gur purnima 2024 sakal
लाइफस्टाइल

Guru Purnima 2024: गुरुकिल्ली! बालवयातच वडिलांकडून मिळाले ताल-लयीचे बाळकडू

सकाळ वृत्तसेवा

जगमित्र लिंगाडे, तबलावादक

Guru Pornima 2024: प्रत्येक संस्कृती अन् धर्मात गुरूला अनन्य साधारण महत्त्व आहे. गुरूमुळे आपले आयुष्य सुकर होते. गुरू म्हणजे आपल्या आयुष्याच्या यशाची किल्ली असतात. हिंदू धर्मात तर गुरूला ब्रह्माचेच रूप म्हटले गेले आहे. विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी गुरुपौर्णिमेनिमित्त त्यांच्या गुरूंबद्दल व्यक्त केलेल्या या भावना.

रामध्ये सांस्कृतिक वातावरण. लहान असताना घरामध्ये तबल्याचे बोल ऐकायला मिळत गेले आणि जेव्हापासून समजायला लागले तेव्हापासून त्यांची बोटं तबल्यावर पडू लागली. वयाच्या सहाव्या वर्षी म्हणजे पहिलीला गेल्यानंतर दिवंगत पंडित सतीशचंद्र चौधरी यांच्याकडे तबलावादनाचे शिक्षण घेतले.

नंतर संतोष देशमुख यांच्याकडे काही काळ तबला वादनाचे शिक्षण घेतल्यानंतर इयत्ता तिसरीपासून म्हणजे गेल्या १४ वर्षांपासून पुण्याला धायरी येथील तालयोगी पद्मश्री सुरेश तळवलकर यांच्या तालयोगी आश्रमात गुरु-शिष्य परंपरेने तबलावादनाची साधना सुरू आहे. हा प्रसिद्ध तबलावादक जगमित्र लिंगाडे यांचा आजवरचा आणि आता सुरू असलेला प्रवास.

जगमित्र लिंगाडे यांना केंद्र सरकारची सीसीआरटी शिष्यवृत्ती, महाराष्ट्र शासनाची भारतरत्न पंडित भीमसेन जोशी युवा शिष्यवृत्ती मिळाली आहे. आतापर्यंत जगमित्र यांनी देशातील राजकोट, बंगळुरू, मुंबई, पुणे, दिल्ली, इंदौर, रत्नागिरी, हैदराबाद, अहमदाबाद आदी शहरांमध्ये तबल्याचे सादरीकरण केले आहे. गेली अनेक वर्षे गुरुपौर्णिमेनिमित्त सादर होणाऱ्या गुरू अभिवादन सोहळ्यात तबल्याचे सादरीकरण करीत आहेत.

जगमित्र म्हणतात, ‘माझे वडील आणि पहिले गुरू वडिलांनी ताल, लयीची ओळख घरातून करून दिली’. जगमित्र यांचे गुरू वडील रामलिंग लिंगाडे म्हणतात, ‘घरात तबलावादनाचे मी वर्ग घेतो. घरात संपूर्ण सांस्कृतिक वातावरण. जगमित्र लहान असताना रांगत येऊन तो माझ्या मांडीवर बसून तबल्यावर हात आपटत राहायचा. तबला हातातून सोडायचाच नाही. त्यावेळपासून त्याचे तबल्याशी नाते जुळले. आज अनेक मोठ्या गायकांशी साथ संगत करतो. ते पाहताना, ऐकताना मला मिळणारा आनंद यापेक्षा दुसरी कोणतीही मोठी गुरुदक्षिणा नाही.’

वय अवघे तीन वर्षे, खाली बसले तर बोटं तबल्यावर पडायची नाहीत. मग वडिलांनी खास छोटा तबला आणला, उंच उशा ठेवून त्यावर बसून तबला वाजवण्याला सुरुवात झाली. वडील आणि पहिले गुरू रामलिंग लिंगाडे यांच्याकडून तबला वादनाचं बाळकडू मिळाले.

- तबलावादक जगमित्र लिंगाडे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DM bought liquor: दारुची बाटली विकत घ्यायला स्वतः गेले कलेक्टर; दुकानदाराने लावला चुना

Gemini AI in Gmail :  ईमेलला उत्तर द्यायचंय! आता नो टेंशन; Gemini Gmail करणार सगळी मदत,वापरुन तर बघा

Latest Marathi News Live Updates : बिहार केडरमधील IPS शिवदीप लांडे यांचा राजीनामा

...म्हणून केदार शिंदेंनी बदलला 'बिग बॉस मराठी ५'चा होस्ट; कोहली-रोहितचं उदाहरण देत म्हणाले- महेशदादाबद्दल

Shardiya Navratri 2024: शारदीय नवरात्र 3 की ४ ऑक्टोबरला? जाणून घ्या घटस्थापनेचा शुभ मुहूर्त

SCROLL FOR NEXT