Honey and cinnamon water for weight loss esakal
लाइफस्टाइल

Reduce Belly Fat : ढेरी एवढी वाढलीय की शर्टची बटणं तुटायला लागलीत? मग तर पोट कमी केलंच पाहिजे

दालचिनी आणि मध एकत्र प्या आणि फरक बघा

Pooja Karande-Kadam

 Honey and cinnamon water for weight loss : अरे यार आपलं दिवसभर AC ची हवा खाऊन खाऊन पोट एवढं वाढलंय, की आता सगळंच अवघड झालंय. बायको तर वैतागलेय बग, शर्टची तुटलेली बटणं लावून, रमेश सुरेशला सांगत होता. पुढे तो म्हणाला की, असे परवा तर लोकलमध्येच सगळ्यांसमोर बटणं तुटलं आणि समोरच उभ्या असलेल्या मुलीच्या पायात जाऊन पडलं. इतकं लज्जास्पद होतं ते माहितीय का?

खरंतर त्याच दिवसापासून रमेशने पोट कमी करण्याची धडपड सुरू केली. त्यासाठी वेगवेगळी औषधे आणि जमेल तसा व्यायाम सुरू केला. पण, म्हणावा तसा फरक पडत नव्हता.

आपल्या देशात लठ्ठपणाची बहुतेक प्रकरणे फक्त पोटाच्या चरबीपासून सुरू होतात. पोटाची चरबी कमी करण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात. मात्र, आपल्या स्वयंपाकघरात अशा काही गोष्टी उपलब्ध आहेत ज्यामुळे लठ्ठपणा आटोक्यात येऊ शकतो.

वाढते वजन जगासाठी चिंतेचे कारण बनत आहे. WHO च्या म्हणण्यानुसार, जगातील २ अब्जाहून अधिक लोक लठ्ठपणाने ग्रस्त आहेत. चुकीच्या खाण्याच्या सवयी, फास्ट फूड, जंक फूड यामुळे आजकाल लहान मुलेही लठ्ठपणाला सहज बळी पडत आहेत.

2020 च्या आकडेवारीनुसार, 5 वर्षांखालील 39 दशलक्ष मुलांचे वजन जास्त आहे.WHO च्या मते, जर एखाद्याचा बॉडी मास इंडेक्स 25 पेक्षा जास्त असेल तर त्याचे वजन वाढले आहे, परंतु जर बीएमआय 30 पेक्षा जास्त असेल तर त्याला लठ्ठपणाचा त्रास होतो. लठ्ठपणा हे अनेक रोगांचे मूळ आहे.

लठ्ठपणामुळे मधुमेह, हृदयविकार, किडनी समस्या, मेंदूची समस्या अशा समस्यांना तोंड द्यावे लागते. भारतात लठ्ठपणाचा आणखी एक प्रकार आहे. येथे बहुतेक लोकांच्या पोटात चरबी जमा होऊ लागते, जी जास्त धोकादायक असते.

आपल्या आयुर्वेदात मधाचे औषधी गुणधर्म सांगण्यात आले आहेत, परंतु दालचिनी मधात मिसळून सेवन केल्यास वजन सहज नियंत्रित करता येते. मध आणि दालचिनी दोन्ही आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. दोन्ही वजन कमी करण्यासाठी वापरले जातात. यात विविध प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स असतात जे वेगवान वजन कमी करण्यासाठी जबाबदार असतात.

सकाळी रिकाम्या पोटी मध आणि दालचिनीचे पाणी पिल्याने वजन कमी होते.  याचा वापर आपल्या देशात शतकानुशतके केला जात आहे. एका रिपोर्टनुसार दालचिनीचं पाणी प्यायल्याने रक्तातील साखरही कमी होते. हे चयापचय वाढवते, ज्यामुळे वजन देखील वेगाने कमी होते. दालचिनी लवकर चरबी कमी करते.

वजन कमी करण्यासाठी दालचिनी खूप उपयुक्त असल्याचे ही अभ्यासातून सिद्ध झाले आहे. आणि मध आणि दालचिनी एकत्र मिसळल्यास ते वजन कमी करण्याचा सर्वात मोठा शत्रू ठरतो. दालचिनी एकंदरीत वजन कमी करण्यात मदत करते. दालचिनीमध्ये असलेले अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म वजन कमी करणाऱ्यांना अतिरिक्त मदत करू शकतात.

मध आणि दालचिनी कसे बनवावे

दालचिनी आणि मधाचे पाणी घरी सहज तयार केले जाऊ शकते. तयार करण्यासाठी एक कप पाणी उकळून त्यात अर्धा चमचा दालचिनी पावडर घाला. यानंतर गॅसवरून काढून थंड करून त्यात एक चमचा मध घाला. सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन करावे. थोड्याच दिवसात तुम्हाला फरक जाणवायला लागेल. या पाण्यात लिंबू पिळू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaykumar Gore won Man Assembly Election 2024 Result: जयाभाऊचा विजयाचा चाैकार! माण-खटावमध्ये प्रभाकर घार्गे यांचा माेठा पराभव

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीचे नेते पत्रकार परिषद घेणार

Mahad Assembly Election 2024 result live : महाड विधानसभेत भरत गोगावलेंची सरशी ! ठाकरे गटाच्या स्नेहल जगतापांचा दणदणीत पराभव

Konkan Region Assembly Election Result 2024: राणे बंधूंनी तळकोकण राखले; भास्कर जाधव यांनी थोडक्यात गुहागर जिंकले

Sanjay Gaikwad won Buldana Vidhan Sabha: दोन शिवसेनेत कडवी झुंज! संजय गायकवाडांचा निसटता विजय, उद्धवसेनेच्या जयश्रींनीची तगडी फाईट

SCROLL FOR NEXT