Cow Shelter  Sakal
लाइफस्टाइल

गोमाता सुद्धा लखपती! निराधार गाईंची येथे करतात मनोभावे सेवा, गोमातांच्या नावे काढली लाखोंची FD

Rajasthan Cow News राजस्थानमधील झुंझनूंमधील भोडकी ग्रामपंचायतीतील जमवाय ज्योती गौशाळेत गाईंप्रति ज्याप्रकार श्रद्धा पाहायला मिळते, तसे चित्र कदाचित इतरत्र कोठेही दिसणार नाही.

सकाळ डिजिटल टीम

ग्रामस्थ स्वबळावर चालवत आहेत गौशाळा

Cow Shelter News राजस्थानातील झुंझनूंमधील ‘जमवाय ज्योती गौशाळा’ ही सर्वश्रेष्ठ गौशाळापैकी एक आहे. खास वैशिष्ट्य म्हणजे ही गौशाळा सरकारी अनुदान किंवा कोणत्याही संस्थेच्या मदतीशिवायच उत्तमरित्या चालवली जाते. कौतुकास्पद बाब म्हणजे येथील ग्रामस्थांनी स्वबळावर ही शाळा सुरू केली आहे.

सुरुवातीस काही लोकांमार्फत सुरू करण्यात आलेल्या या गौशाळेत आज एक समितीही स्थापन केली गेली आहे, ज्यामध्ये आता ३००हून अधिक देणगीदार जोडले गेले आहेत. येथे प्रत्येक दिवशी गाईंकरिता खास नैवेद्य तयार केला जातो.

वर्ष २०१५मध्ये झाला शाळेचा आरंभ

न्यूज १८च्या रिपोर्टनुसार, गौशाळेचे सचिव कैलाशचे यांनी सांगितले की, ‘गावात गौशाळा स्थापित तर केल्या जातात, पण त्यांची योग्य पद्धतीने देखभाल केली जात नाही. परिणामी कालांतराने गौशाळा बंद करण्याची वेळ येते. पण जमवाय ज्योती गौशाळा दिवसेंदिवस प्रगतीच करत आहे.

२०१५मध्ये स्थापित करण्यात आलेल्या या शाळेत सुरुवातीस १०० ते १५० गाई होत्या. तर सद्यस्थितीमध्ये येथे जवळपास ११०० गाई असल्याची नोंद आहे’. पुढे ते असेही म्हणाले की,’ गौशाळा चालवण्यासाठी एक समिती स्थापन केली जाईल, हे देखील सुरुवातीस निश्चित करण्यात आले होते.

समितीत २०० ग्रामस्थांचा समावेश केला गेला होता. हे २०० लोक आपल्या मिळकतीतील प्रतिमहिना ५०० रूपये गौशाळेस दान करतात. गौशाळेत गाईंच्या संख्येसोबत देणगीदारही वाढत आहेत. २०० लोकांच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेल्या या गौशाळेशी आज ३०० हून अधिक लोक जोडले गेले आहेत. केवळ जोडलेच गेले नाहीत तर ही मंडळी शाळेच्या प्रगतीसाठी हातभारही लावत आहेत.

गाईंच्या नावावर आहेत लाखो रूपयांच्या FD

या गौशाळेची सर्वात खास बाब म्हणजे येथे गाईंच्या वर्तमानासह भविष्याबाबतही विचार केला जातो. मनुष्यप्राणी ज्याप्रमाणे स्वतःच्या सुरक्षित भविष्याकरिता आर्थिक गुंतवणूक करून ठेवतो, त्याचप्रमाणे येथे गाईंच्या नावावरही बँकेत एफडी काढली गेली आहे.

कौतुकास्पद निर्णय

ज्यावेळेस गौशाळा स्थापित करण्याबाबत चर्चा सुरू होती, त्यावेळेस समजा काही कारणास्तव देणगीदारांकडून सहकार्य न मिळल्यास किंवा एखादे नैसर्गिक संकट ओढावल्यास अशा स्थितीत गाई व गौशाळा सुरक्षित ठेवण्यासाठी पर्यायी मार्ग असावा, असा मुद्दा काही जणांनी चर्चेदरम्यान मांडला. हा मुद्दा लक्षात घेता गाईंच्या नावावर एफडी काढण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली.

सर्वप्रथम गौशाळेचे अध्यक्ष शिवरम गोदारा यांनी गाईंच्या नावे बँकेत एक लाख रुपयांची एफडी काढली. त्यानंतर अन्य देगणीदारांनीही आपल्या सहकुटुंबाच्या मदतीने गाईंच्या नावावर एफडी काढली. या एफडीचे व्याज वर्षभरातून एकदा गौशाळेत जमा केले जाते आणि उर्वरित रक्कम त्यांच्याच सुरक्षिततेसाठी ठेवली जाते.

रिपोर्टमधील माहितीनुसार, गौशाळेतील जवळपास ४८ गाईंच्या नावे बँकेत एफडी काढण्यात आली आहे. या गौशाळेकरिता गावाच्या मदतीनेच जमीन देखील दान करण्यात आली आहे. गौशाळेच्या भोवती संरक्षक भिंतीही उभारण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे गौशाळेकरिता गोरक्षकांकडून मिळणाऱ्या सहकार्यात दिवसेंदिवस वाढच होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपचे चंद्रकांत पाटील 5,700 मतांनी आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: बेलापुरमधून मंदा म्हात्रे आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election 2024: मतमोजणी सुरु होताच नाशिक, जळगावमध्ये अदानी ग्रुपचं खासगी विमान दाखल; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT