Raksha Bandhan Gift Idea: Sakal
लाइफस्टाइल

Raksha Bandhan Gift Idea: गुलाबी साडी आणि... बहिणीची रक्षाबंधन करा खास, 'या' 5 प्रकारच्या ट्रेंडी साड्या देऊ शकता भेट

पुजा बोनकिले

Trendy Saree Design For Sister: यंदा रक्षाबंधन १९ ऑगस्टला साजरा केला जाणार आहे. हा दिवस बहिण-भावासाठी खुप खास असतो. तसेच बहिण भावाच्या नात्यातील प्रेम वाढवणारा हा सण आहे.  यादिवशी बहिण भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि भाऊ बहिणीला सुंदर भेटवस्तू देतो. तुमच्या बहिणीला साडी नेसायला आवडत असेल तर सुंदर आणि ट्रेंडी साडी भेट देऊ शकता. आम्ही आज पाच प्रकारच्या ट्रेंडी साड्या सांगणार आहोत ज्या तुमच्या बहिणीला देखील आवडेल.

chiffon saree

शिफॉन साडी

रक्षाबंधनला बहिणीला शिफॉनची साडी भेट देऊ शकता. शिफॉनची साडीही खूप सुंदर दिसते. साडीचा कपडा हलका असल्याने परिधान करणे सोपे आहे.

Bandhani Print

बांधणी प्रिंट

जर तुमच्या बहिणीचे नुकतेच लग्न झाले असेल आणि तिला बांधणी प्रिंट साडी आवडत असेल तर ही साडी नक्की भेट देऊ शकता. ही साडी नववधुवर खुप सुंदर दिसते. तुम्ही दुकानात जाऊन किंवा ऑनलाइल साडी खरेदी करू शकता

silk saree

सिल्क साडी

सिल्कची साडी कोणत्याही कार्यक्रमासाठी उत्तम पर्याय आहे. तुमची बहिण प्रत्येक कार्यक्रमात ही साडी सहजपणे नेसू शकते. यामुळे तुम्ही तिला सिल्कची साडी भेट देऊ शकता. सिल्कमध्ये तुम्हाला अनेक प्रकार आढळतात. यामध्ये बनारसी, कांजीवरम यासारखे प्रकार आहेत.

organza saree

ऑर्गन्झा साडी

सध्या ऑर्गन्झा साडीचा खूप ट्रेंड आहे. यंदा रक्षाबंधनला तुम्ही तुमच्या बहिणीला ऑर्गेन्झा फॅब्रिकची साडीही भेट देऊ शकता. ही साडी खरेदी करताना तुमच्या बहिणीचा आवडता रंग लक्षात ठेवा. यावर मिळतेजुळते दागिने घातल्यास लूक अधिक सुंदर दिसेल.

Sequin Saree

सिक्विन वर्कची साडी

जर तुमच्या बहिणीला वेस्टर्न लूक कॅरी करायला आवडत असेल तर तिच्यासाठी सिक्विन वर्कची साडी खरेदी करू शकता . अशा प्रकारच्या साड्याही सध्या ट्रेंडमध्ये आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: पुणे जिल्ह्यात शरद पवार देणार भाजपला अजून एक धक्का? या महिला नेत्यानी घेतली भेट

Sim Card Buying New Rules : सिमकार्ड खरेदीवर निर्बंध; केंद्र शासनाने लागू केला नवा नियम,नेमकं प्रकरण काय?

Laddu Mutya Baba : फिरता पंखा हातानं थांबवला अन् लड्डू मुत्त्या बाबाचं भांडं फुटलं; विज्ञानामुळं उलगडलं सत्य,व्हिडिओ पाहा

सुरज चव्हाण जिंकताच गावात झाला एकच कल्ला! 'गुलीगत पॅटर्न' वर थिरकले गावकरी, व्हिडिओ होतोय व्हायरल

Nitin Gadkari : गडकरींनी फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांना का दिली होती गोळ्या घालण्याची धमकी? स्वतःच सांगितला किस्सा

SCROLL FOR NEXT