भारताला मंदिरांचा देश म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण, आपल्या देशात अनेक प्राचिन मंदिरे आहेत. या मंदिरांमुळे खरं वैभव आपल्याला लाभलं आहे. देशात अशी अनेक वैशिष्ट्यपूर्ण मंदिरे आहेत. त्या प्रत्येक मंदिराचं एखादं रहस्य असतं, एखादी पौराणिक कथा असते.
भारतात असेही एक मंदिर आहे जे केवळ रक्षाबंधनादिवशी उघडते. या मंदिराचा थेट संबंध रक्षाबंधनाशी आहे. कारण, माता लक्ष्मीने रक्षाबंधन केले अन् भगवान विष्णूंना पुन्हा मिळवले, यामागील कथा काय आहे जाणून घेऊयात. (Raksha Bandhan 2024)
उत्तराखंडमध्ये असलेल्या वंशी नारायणाच्या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे ते वर्षातून एकदाच उघडतं. उत्तराखंडमधील चामोली जिल्ह्यात हे मंदिर आहे. या मंदिराचे दरवाजे फक्त रक्षाबंधनादिवशीच उघडतात. या मंदिरात रक्षाबंधनादिवशी महिला आणि पुरुष गर्दी करतात. कारण या मंदिरात आपल्या भावाला राखी बांधल्याने त्याचे सकारात्मक परिणाम त्याच्या जीवनावरती पडतात अशी बहिणींची भावना आहे.
रक्षाबंधन दिवशी जी बहीण आपल्या भावाला या मंदिरात राखी बांधते त्याला दीर्घायुष्य लाभले, सुख संपत्ती प्राप्त होते, अशी मान्यता आहे. तसेच, भावावरती कोणत्याही प्रकारचे संकट येत नाही असेही सांगितले जाते.
या मंदिराचे पौराणिक महत्त्व असे आहे की, भगवान विष्णू वामन अवतारातून मुक्त झाल्यानंतर प्रथम या ठिकाणी प्रकट झाले होते. या ठिकाणी देव ऋषी नारदांनी पूजा केली होती.
एकदा पाताळलोकचा राजा बळीने भगवान विष्णूला आपला द्वारपाल बनण्याची विनंती केली. आणि भगवान विष्णूने राजा बळीची ही विनंती मान्य केली. आणि ते बळीसोबत पाताळात गेले. अनेक दिवस भगवान विष्णूचे दर्शन न झाल्यामुळे देवी लक्ष्मी चिंतित झाली आणि ती नारद मुनींकडे गेली.
नारद मुनींकडे पोहोचल्यानंतर माता लक्ष्मीने त्यांना विचारले की भगवान विष्णू कुठे आहेत. त्यावर नारद मुनींनी माता लक्ष्मीला सांगितले की ते पाताळात आहेत. आणि राजा बळीसाठी ते द्वारपाल बनले आहेत.
नारद मुनींनी माता लक्ष्मीला भगवान विष्णूंना परत आणण्याचा उपाय देखील सांगितला. श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही पाताळात जा आणि राजा बळीच्या मनगटावर रक्षासूत्र बांधा. रक्षासूत्र बांधल्यानंतर माता लक्ष्मी बळीची बहिण झाली आणि तिने ओवाळणी म्हणून भगवान विष्णूंना परत मागितले.
या एका दिवसासाठी नारदमुनी मंदिरापासून दूर देवी लक्ष्मींसोबत पाताळात गेले. आणि तेव्हा नारद मुनींच्या अनुपस्थितीत कालगोठ गावच्या पुजाऱ्याने वंशी नारायणांची पूजा केली आणि तेव्हापासून ही परंपरा सुरू आहे.
भगवान विष्णूंचे परमभक्त नारदमुनी देवांची पाठ सोडत नाहीत. तसेच, ते या मंदिरात वर्षातील ३६४ दिवस पूजा करत असतात. फक्त एक दिवस असा असतो जेव्हा नारद मूनी या मंदिरातून बाहेर जातात. तोच हा रक्षाबंधनाचा दिवस. या दिवशी हे मंदिर उघडलेले असते.
भगवान विष्णूंच्या या खास मंदिरात त्या दिवशी बनवला जाणारा प्रसादही खास असतो. कारण, या दिवशी तिथे येणाऱ्या प्रत्येकाच्या घरचे ताजे लोणी आणले जाते. तिथेच बाजूला असलेल्या भालू गुहेत हा प्रसाद बनवला जातो. आणि तोच नैवेद्य देवांना दिला जातो.
रक्षाबंधन हा सण नसून भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधतात आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात, तर भाऊ आपल्या बहिणीचे आयुष्यभर संरक्षण करण्याचे वचन देतो. अशा या खास दिवशी तुम्ही बहिणीसोबत या मंदिराला भेट देऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.