Rajasthan Tourism esakal
लाइफस्टाइल

Rajasthan Tourism : राजस्थानात गेल्यावर वाटेल परदेशात आलो की काय? कारण ही ठिकाणं आहेत सेम-टू-सेम

सकाळ डिजिटल टीम

Rajasthan Tourism :

भारताच्या प्रत्येक राज्याला एक वेगळा इतिहास आहे. प्रत्येक राज्याची खास ओळख आहे. तुम्ही राजस्थानला सांस्कृतीक राज्य म्हणूनही ओळखता. राजस्थानमध्ये असलेले राजवाडे, ग्रामिण संस्कृती ही जगभर प्रसिद्ध झाली आहे.

राजस्थानात असलेले महाल,राजवाडे हे आपल्या देशाच्या ऐतिहासिक वारश्यात भर घालणारे आहेत. राजस्थानात असलेली काही ठिकाणी परदेशातील वास्तूंची, ठिकाणांची कॉपी आहेत. भारतातील ही ठिकाणे परदेशातील ठिकाणांशी मिळती-जुळती आहेत. त्यामुळेच, पर्यटक दरवर्षी इथे भेट देतात.
 

तुम्हाला ऐतिहासिक ठिकाणांना भेटी द्यायला आवडत असतील. तर तुम्ही नक्कीच राजस्थानमधील परदेशी ठिकाणांची कॉपी असलेल्या ठिकाणांना भेट द्या.

कुंभलगड किल्ला

राजस्थानातील जोधपूर जवळ असलेला कुंभलगड किल्ला हा आशियातील सर्वात मोठ्या किल्ल्यांमधील एक आहे.  आरवली पर्वतरांगामध्ये हा पुरातन किल्ला थाटात उभा आहे. त्याच्या भक्कम भिंती कित्तेक किलोमीटर परिसरात पसरलेल्या आहेत.

या किल्ल्याच्या भिंती सेम टू सेम चायना वॉल सारख्या दिसतात. त्यामुळेच कुंभलगडच्या या ३६ किमी पर्यंत असलेल्या भिंतीला ग्रेट वॉल ऑफ इंडिया म्हणतात.

बाहुबली हिल्स

बाहुबली हिल्स हे राजस्थानमील उदरपूर येथे असलेले ठिकाण आहे. उदयपूरला गेलात तर या ठिकाणाला नक्की भेट द्या. या ठिकाणी असलेले थंड वारे तुम्हाला वेगळा अनुभव देईल. हे ठिकाणी अरावली पर्वतरांगांमध्ये आहे. हे ठिकाण USA मधील क्रेटर सरोवरासारखे दिसते.

पिछोला तलाव

राजस्थान हे तलाव आणि सरोवरांचे राज्य आहे. कारण, इथे अनेक प्रसिद्ध तलाव आणि सरोवरे आहेत. त्यातील पिछोला तलाव सेंट पीटर्सबर्गमधील तलावासारखे आहे. 

उदयपूरमधील या तलावात एक पुरातन महाल आहे. त्याचे आता एक रिजॉर्ट बनवण्यात आले आहे. तसेच हुबेहुब तलाव अन् रिजॉर्ट सेंट पीटर्सबर्गमधील विंटर पॅलेस सारखेच दिसते.

माउंट आबू

राजस्थानमधील माउंट आबूमध्ये असलेला टॉड रॉक न्यू बॉस्टनमध्ये असलेल्या एका ठिकाणासारखा आहे.  न्यू बॉस्टनमध्ये असलेली फ्रॉग रॉक राजस्थानमधील या ठिकाणासारखे दिसते.तसेच, टर्कीमधील मार्डिनचा नजारा आपल्या जैसलमेरसारखा दिसतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Metro Fire: नुकत्याच उद्घाटन झालेल्या 'मंडई मेट्रो' स्थानकाला भीषण आग! अग्निशमनच्या पाच गाड्या घटनास्थळी; आग नियंत्रणात

T20 World Cup Final: न्यूझीलंडच्या पोरींनी जिंकला वर्ल्ड कप ! दक्षिण आफ्रिका ५ महिन्यात दुसऱ्यांदा फायनलमध्ये पराभूत

Terrorist Attack: जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, कामगारांवर गोळीबार, 3 मजुरांचा मृत्यू तर 2 जखमी

विधानसभेसाठी भाजपची यादी जाहीर, देवेंद्र फडणविसांना पुन्हा संधी, प्रतिक्रिया देत म्हणाले...

Vidhansabha Election : समाजवादी गणराज्य पक्ष काँग्रेसमध्ये विलीन! कपिल पाटलांचा खर्गेंच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT