. तिचा एकूणच लूक कसा होता? चला तर मग जाणून घेऊयात.

राधिकाचा सुंदर गुजराती बांधणी लेहेंगा

राधिका आणि अनंत हे कपल लवकरच विवाहबंधनात अडकणार असून याचा आनंद दोघांच्याही चेहऱ्यावर दिसून येत आहे. अंबानी कुटुंबाच्या अ‍ॅंटिलीया या निवासस्थानी बुधवारी अनंत-राधिकाची मामेरू सेरेमनी पार पडली. गुजराती लग्नसमारंभाची सुरूवात ही मामेरू सोहळ्याने होते. या सोहळ्याला गुजराती कुटुंबात फार महत्व असते.

राधिकाने या सोहळ्यासाठी खास गुलाबी-केशरी रंगाचा बांधणी लेहेंगा परिधान केला होता. तिच्या या लेहेंग्यावर दुर्गा देवीचा श्लोक लिहिला आहे. हा सुंदर डिझायनर लेहेंगा प्रसिद्ध डिझायनर मनिष मल्होत्राने डिझाईन केला असून त्याने राधिकाचे या लेहेंग्यातील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Radhika Merchant

राधिकाचा हा स्पेशल बांधणी लेहेंगा बनारसी फॅब्रिकपासून बनवण्यता आला आहे. या लेहेंग्यावर बारीक जरदोसी वर्क करण्यात आले असून याचा रंग चमकदार गुलाबी ठेवण्यात आला आहे. या लेहेंग्यावर सोन्याच्या तारेचा वापर करून जरदोसी वर्क करण्यात आले आहे. शिवाय, लेहेंग्याच्या बॉर्डरवर देवी दुर्गामातेचा श्लोक लिहिण्यात आला असून, तिच्या ब्लाऊजवर कोटा स्टाईल वर्क करण्यात आले आहे.

राधिकाचा ज्वेलरी लूक

या सुंदर गुलाबी रंगाच्या बांधणी लेहेंग्यावर राधिकाने तिच्या आईचे दागिने परिधान केले होते. तिच्या या दागिन्यांमुळे लेहेंग्याला चारचाँद लागले आहेत. या दागिन्यांमध्ये राधिका खूपच गोड दिसत आहे. तिने गळ्यात चोकर सेट घातला असून त्यावर मॅचिंग कानातले घातले आहेत. तिची बिंदी देखील लक्ष वेधून घेतेय.

Radhika Merchant

राधिकाच्या हेअरस्टाईलबद्दल बोलायचे झाल्यास, तिने केसांची वेगळी हेअरस्टाईल केली असून त्यावर हेअर अ‍ॅक्सेसरीज जोडली आहे. ती तिच्या लूकला अधिक खास बनवत आहेत. एकूणच राधिकाचा लूक एकदम भारी दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT