Ram Navami 2024 esakal
लाइफस्टाइल

Ram Navami 2024 : रामनवमीनिमित्त अंगणात काढा ‘या’ सोप्या अन् आकर्षक रांगोळ्या, घराला येईल शोभा.!

Ram Navami 2024 : सध्या सर्वत्र रामनवमीचा आणि चैत्र नवरात्रीचा उत्साह पहायला मिळत आहे. चैत्र नवरात्रीची समाप्ती ही रामनवमीने होते.

Monika Lonkar –Kumbhar

Ram Navami 2024 : सध्या सर्वत्र रामनवमीचा आणि चैत्र नवरात्रीचा उत्साह पहायला मिळत आहे. चैत्र नवरात्रीची समाप्ती ही रामनवमीने होते. रामनवमीला हिंदू धर्मात विशेष असे महत्व आहे. उद्या सर्वत्र रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. मर्यादापुरूषोत्तम प्रभू श्रीरामांचा जन्मदिन हा रामनवमी म्हणून सगळीकडे साजरा केला जातो.

रामनवमी दरवर्षी चैत्र महिन्यात शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. धार्मिक श्रद्धेनुसार या नवमी तिथीला प्रभू श्रीरामांचा जन्म झाला होता. त्यामुळे, या दिवसाचे खास असे महत्व आहे. रामनवमीला घरोघरी रांगोळ्या काढल्या जातात, प्रभू श्रीरामांची आराधना आणि उपासना केली जाते.

रामनवमीनिमित्त अंगणात काढण्यासाठी आम्ही तुम्हाला खास रांगोळीच्या डिझाईन्स दाखवणार आहोत. चला तर मग एक नजर फिरवूयात रामनवमी स्पेशल रांगोळी डिझाईन्सवर.

पानाफुलांची रांगोळी

रामनवमीनिमित्त तुम्ही देवघरासमोर किंवा अंगणात या प्रकारची पानाफुलांची रांगोळी काढू शकता. गोलाकार आकार काढून त्यामध्ये आवडीचा रंग भरा.

Ram Navami 2024

गोलाच्या मधोमध जय श्रीराम किंवा श्रीराम असे लिहा आणि आजूबाजूने तुम्हाला हव्या त्या डिझाईनच्या फुलांची डिझाईन काढा आणि त्यामध्ये सुंदर रंग भरा. तुमची पानाफुलांची रामनवमी स्पेशल रांगोळी तयार आहे.

धनुष्यबाण रांगोळी

रामनवमीला हमखास काढली जाणारी रांगोळी म्हणजे धनुष्यबाण रांगोळी होय. तुम्ही देखील अंगणात किंवा देवघरासमोर अशी धनुष्यबाणाच्या डिझाईनची रांगोळी काढू शकता. काढायला अतिशय सोपी असणारी ही धनुष्यबाण रांगोळी काढून त्यामध्ये हवे ते रंग भरा.

राम मंदिर स्पेशल रांगोळी डिझाईन

जानेवारी महिन्यात अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांचा प्राणप्रतिष्ठापणा सोहळा पार पडला. या प्रभू श्रीरामांच्या मंदिराच्या प्रतिकृतीची डिझाईन तुम्ही रांगोळीमध्ये काढू शकता.

Ram Navami 2024

या प्रकारची रांगोळी काढण्यासाठी तुम्हाला पट्टी आणि खडूची मदत घ्यावी लागेल. पट्टी आणि खडूच्या मदतीने तुम्ही मंदिराची डिझाईन सहज काढू शकता. आता या रांगोळीत तुम्हाला हवे असलेले आकर्षक रंग भरा. ही रांगोळी काढायला अतिशय सोपी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan East Assembly Election 2024 Result Live: कल्याण पूर्वमध्ये उद्धव ठाकरे गटाला धक्का; सुलभा गायकवाड यांचा दणदणीत विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: महाराष्ट्रानं मतदान केलंय की ईव्हीएम नं केलंय; आदित्य ठाकरेंचा सवाल

Arjuni-Morgaon Assembly Election Result 2024: अर्जुनी मोरगाव मतदारसंघात राजकुमार बडोले आघाडीवर

Santosh Bangar Won Kalmanuri Assembly Election 2024 Result : संतोष बांगर विजयी; डॉ. संतोष टारफे यांचा पराभव

Ulhasnagar Assembly Election 2024 Result Live: उल्हासनगरमध्ये पुन्हा भाजपाचीच सत्ता; कुमार आयलानी यांचा विजय, ओमी कलानींना धक्का

SCROLL FOR NEXT