रक्षाबंधनाचा सण आला की तरूणींमध्ये काय घालायचं, कसं नटायचं याची चर्चा असते. साडी की ड्रेस, नौवारी की सहावारी, घागरा की पटियाला असे अनेक लुक्स आहेत. जे ट्रेंडी आहेत आणि त्याची जास्त चर्चाही आहे. पण, उत्सवमूर्ती असलेली आपली मुलं मात्र त्या दिवशी साध्या-शर्ट पॅन्टवर असतात.
गुलाबी साडी, नौवारी साडी, नथीचा नखरा, झुमकावाली पोरं अशी तरूणींच्या लुकला समर्पित असणारी गाणी आहेत. पण, पुरूषांसाठी कोणी धोती,कुर्त्यावरील गाणी बनवत नाही. कारण, पुरूषांच्या ड्रेसिंग स्टाईलवर कोणी फार चर्चा करत नाही. (Rakhsha Bandhan 2024)
कधी-कधीतर पुरूषांना विचारलंही जात नाही की, त्यांना काय हवंय. त्यांच्यासाठी शर्ट-पॅन्टच कटपिस किंवा पॅन्ट-शर्ट आणलं जातं. यंदाच्या रक्षाबंधनाला कसा लुक करावा याच्या काही टिप्स आम्ही खास बंधुराजांसाठी आणल्या आहेत. तुम्हीही रक्षाबंधनादिवशी कास लुक करून बहिणींपेक्षा वरचढ दिसू शकता.
आजकाल कुर्ता पायजम्याला अनेक पुरूषांची पसंती आहे. कारण, हा पारंपरिक लुक आरामदायक आहे. पांढऱ्या रंगाच्या पायजम्यावर चिकन वर्क असलेला कुर्ता ट्रेंडी आहे. यातही अनेक व्हरायटी बाजारात उपलब्ध आहेत.
तुम्हाला कुर्त्यावर पायजमा नसेल घालायचा. तर श्रीकृष्ण भगवानांसारखा लुक तुम्ही करू शकता. म्हणजेच धोतीवर कुर्ता घालू शकता. हा एक आरामदायक लुक आहे. जो आजकाल ट्रेंडमध्ये आहे.
तुम्ही कुर्ता पायजमा एखाद्या कार्यक्रमाला वापरला असाल. तर, तोच कुर्ता दुसऱ्यावेळी घालणं नकोसं वाटतं. कारण, सतत तोच लुक अन् त्याच ड्रेसवर फोटोज काढावे लागतात. त्यामुळेच, तुम्ही तुमच्या कुर्त्याला मॅचिंग होईल असे जॅकेट घालू शकता.
सध्या मराठी पारंपरिक लुक करण्यापेक्षा मुलं वेगळं काहीतरी करण्याचा विचार करतात. तुम्हाला यंदाच्या रक्षाबंधनाला रॉयल अन् हटके लुक हवा असेल तर तुम्ही पठाणी ड्रेस घ्या. पांढऱ्या रंगाच्या पठाणी पॅन्टवर गडद रंगाचा कुर्ता सुंदर दिसतो.
सध्या तरूणी अन् तरूणांसाठी कपडे घ्यायला गेलं की इंडो वेस्टर्न लुक दाखवू का असं दुकानदार सांगतो. हा लुक भारतीय अन् वेस्टर्न कपड्यांना एकत्रिक करून बनवलेला असतो. तोही तुम्हाला राजेशाही लुक देतो.
पेस्टल शेड्स – फिकट निळा, फिकट गुलाबी आणि पिस्ता कलर
अर्थी टोन्स- ब्राऊन आणि ऑलिव्ह ग्रीन
व्हायब्रंट कलर्स – ऑरेंज, पिवळा, लाल
पॉकेट वॉच किंवा सिंपल लुक देणांर रिस्टवॉच
मोजडी किंवा लोफर
सिंपल चैन आणि कानातील बाली
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.