Ram Mandir esakal
लाइफस्टाइल

Ram Mandir : मशिदीखाली राम मंदिराचे दडलेले अवशेष या व्यक्तीने शोधले, वाचा त्यांचा थरारक अनुभव

Pooja Karande-Kadam

Ram Mandir :

1976-77 साली देशात आणीबाणीचा काळ होता. त्यावेळी दिल्ली विद्यापीठाच्या पुरातत्व विभागातील विद्यार्थ्यांचा एक गट अयोध्येला रवाना झाला.  अयोध्येची ऐतिहासिक पाळेमुळे खोदून काढण्यासाठी हा एक अभ्यास दौरा होता. या गटात केरळमधील कोझिकोड येथे जन्मलेल्या 24 वर्षीय मुस्लिम विद्यार्थ्याचाही समावेश होता.

ज्याला हिंदू श्रद्धेचे प्रतीक असलेल्या भगवान श्री रामांच्या ऐतिहासिक मंदिराचे पुरावे शोधायचे होते. करिंगमन्नू कुझियिल मोहम्मद असे त्याचे नाव होते. के.के.मोहम्मद उंचीने ठेंगणे होते पण त्यांचा चेहरा रेखीव होता. 80 आणि 90 च्या दशकात त्यांनी रामललाशी संबंधित वैज्ञानिक तथ्ये आणि पुराव्यांचा डोंगरच उभारला होता. राम जन्मभूमी मंदिराची पुरातत्वीय वस्तुस्थिती स्थापित करणे हे के.के मुहम्मद यांच्यासाठी आव्हानच होते.

के.के मुहम्मद यांनी रामजन्मभूमीच्या शोधात केलेल्या त्यांच्या जीवनप्रवासाला मल्याळम भाषेत पुस्तकाचे स्वरूप दिले आहे. ज्याचे हिंदी भाषांतर ‘I am an Indian’ असे आहे. या पुस्तकात त्यांनी रामजन्मभूमी मंदिराच्या शोधप्रवासाबद्दल सविस्तर लिहिले आहे. ते लिहितात की, अयोध्येतील रामजन्मभूमीच्या मालकी हक्काची चर्चा 1990 मध्ये पहिल्यांदा संपूर्ण देशात जोर धरत होती, तेव्हा मला माझे 1976-77 चे कॉलेजचे दिवस आठवत होते. मला अयोध्येला अभ्यासासाठी पाठवण्यात आले. (Ram Mandir)

तेव्हा प्राध्यापक बीबी लाल यांच्या नेतृत्वाखाली अयोध्येत उत्खनन करणाऱ्या पुरातत्वशास्त्रज्ञांच्या टीममधील दिल्ली स्कूल ऑफ आर्कियोलॉजीच्या १२ विद्यार्थ्यांपैकी मी एक होतो. त्यावेळच्या उत्खननात मंदिराच्या खांबाखाली दगडी बांधकाम सापडले. मला आश्‍चर्य वाटले की आजपर्यंत कोणत्याही सरकारला ते पूर्णपणे खोदून पाहण्याची गरज का भासली नाही.

मी उत्खननासाठी तिथे पोहोचलो तेव्हा बाबरी मशिदीच्या भिंतींमध्ये मंदिराचे खांब स्पष्टपणे दिसत होते. मंदिराचे ते खांब काळ्या बेसाल्ट दगडांपासून बांधले गेले होते. खांबाच्या तळाशी 11व्या आणि 12व्या शतकातील मंदिरांमध्ये दिसणारे पूर्ण कलश स्पष्टपणे दिसत होते. मंदिर कलेमध्ये, पूर्ण कलश हे ऐश्वर्याच्या आठ प्रतीकांपैकी एक मानले जाते.

1976 मध्ये रामजन्मभूमीशी संबंधित पुरातत्व संशोधन करणाऱ्या पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे प्रा. डॉ. बीबी लाल यांनी अयोध्येत रामाचे अस्तित्व असल्याचे वक्तव्य केले. त्यावरून देशभरात एकच गदारोळ निर्माण झाला. या वक्तव्यानंतर त्यांना विभागीय कारवाईलाही सामोरे जावे लागले. पण केके मोहम्मद आपल्या विधानावर ठाम राहिले आणि म्हणाले की खोटे बोलण्यापेक्षा रामाचे अस्तित्व स्विकारून अमर होणे चांगले आहे.

