Ram Mandir In Pakistan  esakal
लाइफस्टाइल

Ram Mandir In Pakistan : एका राजपूत राजाने पाकिस्तानात बांधलेलं राम मंदिर, आजही आहे अस्तित्वात

श्री राम वनवासात असतानाही ते येथेच राहिले होते

Pooja Karande-Kadam

Ram Mandir In Pakistan :

सध्या भारतात सर्वत्र राम मंदिराची चर्चा होत आहे. राम मंदिरामुळे अयोध्या सध्या देशातच नाहीतर जगभरात चर्चेचा विषय बनला आहे. देशातील राम मंदिर उभारताना जगाच्या अनेक कोपऱ्यातही भगवान श्रीरामांची मंदिरे आहेत.

तुम्हाला माहित आहे का की, पाकिस्तानातही राम मंदिर आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या मंदिराला मोठी ओळख आहे आणि तिथले लोक आजही या मंदिरात पूजा करतात.  

आज आपण पाकिस्तानमधील या राम मंदिराची कहानी सांगत आहोत. यासोबतच आपण हे देखील जाणून घेऊयात की पाकिस्तानमध्ये हे मंदिर कोणी बांधले आहे.  

पाकिस्तानात हे राम मंदिर कुठे आहे?

जेव्हा पाकिस्तान भारतापासून वेगळा नव्हता, तेव्हा इस्लामाबादच्या आसपास अनेक हिंदू राहत होते. त्यामुळेच या परिसरात अनेक मोठी मंदिरे होती. हे राम मंदिर इस्लामाबादच्या सैदपूर गावात आहे. 15 व्या शतकात बांधलेले हे मंदिर रामांचे आहे. श्री राम वनवासात असतानाही ते येथेच राहिले होते. या भूमीवर त्यांचे अस्तित्व होते, असे तेथील हिंदू समाजाचे लोक मानतात.

हे मंदिर कोणी बांधले?

हे मंदिर 1580 मध्ये हिंदू राजपूत राजा मान सिंह याने बांधले होते असे सांगितले जाते. फाळणीपूर्वी हे मंदिर भव्यतेसाठी ओळखले जात होते. मात्र, फाळणीनंतर या मंदिराची दुर्दशा झाली. मात्र 2016 मध्ये या मंदिराचा परिसर नूतनीकरण करून पाकिस्तानातील हिंदू समाजाच्या ताब्यात देण्यात आला.

Ram Mandir In Pakistan

कराचीतील हनुमान मंदिर

पाकिस्तानात फक्त श्री रामांचेच मंदिर नाही. खरे तर कराचीमध्ये रामभक्त हनुमानांचे मंदिरही आहे. कराचीमध्ये असलेला हा पुतळा हजारो वर्ष जुना असल्याचं सांगण्यात येत आहे. तथापि, 1882 मध्ये त्याची पुनर्बांधणी करण्यात आली. आजही येथे दर्शनासाठी हिंदूंची गर्दी असते. याशिवाय पाकिस्तानमध्ये अनेक जुनी आणि मोठी मंदिरे आहेत.

ज्यांना भेट देण्यासाठी जगभरातील हिंदू दरवर्षी येतात. बलुचिस्तानमध्ये स्थित हिंगलाज शक्तीपीठ हे पाकिस्तानातील सर्वात भव्य मंदिरांपैकी एक मानले जाते. मात्र आज या मंदिराची अवस्था वाईट झाली असून हे मंदिर भग्नावस्थेत आहे.

Ram Mandir In Pakistan

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Candidate First List : विधानसभेसाठी काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर; पुण्यातून एकमेव धंगेकरांचं नाव; वाचा संपूर्ण यादी

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांविरोधात काँग्रेसचा 'हा' उमेदवार; २०१४ मध्ये दिली होती लढत

Burger: बर्गरमधून विषाणूचा प्रसार; ४९ जणांना बाधा, एकाचा मृत्यू, १० राज्यांमध्ये फैलाव

Maharashtra Assembly Election 2024 : भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्यांना संधी दिलेली नाही, फिल्टर लावूनच उमेदवारांची निवड - जयंत पाटील

Mohol Assembly Election : निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून आमदार यशवंत यांनी माने यांनी दाखल केली उमेदवारी

SCROLL FOR NEXT