Raksha Bandhan 2023 Muhurat esakal
लाइफस्टाइल

Raksha Bandhan 2023 : रक्षाबंधनावर आहे भद्राकाळाच सावट, ३० की ३१ ऑगस्ट कधी बांधावी भावाला राखी?

Raksha Bandhan 2023 date: भद्राकाळ किती वेळापर्यंत असेल ?

Pooja Karande-Kadam

Raksha Bandhan 2023 : श्रावणाच्या पवित्र महिन्याला सुरूवात झाली की लागोपाठ सण-समारंभही सुरू होतात. सुरूवात नागपंचमीपासून होते तर शेवट दिवाळीला होते. हे चार महिने घरातल्या प्रत्येक सदस्याच्या मनात नवा उत्साह संचारतो.

माहेरवाशीनी तर या सणाला माहेरी जाण्याची वाट पाहतात. तर सासूरवाशीनी नटून-थटून मिरवायला मिळेल म्हणून खूश असतात.  

श्रावण महिन्यात येणारी पौर्णिमा भावा-बहिणीच्या गोड नात्याला अर्पण केली आहे. या दिवसाला राखी पौर्णिमा असेही म्हणतात. राखी हा केवळ एका दिवसासाठी साजरा केला जाणारा सण असला तरी त्यातून निर्माण होणारी नाती नेहमीच प्रेमाने भरलेली असतात.

आपल्या पुराणात, महाभारत अन् रामायणातही  बहिण भावाच्या गोड नात्याची अनेक उदाहरणे आहेत. (When is Raksha Bandhan on 30 or 31 August)

रावणावरील प्रेमासाठी श्रीरामांना अडवायला गेलेली शुर्पणखा लोकांच्या आजही लक्षात आहे. तिने वाईट काम केल अन् लक्ष्मणाने तिचे नाक कापले. पण ती तिथवर आली ती बंधू रावणाच्या सहाय्यतेसाठीच. अशी अनेक उदाहरणे आहेत.

बहिण-भावाचं नातं दृढ करणाऱ्या हा सण नक्की कधी आहे. तसेच  भावाला ओवाळून राखी बांधायची कधी? असा प्रश्न बहिणींना पडला आहे. तर आज याच उत्तर जाणून घेऊयात. (Raksha Bandhan 2023)

रक्षाबंधन दिनांक व मुहूर्त

हिंदू दिनदर्शिकेनुसार श्रावण महिन्याची पौर्णिमा ३० ऑगस्टला सुरू होते तर, ३१ ऑगस्टला संपते. पौर्णिमे दिवशीच भद्राकाळही आहे. त्यामुळे त्यादिवशी संपूर्ण दिवस राखी बांधता येणार नाही. याचे कारण असे की, भद्रकाळात कोणतेही शुभ काम केले जात नाही. आणि केले तर ते फळाला येत नाही. 

पौर्णिमा कधीपासून कधीपर्यंत

पौर्णिमा तिथीची सुरुवात : ३० ऑगस्ट २०२३ सकाळी १० वाजून ५८ मिनिटांनी

पौर्णिमा समाप्ती : ३१ ऑगस्ट २०२३ सकाळी ७.०५ वाजता

भद्राकाळ किती वेळापर्यंत असेल ?

पौर्णिमेच्या तारखेला सकाळी १० वाजून ५८ मिनिटांनी भद्राकाळ सुरू होत आहे. जो रात्री ०९ वाजून ०१ मिनिटांपर्यंत असेल. अशा तऱ्हेने राखी तिथी ३१ ऑगस्ट आहे, ज्यामध्ये बहिणी सकाळी ७ वाजेपर्यंत भावाला राखी बांधू शकतात. किंवा त्या दिवशी पुर्ण दिवसही राखी बांधली तरी चालते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

सोलापूर जिल्ह्यातील ११ आमदारांनी किती घेतली मते? दुसऱ्या- तिसऱ्या क्रमांकावर कोण? जाणून घ्या, जिल्ह्यातील विजयी अन्‌ दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांची मते

Amol Javle Won Raver Assembly Election 2024 Result Live: रावेर विधानसभा मतदार संघातून अमोल जावळे विजयी

SCROLL FOR NEXT