केके मोहम्मद लिहितात की अयोध्येतील उत्खननात एकूण 137 मजूर कामावर होते, त्यापैकी 52 मुस्लिम होते. बाबरी मशीद कृती समितीचे प्रतिनिधी म्हणून सूरजभान मंडल, सुप्रिया वर्मा, जया मेनन इत्यादींव्यतिरिक्त अलाहाबाद उच्च न्यायालयाचे एक दंडाधिकारी देखील संपूर्ण उत्खननावर लक्ष ठेवून होते.(Ram Mandir Ayodhya)

4 डिसेंबर 1990 रोजी चेन्नई येथे महादेवन यांच्या व्याख्यानादरम्यान प्रा.डॉ. बीबी लालच्या अहवालाच्या आधारे मंदिराच्या अस्तित्वाचे पुरातत्वीय पुरावे नाकारणाऱ्या डाव्या इतिहासकारांनी बिबीलालचा अहवाल पाहावा. लाल यांनी आपल्या अहवालात एका विशेष संग्रहातून पुरावे उघड केले.

यानंतर त्यांनी इंडियन एक्स्प्रेसमध्ये लिहिले की, जर इतिहासकारांच्या मनात अजूनही मशिदीखाली मंदिर असण्याबाबत शंका असतील तर अशा शंका आणखी उत्खननाने दूर करता येतील.डॉ. महादेवन यांचे विधान आणि त्यांचा लेख वाचून के.के. मुहम्मद यांना स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही.

त्यावेळी ते मद्रासमध्ये कार्यरत होते. मुहम्मद हा अयोध्येत उत्खनन करणार्‍या बीबी लालच्या टीमचा एक भाग असल्याने, त्यांनी विवादित बाबरी संरचनेच्या खाली असलेल्या खांबांच्या संरचनांचा शोध देखील पाहिला.

७१ वर्षांचे केके मोहम्मद म्हणतात, अजूनही काम बाकी आहे…

राम मंदिराचे ऐतिहासिक सत्य प्रस्थापित करणारे केके मुहम्मद यांनी भविष्यात अनेक मोठी कामे केली. चंबळच्या दऱ्याखोऱ्यात असलेल्या बटेश्वर मंदिरांचा जीर्णोद्धार करणे हेही त्यांचे धाडसी कार्य होते. हे काम करण्यासाठी त्याला दरोडेखोरांशीही संवाद साधावा लागला. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य प्राचीन मंदिरांचे जतन करण्यात घालवले.

फतेहपूर सिक्री येथील अकबराच्या इबादत खानासह इतर अनेक मोठ्या शोधांमध्येही मुहम्मद यांचा सहभाग आहे.निवृत्तीनंतर त्यांना २०१२ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ते आता 71 वर्षांचे आहेत, पण देशाचा सांस्कृतिक वारसा जपण्याची त्यांची तळमळ थांबलेली नाही.

त्यांच्या बकेट लिस्टमधील अनेक ऐतिहासिक मंदिरांव्यतिरिक्त, इमारतींचा जीर्णोद्धार करण्याची नितांत गरज आहे. अलीकडेच काही मुलाखती देऊन त्यांनी सरकारकडून खूप अपेक्षा आहेत, पण सध्या तरी वाट पाहावी लागेल, अशी व्यथाही व्यक्त केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

General Coaches in Trains : मध्ये रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा! मेल-एक्स्प्रेसना जोडले जाणार दोन जनरल डबे

Mumbai Water Cut: मुंबईकरांनो १७ आणि १८ ऑक्टोबरला पाणी जपून वापरा; पालिकेकडून १०% पाणी कपात

Bomb Threats to Flights : विमानांच्या उड्डाणात धमक्यांचा अडथळा! गेल्या तीन दिवसांत बारा विमानांची उड्डाणे रद्द

Nanded Bye Poll: नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून ‘या’ नावावर एकमत! पक्षाच्या स्क्रिनिंग कमिटीच्या बैठकीत काय झाली चर्चा?

Sports Bulletin 15th October 2024: ICC हॉल ऑफ फेमध्ये तीन दिग्गजांचा समावेश ते भारत-न्यूझीलंड कसोटीच्या वेळेत बदल

SCROLL FOR NEXT