‘चविष्ट’ उद्योग sakal
लाइफस्टाइल

‘चविष्ट’ उद्योग

महिला आणि स्वयंपाकघर याचे लहानपणापासूनचे नातेच वेगळे असते. लहानपणापासून आपण आपल्या आईला स्वयंपाकघरात वेगवेगळे पदार्थ बनविताना पाहत असतो. तिच्याकडून मी अनेक पदार्थ शिकले.

सकाळ वृत्तसेवा

प्रेरक-वेधक

सुकृती पेंढारकर (महिला उद्योजिका)

महिला आणि स्वयंपाकघर याचे लहानपणापासूनचे नातेच वेगळे असते. लहानपणापासून आपण आपल्या आईला स्वयंपाकघरात वेगवेगळे पदार्थ बनविताना पाहत असतो. तिच्याकडून मी अनेक पदार्थ शिकले. मी शाळेत असल्यापासूनच वेगवेगळ्या पदार्थांशी माझेही नाते जुळू लागले होते. मी शाळेत असताना केक, पिझ्झा, पास्ता, वगैरे पदार्थ बनवत असे; पण असे कधी वाटले नव्हते की, याच क्षेत्रात व्यवसाय करण्याची कधी इच्छा होईल.

कोरोना काळ हा माझ्यासाठी वेगळ्या अर्थाने सुवर्णकाळ ठरला. याच काळात मी माझ्या उद्योगाची सुरुवात केली. या काळात बेकरी किंवा केक शॉप सुरु नव्हते. सर्व नागरिक आपल्या घरात होते. त्या काळात बाहेरचे पदार्थ खाण्याबद्दल लोकांमध्ये प्रचंड भीती होती. लोक घरीच सारे काही बनवत होते; पण लॉकडाऊन शिथील होत गेला तसे घरी न बनणारे असे; पण स्वच्छतेची सर्व काळजी घेऊन बनवलेल्या घरगुती पदार्थांना मागणी वाढू लागली. माझ्या घरात मी केलेल्या पिझ्झांचा दरवळ परिसरात पोहोचल्यावर शेजारपाजारहून पिझ्झा-केकच्या ऑर्डरींबद्दल विचारणा सुरू झाली. तसेही स्वच्छतेची सर्व काळजी घेऊन बनवलेले पिझ्झा, वगैरे इटालियन पदार्थ तसेच केक्स देणारे एकही आऊटलेट आमच्या स्थानिक परिसरात नव्हते. याचाच विचार करून मी स्वतःच्या घरामध्ये तळमजल्यावर ‘सुबेक्स - क्लाऊड किचन’ची स्थापना केली.

आपल्याकडे मिळणारा पिझ्झा इटालियन, अमेरिकन चवीचा असतो, जो भारतीयांना तितकासा न रुचणारा असा असतो. हे पाहून आपल्या लोकांना आवडेल असा पिझ्झा सॉस मी बनवला. एक-दोन करत अनेकांच्या ऑर्डर्स सुरू झाल्या. इतक्या, की अल्पावधीत डिलिव्हरी बॉय ठेवावा लागला. नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळू लागला. लांबून लांबून ग्राहक पुनःपुन्हा मागवून खाऊ लागले. हा सारा काळ माझ्यासाठी आव्हानात्मक ठरला; मात्र ग्राहकांचा प्रतिसाद पाहता मी याच क्षेत्रात काम करायचा निर्णय घेतला आणि त्याच दिशेने वाटचाल करायचे ठरवले. खरेतर मी फार्मसी ग्रॅज्युएट आणि माझे पदव्युत्तर शिक्षण हे परफ्युमरी-कॉस्मेटिक्समध्ये झाले आहे. मला परफ्युमरी या क्षेत्रात काम करायची इच्छा होती. फ्रान्समध्ये या विषयात पदव्युत्तर शिक्षण घ्यायचे होते; पण कोरोनामुळे फ्रान्सला जाणे शक्य झाले नाही. मला कधीही वाटले नव्हते की, परफ्युमच्या सुवासात रमणाऱ्या मला स्वयंपाकघरातील मसाला आणि वेगवेगळ्या पदार्थांच्या अरोमाची आवड निर्माण होईल. पण म्हणतात ना काही गोष्टी या ठरवून होत नाहीत. तसेच काहीसे माझेदेखील झाले.

लहानसे क्लाऊड किचन चालवताना फार गुंतवणूक नव्हती; पण पिझ्झाला मिळत असलेला उत्तम प्रतिसाद पाहून त्यामध्ये मोठी वाढ करणे आणि काहीतरी नावीन्यपूर्ण ट्विस्ट देणे अपेक्षित होते. ‘वुड फायर्ड पिझ्झा’ आपल्याकडे अगदी दुर्मीळ होता. तो चालू करावा असा विचार झाला. यामध्ये गुंतवणूक लागणार होती; पण संपूर्ण कुटुंबाचे पाठबळ आणि बँकेने विश्वासाने बळ दिल्याने ऑक्टोबर २०२२ मध्ये पुण्यात सदाशिव पेठेत ‘सुबेक्स’चा ‘वुड फायर्ड पिझ्झेरिया’ सुरू करण्याचे मोठेच धाडस केले. ग्राहकांनीच एवढा मौखिक प्रचार केला, की ग्राहकांची वाट पहावीच लागली नाही. इनोव्हेटिव सोशल मीडिया मार्केटिंगवरही भर दिल्याने लांबून लांबून ग्राहक पिझ्झासाठी येऊ लागले. या व्यवसायामध्ये ब्रेकइव्हन करणे हे मोठेच आव्हान असते; पण अनेक आव्हाने पार करून आत्मविश्वासाने नफ्यासह वाटचाल सुरू आहे.

आई-वडिलांचा पाठिंबा

उद्योगक्षेत्रात येण्याच्या निर्णयावर मला कुटुंबातून भक्कम पाठिंबा मिळाला. सुरुवातीच्या आर्थिंक गुंतवणुकीसाठीदेखील त्यांनीच मदत केली. त्यामुळे मला नेहमी वाटते की, आपल्या यशामध्ये आपले कुटुंब हे खूप भूमिका पार पाडत असते.

स्वतःचा मार्ग शोधा

एक उद्योजिका म्हणून मला खूप आव्हानांना सामोरे जावे लागले. विशेषतः कर्मचारी किंवा आर्थिक बळ यांच्यासाठी. मात्र, अंततः तुम्हाला तुमचा मार्ग शोधावा लागतो. उद्योग हा तुमच्या लहान मुलासारखा असतो, तुम्हाला त्याची जडणघडण, संगोपन करावे लागते.

(शब्दांकन : सुचिता गायकवाड)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT