Rakhi Gift Idea For Sister Sakal
लाइफस्टाइल

Rakhi Gift Idea For Sister: यंदा रक्षाबंधनला कमी बजेटमध्ये बहीणीला देऊ शकता 'या' खास भेटवस्तू

पुजा बोनकिले

Rakhi Gift Idea For Sister: भावा-बहीणचं नातं सर्वात खास असते. या खास नात्याला साजरा करण्यासाठी रक्षाबंधन हा सण मोठ्या आवडीने साजरा केला जातो. यंदा १९ ऑगस्टला रक्षाबंधन साजरा होणार आहे. या दिवशी बहीण भावाला ओवाळते आणि मनगटावर राखी बांधते. तसेच भाऊ बहीणीला खास भेटवस्तू देतो. तुम्हीही बहीणीसाठी भेटवस्तू शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. पुढील वस्तू भेटवस्तू म्हणून देऊन बहीणीला आनंदी करू शकता.

फ्रेम किंवा ब्रेसलेट

जर तुम्हाला रक्षाबंधननिमित्त बहीणीला खास भेटवस्तू द्यायची असेल तर सुंदर फ्रेम भेट देऊ शकता. तसेच बहीणीला ब्रेसलेट घालायची आवड असेल तर सुंदर ब्रेसलेट भेट देऊ शकता. तुम्ही ऑनलाइन किंवा दुकानात जाऊन विविध प्रकचे ब्रेसलेट आणि फ्रेम पाहून खरेदी करू शकता.

चष्मा

जर तुमची बहीण नोकरी करत असेल किंवा चष्मा घालत असेल तर ट्रेंडी चष्मा फ्रेम भेट देऊ शकता. ही एक रोजच्या कामात येणार वस्तू असल्याने बहीण देकील आनंदी होईल. तुम्ही दिलेली ही भेटवस्तू आनंदाने रोज वापरेल.

मेकअप किट

कोणताही कार्यक्रम असो महिलांना मेकअपशिवाय जात नाही. तुम्ही रक्षाबंधननिमित्त बहीणीला खास मेकअप कीट भेट देऊ शकता. ही भेटवस्तू पाहून ती नक्की आनंदी होईल.

चॉकलेट बुके

रक्षाबंधनला बुके देऊन बहीणीला आनंदी करू शकता.याचा सध्या खुप ट्रेंड सुरू आहे. ही एक उत्तम भेटवस्तू असू शकते.

घड्याळ किंवा स्मार्ट वॉच

तुमची बहीण कॉलेज किंवा ऑफिसला जात असेल तर रक्षाबंधनला घड्याळ किंवा स्मार्ट वॉच भेट देऊ शकता. ती ही भेटवस्तू पाहून खुप आनंदी होईल. तुम्ही ऑनलाइन किंवा दुकानात जाऊन खरेदी करू शकता.

हॅण्ड बॅग

मुलींनी हॅण्ड बॅग खुप प्रिय असतात. रक्षाबंधननिमित्त बहीणीला हॅण्ड बॅग, क्लच किंवा स्लिंग बॅग तसेच ट्रेंडनुसार बॅगे भेट देऊ शकता. ही भेटवस्तू रोजच्या उपयोगातील असल्याने तुमची बहीण आनंदी होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: मलिदा गँग, बारामती अन् इंदापूर... हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशावेळी शरद पवार नेमकं काय म्हणाले?

Rahul Gandhi : राहुल गांधी यांच्यात दैवी शक्ती! महाराष्ट्रातील काँग्रेसच्या बड्या नेत्याचा दावा

Latest Maharashtra News Updates : अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यात निवडणूकांबाबत चर्चा

Stock Market Crash: पंतप्रधान मोदींनी ज्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा दिला होता सल्ला तेच शेअर्स कोसळले

मारुती सुझुकी आणि टोयोटा एकसारख्याच गाड्या वेगळ्या नावाने का विकतात? या सणासुदीला नवीन कार घेण्याआधी ही बातमी नक्की वाचा..

SCROLL FOR NEXT