Raksha Bandhan 2024 esakal
लाइफस्टाइल

Raksha Bandhan 2024: भावाची प्रगती पहायची असेल तर प्रार्थनाच नाही बहिणींनी हे उपायदेखील करावे, भावाचं नशिब फळफळेल!

भावाची काही अडचण असेल, भावाला काही त्रास असेल तर त्याची काळजी सतत बहिणीला लागून राहिलेली असते.

सकाळ डिजिटल टीम

Raksha Bandhan 2024:

रक्षाबंधनाचा सण हा भावा-बहिणीच्या प्रेमाची साक्ष देणाराच आहे. भावाला दिर्घायुष्य लाभावे यासाठी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. तसेच, भाऊ बहिणींचे आयुष्यभर रक्षण करेल, त्याची दरवर्षी आठवण करून दिली जाते. ती म्हणजे, रक्षाबंधन होय. भावाच्या हातावर राखी बांधून हा सण साजरा केला जातो.

बहिणींच्या मनात नेहमी भावाचा विचार येतो तेव्हा त्याची संकटे जास्त आठवतात. भावाची काही अडचण असेल, भावाला काही त्रास असेल तर त्याची काळजी सतत बहिणीला लागून राहिलेली असते. भावाला असलेल्या आर्थिक, शारीरिक अडचणींवर बहिण सतत उपाय शोधत असते. (Raksha Bandhan 2024)

कोणाचा भाऊ आर्थिक अडचणीत असतो. तर कुणाचा कायमचा अंथरूणाला खिळलेला असतो. कुणाचा जीवन-मरणाच्या फेऱ्यात अडकलेला असतो. या सर्वामुळे बहिणीला रक्षाबंधन साजरी करण्याची इच्छाच नसते. पण, याचवेळी बहिणींनी भावासाठी काही उपाय केले तर ते त्यांच्या अडचणी दूर करणारे ठरू शकतात.

बाप्पाला बांधा राखी

भाऊ-बहिणींमध्ये दीर्घकाळापासून वाद होत असतील. एकमेकांचे तोंडही पाहणार नाही अशी शपथ जरी तुम्ही घेतली असेल तरीही दरवर्षी एक राखी तुम्ही नक्कीच खरेदी करत असाल. भावाला द्यायची इच्छा होते पण देऊ शकत नसाल. तर काळजी करू नका. हा उपाय तुमची नक्कीच मदत करेल. रक्षाबंधनादिवशी सर्वप्रथम गणपती बाप्पाला राखी बांधावी.

साक्षात गणपतीच तुमचे बंधू झाल्याने तुम्हाला भाऊही मिळेल. आणि गणपती बाप्पाच तुमच्यातील व भावातील वाद संपवतील.

भावाच्या प्रगतीसाठी करा उपाय

भावाची प्रगती व्हावी, तो यशस्वी व्हावा अशी प्रत्येक भावाची इच्छा असते. भावाला कोणत्याही कामात यश येत नसेल त्याची प्रगती खुंटली असेल. तर त्यावरही शास्त्रात बहिणीला करता येईल असा उपाय सांगितला आहे. हा उपाय रक्षाबंधनाच्या दिवशीच करण्यास सांगितले जाते. कारण, भावा-बहिणीच्या प्रेमाचाच हा दिवस आहे. (Vastu Tips)

भावाची प्रगती व्हावी यासाठी रक्षाबंधनाच्या दिवशी पंचमेवा खीर तयार करा. यानंतर विधिवत माता लक्ष्मीची पूजा करावी. तिच्याकडे भावाचे दिर्घायुष्य व यश मागावे. पंचमेव्यापासून तयार केलेली खीर घरातील,शेजारील मुलांना वाटावी. असे केल्याने उपजीविकेत येणारे सर्व अडथळे दूर होतात आणि घरातील सदस्यांची प्रगती होते, असे मानले जाते.

भावाची आर्थिक परिस्थिती

भावाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याची जाणिव प्रत्येक बहिणीला असते. त्यामुळे भावाची परिस्थिती सुधारावी यासाठी ती देवाकडे प्रार्थनाह करत असते. या समस्येवर शास्त्रात एक उपाय सांगितला आहे.

भावाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी रक्षाबंधनाच्या दिवशी भावाने बहिणीच्या हातातून गुलाबी कापडात अक्षता, सुपारी आणि चांदीचे नाणे काढून बांधून आपल्या तिजोरीत ठेवावे. असे केल्याने घरात कधीही पैशांची कमतरता भासत नाही, असे मानले जाते.

दु:ख आणि अडथळे दूर करण्यासाठी

रक्षाबंधनाच्या दिवशी सकाळी स्नान करून हनुमान मंदिरात जावे. मारूतीरायाचे दर्शन घ्या. तसेच त्यांना नारळ आणि गोड प्रसाद अर्पण करा. यानंतर श्रद्धेने हनुमान चालिसाचे पठण करावे. असे केल्याने मारूतीराया भावाचे सर्व दु:ख आणि अडथळे दूर करतात, असे मानले जाते.

सुख-समृद्धीचे उपाय

रक्षाबंधनाच्या दिवशी गरिबांना अन्न आणि गायींना हिरवे गवत खायला द्यावे, असे सांगितले जाते. असे केल्याने घरात भावाच्या घरात सुख-समृद्धी येते. तसेच घरातील सर्व सदस्यांचे आयुष्य सुख-आनंदात व्यतीत होते.  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Patil: पवारांची साथ मिळूनही हर्षवर्धन पाटलांसाठी निवडणूक सोप्पी नाही? घरातूनच बसला धक्का

BJP With Mns: शिवडीत मनसेच्या बाळा नांदगावकरांना भाजपचे समर्थन, आशीष शेलारांनी केली घोषणा

Pune News : नव्या पाहुण्यासाठी हवा सरकारी दवाखाना; खासगीपेक्षा अधिक पसंती, अडीच वर्षांत ६९ हजार प्रसूती

Sakal Podcast: अमेरिकेत ट्रम्प येणार की हॅरिस? ते अर्जुन तेंडुलकर CSK च्या जर्सीत दिसणार?

आपापल्या उमेदवारांसाठी ‘हे’ १७ बडे नेते सोलापुरात! पंतप्रधान मोदी, राहुल गांधी, शरद पवार, योगी, रेवंथ रेड्डी, सिद्धरामय्या, उद्धव व राज ठाकरे, ओवैसी यांच्या प्रचारसभा, वाचा...

SCROLL FOR NEXT