आपण रिलेशनशिपमध्ये (Relationship)असतो त्यावेळी जीवन खूप आनंददायी वाटते. मात्र, काही कारणाने जर नात्यात तणाव निर्माण होऊ लागला तर परस्पर संबंध ही बिघडतात. अशा परिस्थितीत अनेक गोष्टींची काळजी घ्यायला हवी. जर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत (Partner)आनंदी असाल पण तणावाच्या काळात त्यांच्यापासून वेगळे होण्याचा विचार करत असाल तर स्वतःला सांभाळा. तुमच्या जोडीदारापासून वेगळे होण्याऐवजी तुम्ही काही सोप्या टिप्सचा वापर करा. जेणेकरून तुम्ही वेगळे ही होणार नाही आणि तुमचे नाते टिकून राहण्यास मदत होईल.
जर तुमच्या जोडीदाराचा मूड खराब असेल तर तुम्ही त्याचा तणाव दूर करण्यासाठी छोट्या-छोट्या युक्ती लढवू शकता. जस की डान्स करणे. नृत्यामधून खूप ऊर्जा मिळते. आपोआप माइन्ड चेंज होते. त्यामुळे ज्यावेळी तुम्ही दुःखी असाल त्यावेळी जोडीदाराचा हात धरा आणि संगीत लावून डान्स करा.
नात्यात जवळीकता (Intimacy)वाढवण्याचा प्रयत्न करा. यामुळे जोडीदार एकमेकांशी असलेले कनेक्शन फिल करतो. जिव्हाळ्याच्या माध्यमातून तुम्ही काहीही न बोलता तुमच्या जोडीदाराच्या भावना समजून घेवू शकता. तुमच्या जोडीदाराचे प्रेम अनुभवा आणि ते व्यक्तही करा.जोडीदाराशी जवळीक वाढवा
जेव्हा वाद सोडवण्याचा मार्ग योग्य नसतो त्यावेळी प्रकरण खूप वाढते. अनेकदा मारामारी किंवा वादविवादाच्या वेळी जोडीदाराला भान राहत नाही. आणि कोणत्याही गोष्टींचा विचार न करता तो बोलत राहतो. ते समोरच्या व्यक्तीला मनाला लागेल याचे भान त्याला राहत नाही.अनेक वेळा इच्छा नसतानाही लोक चुकीच्या ठिकाणी चुकीच्या पध्दतीने रिअॅक्ट होतात. भांडणात तुमचे शब्द आणि वर्तन कसे नियंत्रित करायचे ते शिका.
प्रत्येकाला स्वत:ची प्रशंसा ऐकायला आवडत असते. तुमच्या जोडीदाराची एक छोटीशी प्रशंसा आपापसातील सर्व मतभेद, कटुता, दूर करण्यास मदत करते. या सवयीमुळे भांडणे हळूहळू कमी होतील आणि तुमचा पार्टनर तुमच्याबद्दल सर्वकाही समजून घेण्याचा प्रयत्न करू लागेल. याचा चांगला फायदा तुम्हाला नात घट्ट करण्यास होईल.
एकत्र राहत असताना आपल्या जोडीदाराच्या सवयी आपल्याला माहित असतात. कोणत्या परिस्थितीत आपला जोडीदार कसा रिअॅक्ट होतो हे समजते. तरीही काहीवेळा अडाणी राहायला शिका यात एक वेगळी मजा असते. त्यामुळे पुढच्या वेळी कोणताही निर्णण घेण्याआधी त्याला पहिला विचारा मगच निर्णय घ्या. किंवा त्याने काही सांगण्यास सुरुवात केली तर तुम्हाला ती गोष्ट माहित असली तरी, त्याला त्याविषयी बोलत करा. माझ्यावर विश्वास ठेव अस त्याला म्हणा.त्याला तुमचा निरागसपणा खूप आवडेल. यामुळे तुमच रिलेशन अजून घट्ट होण्यास मदत होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.