Peanut Bhel sakal
लाइफस्टाइल

Peanut Bhel: फक्त चखण्यालाच नाही तर एरवीही तोंडाला चव आणते शेंगदाण्याची भेळ, सोपी रेसिपी जाणून घ्या

जर तुम्हालाही स्नॅक्स म्हणून काही चटपटीत खायचे असेल तर तुम्ही शेंगदाण्याची भेळ बनवू शकता.

Aishwarya Musale

शेंगदाण्याची भेळ हा एक उत्तम नाश्ता आहे. जेव्हाही तुम्हाला थोडी भूक लागेल तेव्हा काही मिनिटांत तयार करता येते. अनेकदा असे घडते की दुपारचे जेवण करूनही दिवसभरात अनेकदा भूक लागते. बरेच लोक संध्याकाळच्या चहासोबत काहीतरी खाल्ल्याशिवाय राहू शकत नाहीत.

अशा परिस्थितीत तोंडाची चव बदलण्यासाठी या दोन्ही परिस्थितीत झटपट शेंगदाण्याची भेळ तयार करता येते. शेंगदाणा भेळची चव जितकी रुचकर आहे तितकीच ती बनवायलाही तितकीच सोपी आहे. जर तुम्हालाही स्नॅक्स म्हणून काही चटपटीत खायचे असेल तर तुम्ही शेंगदाण्याची भेळ बनवू शकता. आज आपण शेंगदाण्याची भेळ कशी करायची? जाणून घेणार आहोत.

साहित्य

  • भाजलेले शेंगदाणे

  • कांदा

  • टोमॅटो

  • चिंचेची चटणी

  • लाल मिरची पावडर

  • चवीनुसार लिंबाचा रस

  • मोहरीचे तेल

  • हिरवी कोथिंबीर चिरलेली

  • चाट मसाला

  • डाळिंबाचे दाणे

  • मीठ

शेंगदाण्याची भेळ रेसिपी जाणून घ्या

  • शेंगदाणे पहिले भाजून घ्या.

  • शेंगदाणे मॅश करा आणि त्यांची साल काढा

  • यानंतर त्यात कांदा, हिरवी मिरची आणि टोमॅटोचे बारीक तुकडे मिक्स करा.

  • त्यात वरील सर्व साहीत्य मिक्स करा

  • त्यानंतर वरुन लिंबाचा रस पिळून सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogendra Yadav: हरियानाच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात काय होणार? योगेंद्र यादव यांनी केलं भाकीत

Farmers Protest: दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन; उपोषणाची घोषणा! दिल्लीच्या दिशेने ट्रॅक्टर्स होणार रवाना

पाकिस्तान क्रिकेटची 'सर्कस'! Champions Trophy 2025 साठी निवडला नवा प्रभारी कोच; जेसन गिलेस्पी आता फक्त...

Winter Kitchen Cleaning Tips: किचन हे आरोग्याचे अन् रोगाचे माहेरघर! हिवाळ्यात अशा प्रकारे स्वयंपाकघराची ठेवा स्वच्छता

Share Market Closing: सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद; निफ्टी बँकेत तेजी, कोणते शेअर्स वधारले?

SCROLL FOR NEXT