rasika dhamankar sakal
लाइफस्टाइल

‘समतोल साधणं गरजेचं’

सकाळ वृत्तसेवा

- रसिका धामणकर

लग्नापूर्वी मी संगीत शिक्षक म्हणून नोकरी करत होते. लग्न झाल्यानंतर मी मुंबईला आले. वर्षभराच्या आतमध्येच मी प्रेग्नंट राहिले. त्यामुळे मला ती नोकरी सोडावी लागली आणि पूर्णवेळ मी माझ्या तब्येतीची काळजी घ्यायला लागले. मुंबईतच अंतराचा जन्म झाला. ती सहा महिन्यांची असताना माझ्या पतीची बदली गोव्याला झाली. ते तेव्हा नौदलात होते आणि त्यांचं पोस्टिंग गोव्याला झालं होतं. त्यामुळे आम्हाला गोव्याला जावं लागलं.

गोव्यातही मी संगीत शिक्षक म्हणून नोकरी करत होते. सहा वर्षे गोव्यात राहिल्यावर आम्ही परत मुंबईला आलो. मुंबईला आल्यानंतर केदारचा जन्म तेथेच झाला. त्याच्या जन्माच्या आधीसुद्धा मी मुंबईमध्येच संगीत शिक्षक म्हणून नोकरी करत होते. प्रेग्नन्सीमुळे मला ती नोकरी सोडावी लागली आणि पूर्ण वेळ मी मुलांच्या संगोपनात घालवला.

केदार जवळपास तीन वर्षांचा झाल्यानंतर मी अभिनय क्षेत्रात आले.  मुलं बऱ्यापैकी मोठी होती. त्यामुळे मला खूप टेन्शन नव्हतं. घरी काम करण्यासाठी मदतनीस होती. माझ्या सासूबाई माझ्यासोबत असायच्या. त्यामुळे नाटकाचे दौरे, चित्रपटासाठी बाहेरगावी असणं किंवा मालिकांच्या चित्रीकरणासाठी १२-१३ तास सेटवर असणं, या गोष्टी व्हायच्या. माझी मुलं खरंच खूप समजूतदार होती, परिणामी मला अभिनयात करिअर करताना फारशी तडजोड करावी लागली नाही. मुलं त्यांची-त्यांची कामं व्यवस्थित करायची आणि त्यामुळे मी पूर्ण वेळ माझ्या कामावर लक्ष केंद्रित करू शकले.

केदार झाल्यानंतर मी बीएड आणि एमएड केलं आणि त्याच कॉलेजमध्ये मला असिस्टंट प्रोफेसर म्हणून नोकरी मिळाली होती. त्याचवेळी माझा अभिनय क्षेत्रातही प्रवेश झाला होता. त्यामुळे अभिनयातील करिअर आणि असिस्टंट प्रोफेसर म्हणून इकडचं करिअर, या दोन्ही गोष्टी एकाच वेळेस सुरू होत्या.

त्यावेळी माझी थोडी धावपळ व्हायची; कारण घर, मुलं, मालिका आणि नोकरी अशा सगळ्या गोष्टी सांभाळताना थोडीशी तारांबळ व्हायची; पण  मुलं, सासूबाई आणि प्रिन्सिपल मॅडमच्या पाठिंब्यामुळे या सगळ्या गोष्टी खूप छान पार पडल्या.  नोकरी, चित्रीकरण किंवा गाण्याच्या इव्हेंट्समध्ये मी कितीही व्यग्र असले, तरी पालकांच्या बैठकीला आजही जाते. मुलांच्या शाळेतले कार्यक्रम कधीही चुकवत नाही.

मला असं अजिबात वाटत नाही की, मुलं झाल्यानंतर किंवा कुटुंबासाठी आपण आपल्या करिअरकडे दुर्लक्ष करावं. मला असं वाटतं की, तुम्हाला योग्य ताळमेळ साधता आला, तर  तुम्ही दोन्हीही गोष्टी व्यवस्थित पार पाडू शकता. मला तर कुटुंब सांभाळताना आणि करिअर करताना कुठेही अडचण आली नाही.  मी फार नशीबवान आहे, की मला सगळ्या बाजूंनी पाठिंबा मिळत गेला.

जेव्हा मला कोणी प्रश्न विचारतं, की ‘तू नोकरी करतेस, शूटिंग करतेस, मुलांना पुरेपूर वेळ देतेस, सासूबाईंना दर महिन्याला दवाखान्यात घेऊन जातेस. हे सगळं कसं करतेस?’ त्यावेळी मी एकच सांगते, की थकवा हा आपल्या डोक्यात असतो. तुम्ही स्वतःला मानसिकरीत्या सांगता, की मी थकले आहे. तेव्हा आपण खऱ्या अर्थानं थकलेलो असतो.

सध्या मी ‘लग्नाची बेडी’ ही मालिका करते आहे. त्याच्यामध्ये राजश्रीचं पात्र खूप लोकप्रिय झालं आहे. त्या भूमिकेला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळतं आहे,  या गोष्टीचं मला खूप समाधान आहे आणि तेवढंच समाधान मला या गोष्टीचं आहे, की माझी मुलं आज उच्चशिक्षित आहेत. मुलगी अंतरा एमएस करून ब्रिटनमध्ये नोकरी करत आहे. मुलगा केदार व्हीजेटीआयला सध्या तिसऱ्या वर्षात आहे. 

माझी इंडस्ट्रीमध्ये एक खूप गोड, समंजस आई, काळजी घेणारी, जबाबदार आणि खूप प्रेम करणारी, घर आणि मुलांना खूप छान सांभाळणारी अशी प्रतिमा आहे. त्यामुळे मला सर्वजण म्हणतात, की ही भूमिका खरंच तुझ्यासाठीच आहे. त्यामुळे मला खूप बरं वाटतं. परिणामी, मलाही त्या भूमिकेला उत्कृष्टपणे न्याय देता येतो. 

करिअरिस्ट मुलींसाठी टिप्स...

  • आई होणं हा आपल्या एकटीचा निर्णय नसतो. त्यासाठी आई-वडील आणि दोघांच्याही कुटुंबाचा आपण विचार करायला हवा.

  • आपल्या शारीरिक स्वास्थ्याचा आणि आर्थिक परिस्थितीचाही विचार करायला हवा. सगळा विचार करून तुम्ही आई होण्याचा छान निर्णय घेऊ शकता. 

  • माझ्या आईनं मला सांगितलं होतं, की वयाच्या सहाव्या वर्षापर्यंत मुलांवर आपण जे संस्कार करतो, मुलं घरामध्ये जे वातावरण बघतात, आई-वडिलांकडून जे ऐकतात, जे बघतात त्या गोष्टी त्यांच्या स्मृतिपटलावर कायमस्वरूपी बिंबविल्या जातात. त्या गोष्टी ते कधीच विसरू शकत नाहीत आणि त्या गोष्टींची कॉपी करण्याचा मुलं १०१ टक्के प्रयत्न करतात. 

  • मुलांना वाढवताना, त्यांचं संगोपन करताना त्यांना क्वालिटी टाइम देणं खूप गरजेचं आहे. 

  • मुलांना इतिहासातील थोर व्यक्तिमत्त्वांची उदाहरणं देणं गरजेचं आहे, ज्यामुळे त्यांच्यावर चांगले संस्कार बिंबवता येतील.

(शब्दांकन : अरुण सुर्वे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT