Raksha Bandhan 2023: आपल्यात सणावाराला गोडधोड करण्याची प्रथाच आहे. पुर्वी पुरणपोळी बनवायचे लोक तर आता बरेच ऑप्शन आहेत. शेवटी तोंड गोड करायला काही गोड झालं की झालं. आता श्रावणाला सुरूवात आहे. श्रावणात रोजच उपवास असतात. उपवासा सोडताना गोड पदार्थ खाल्ला जातो.
तसेच नागपंचमी अशा सणांना देखील गोडाचा नैवेद्य दाखवून दिवस गोड केला जातो. तर, रक्षाबंधनाला लाडक्या भावासाठी त्याच्या आवडीचे गोड पदार्थ केले जातात. तुम्हीही यंदा भावाला खूश करायला काही वेगळं त्याला आवडेल असं शोधत असाल. तर, आज म्हैसूर पाकाबद्दल थोडफार बोलुयात. (Raksha Bandhan 2023: Raksha Bandhan Recipe Mysore Pak Recipes in Marathi)
म्हैसूर पाक ही तुपात तयार केली जाणारी एक भारतीय मिठाई आहे. याचा उगम भारतातील कर्नाटक राज्यातील प्रमुख शहरांपैकी एक असलेल्या म्हैसूर शहरात झाला. हा पदार्थ तूप, साखर, बेसन आणि वेलचीपासून बनवला जातो. (Sweet Recipe)
म्हैसूर पाकाची कथा
म्हैसूरचे महाराज असलेले कृष्ण राजा वाडियार चतुर्थ हे खाद्यप्रेमी होते. त्यांनी म्हैसूरच्या अंबा विलास पॅलेसमध्ये एक मोठे स्वयंपाकघर तयार केले होते, ज्यामध्ये मंदिरांसाठीचे प्रसादम ते युरोपियन पदार्थ अशा विविध पाककृती बनवल्या जात होत्या.
वेळ कमी असताना हताश मडप्पा हे महाराजांना काहीतरी वेगळं असं खायला द्यावं असं वाटत होतं. त्यांनी एक पदार्थ बनवायचा ठरवला. ज्यासाठी बेसन, तूप आणि साखर घालून मऊ पाक त्यांनी बनवला. शाही थाळीत त्यांनी ती गरमागरम, आणि गोड असणारा पदार्थ वाढला. जेव्हा त्यांना बोलावून त्याचे नाव विचारले, तेव्हा त्यांनी त्यांच्या मनात आलेली पहिली गोष्ट सांगितली - 'म्हैसूर पाक'
आज आम्ही तुमच्यासाठी म्हैसूर पाक बनवण्याची रेसिपी घेऊन आलो आहोत. हा एक अतिशय प्रसिद्ध गोड पदार्थ आहे, जे चवीला अतिशय चविष्ट आहे. हे बनवायलाही खूप सोपे आहे, चला जाणून घेऊया म्हैसूर पाक कसा बनवायचा.
म्हैसूर पाक बनवण्यासाठी साहित्य-
1 कप बेसन
१ वाटी देशी तूप
१/२ कप तेल
२ कप साखर (चवीनुसार)
म्हैसूर पाक कसा बनवायचा?
म्हैसूर पाक बनवण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात बेसन चाळून घ्या.
नंतर कढईत देशी तूप आणि तेल टाकून मध्यम आचेवर गरम करून गॅस बंद करा.
यानंतर एका भांड्यात साखर आणि अर्धा कप पाणी घालून साखरेचा पाक बनवा.
नंतर तुम्ही मध्यम आचेवर सतत ढवळत असताना किमान 5 मिनिटे शिजवा.
यानंतर गॅस मंद करून साखरेच्या पाकात पाव वाटी बेसन घाला.
नंतर सतत ढवळत असताना ते चांगले मिसळा आणि 2-3 मिनिटे शिजवा.
यानंतर, त्यात वितळलेले 1 चमचे तूप-तेल घालून चांगले शिजवून घ्या.
मग तुम्ही ते सतत ढवळत राहा जोपर्यंत सर्व तेल-तूप मिश्रणात शोषले जात नाही.
यानंतर ही प्रक्रिया ४-५ वेळा करून सर्व तेल मिश्रणात टाकून मिक्स करावे.
नंतर हे मिश्रण फेसाळ होईपर्यंत शिजवा.
यानंतर प्लेट किंवा ट्रेच्या तळाला थोडे तुप लावून ग्रीस करा.
मग तुम्ही तयार मिश्रण ट्रेमध्ये ठेवा आणि ते समान प्रमाणात पसरवा.
यानंतर, कमीतकमी 10 मिनिटे थंड होण्यासाठी सोडा.
नंतर चाकूच्या मदतीने त्याचे तुकडे करा.
आता तुमचा स्वादिष्ट म्हैसूर पाक तयार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.