Raksha Bandhan 2023  esakal
लाइफस्टाइल

Raksha Bandhan 2023 : भावाची मागची साडेसाती घालवायची असेल तर प्रत्येक बहिणीने करावे हे उपाय, नक्की फरक पडेल

भावाची आर्थिक परिस्थिती सुधरावी म्हणून काय करावं?

Pooja Karande-Kadam

Raksha Bandhan 2023 : आपल्या संस्कृतीत प्रत्येक नात्याला महत्त्व आहे. पतीशिवाय पत्नी अपुर्ण, तसेच बहिणीशिवाय भाऊ. अलिकडील काळात प्रत्येक नात्यात काही ना काही खटके उडत असतात. भावा-भावात प्रॉपर्टीवरून वाद होत असतात. प्रॉपर्टी लोकांना इतकी प्रिय आहे की त्यामुळे नात्यात येणारे वाद त्यांना दिसत नाहीत.

असंच काहीस आजकाल बहिण-भावाच्या नात्यातही होत आहे. काहीतरी वाद होतात आणि बहिण-भावाच्या नात्यात कलह होतात. या वादामुळेच दरवर्षी कित्तेक बहिणी भावाला राखी बांधू शकत नाहीयेत. रूसलेल्या बहिणीमुळे भाऊही रक्षाबंधनाच्या दिवशी हात मोकळा घेऊन फिरत आहे.

हिंदू धर्मात रक्षाबंधन या सणाला खूप महत्त्व आहे. भाऊ-बहिणीच्या नात्यातील कटुता दूर करण्यासाठी आणि नातेसंबंध सुधारण्यासाठी हा सर्वात शुभ दिवस मानला जातो. या दिवशी बहिण सुखी जीवनासाठी मनगटावर रक्षासूत्र बांधतात आणि भाऊ आपल्या बहिणींचे रक्षण करण्याचे वचन देतात. (Raksha Bandhan 2023)

पण, भांडणामुळे बहिण-भावाची जोडी फुटलेली दिसते. तुमच्यात आणि तुमच्या भावातही असाच अबोला आला असेल तर काही उपाय शास्त्रात सांगितले आहेत. जे तुमचे नाते अधिक दृढ करतील आणि वादही कायमचे संपतील.

गणपतीबाप्पाला बांधा राखी

भाऊ-बहिणींमध्ये दीर्घकाळापासून वाद होत असतील. एकमेकांचे तोंडही पाहणार नाही अशी शपथ जरी तुम्ही घेतली असेल तरीही दरवर्षी एक राखी तुम्ही नक्कीच खरेदी करत असाल. भावाला द्यायची इच्छा होते पण देऊ शकत नसाल. तर काळजी करू नका. हा उपाय तुमची नक्कीच मदत करेल. रक्षाबंधनादिवशी सर्वप्रथम गणपती बाप्पाला राखी बांधावी.

साक्षात गणपतीच तुमचे बंधू झाल्याने तुम्हाला भाऊही मिळेल. आणि गणपती बाप्पाच तुमच्यातील व भावातील वाद संपवतील.

भावाच्या प्रगतीसाठी करा उपाय

भावाची प्रगती व्हावी, तो यशस्वी व्हावा अशी प्रत्येक भावाची इच्छा असते. भावाला कोणत्याही कामात यश येत नसेल त्याची प्रगती खुंटली असेल. तर त्यावरही शास्त्रात बहिणीला करता येईल असा उपाय सांगितला आहे. हा उपाय रक्षाबंधनाच्या दिवशीच करण्यास सांगितले जाते. कारण, भावा-बहिणीच्या प्रेमाचाच हा दिवस आहे. (Vastu Tips)

भावाची प्रगती व्हावी यासाठी रक्षाबंधनाच्या दिवशी पंचमेवा खीर तयार करा. यानंतर विधिवत माता लक्ष्मीची पूजा करावी. तिच्याकडे भावाचे दिर्घायुष्य व यश मागावे. पंचमेव्यापासून तयार केलेली खीर घरातील,शेजारील मुलांना वाटावी. असे केल्याने उपजीविकेत येणारे सर्व अडथळे दूर होतात आणि घरातील सदस्यांची प्रगती होते, असे मानले जाते.

भावाची आर्थिक परिस्थिती

भावाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याची जाणिव प्रत्येक बहिणीला असते. त्यामुळे भावाची परिस्थिती सुधारावी यासाठी ती देवाकडे प्रार्थनाह करत असते. या समस्येवर शास्त्रात एक उपाय सांगितला आहे.

भावाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी रक्षाबंधनाच्या दिवशी भावाने बहिणीच्या हातातून गुलाबी कापडात अक्षता, सुपारी आणि चांदीचे नाणे काढून बांधून आपल्या तिजोरीत ठेवावे. असे केल्याने घरात कधीही पैशांची कमतरता भासत नाही, असे मानले जाते.

दु:ख आणि अडथळे दूर करण्यासाठी

रक्षाबंधनाच्या दिवशी सकाळी स्नान करून हनुमान मंदिरात जावे. मारूतीरायाचे दर्शन घ्या. तसेच त्यांना नारळ आणि गोड प्रसाद अर्पण करा. यानंतर श्रद्धेने हनुमान चालिसाचे पठण करावे. असे केल्याने मारूतीराया भावाचे सर्व दु:ख आणि अडथळे दूर करतात, असे मानले जाते.

सुख-समृद्धीचे उपाय

रक्षाबंधनाच्या दिवशी गरिबांना अन्न आणि गायींना हिरवे गवत खायला द्यावे, असे सांगितले जाते. असे केल्याने घरात भावाच्या घरात सुख-समृद्धी येते. तसेच घरातील सर्व सदस्यांचे आयुष्य सुख-आनंदात व्यतीत होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT