Relationship Tips 
लाइफस्टाइल

Relationship Tips : तुमच्या नात्यात प्रेम कमी झालंय! या गोष्टी एकदा तपासा

एकमेकांना अधिक समजून घेण्यासाठी पुरेसा वेळ द्यायलाच हवा

सकाळ डिजिटल टीम

Relationship Tips : नवे लग्न झाल्यावर एकमेकांना किती वेळ देऊ अन् किती नाही असं होतं. नवरा बायको एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले असतात. सुरूवातीला एकमेकांच्या स्वभावाकडे दुर्लक्ष केलं जातं. मग जसा वेळ जातो तश्या जोडप्यात (Couple) कुरबुरी वाढयला लागतात. काहीतरी चुकतंय हे लक्षात येंत. तुमच्या दोघांमध्ये आधीसारखा स्पार्क किंवा उत्साह नाही हे लक्षात येतं. एकमेकांबरोबर असताना अस्वस्थ वाटायला लागतं. असं तुमच्याबाबतीत होतय का? हे समजून घेण्याचे चार संकेत आहेत. हे संकेत समजून घेतल्यास तुम्हाला तुमच्या नात्याला (Relationship) पुन्हा संधी देता येईल. कारण एकमेकांना अधिक समजून घेण्यासाठी पुरेसा वेळ द्यायलाच हवा.

Relationship Tips

हे आहेत चार संकेत

सतत एकमेकांवर चिडणे- तुम्ही जोडीदारासोबत वेळ न घालवण्यासाठी कारणं शोधत असाल, तसंच तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असाल किंवा त्यांच्याऐवजी घरातल्या इतर लोकांना वेळ देत आहात का? असं कशामुळे होत असावे? तुम्ही दोघे एखाद्या गोष्टीवरून रागावल्याने असे झाले असावे. पण असं होणं गंभीर आहे.

बोलणं बंद होणे- पूर्वी करायचात त्याप्रमाणे आता तुम्ही एकमेकांशी भावना शेअर करत नाही का? अनेक दिवसांपासून तुम्हा दोघांचे बोलणे बंद झाले आहे का? याकडे लक्ष देण्याचीही तुम्हाला गरज वाटत नसेल तर परिस्थिती कठीण आहे,

Relationship Tips

एकमेकांचा कंटाळा येणे- तुम्हाला एकमेकांबरोबर वेळ घालवयाला कंटाळवाणे वाटते का? पूर्वी तुम्हाला एकमेकांना कधी भेटतोय, कसा वेळ घालवायचा याबाबात उत्साह असायचा. आता मात्र तो नाहीसा होऊन तुम्ही एकमेकांपासून दूर राहणे पसंत करता आहात.

सहकार्याचा अभाव- तुमचा जोडीदार तुम्हाला चांगल्या प्रकारे साथ देतोय पण त्याचे तुम्हाला काहीच वाटत नाही. उदाहरणार्थ- जोडीदाराला तुमचे छंद, आवड, घर-नोकरी याविषयी पर्वा नसल्याचे तुम्हाला जाणवते आहे का? जर त्याला या गोष्टीत अर्थ जाणवत नसेल तर तुमचं प्रेम आटलय असं समजा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Latest Maharashtra News Updates : ७५ पेक्षा जास्त सभा घेतल्या, सरकारनं केलेली कामं लोकांसमोर मांडत गेलो; मुख्यमंत्र्यांनी सांगितला प्रचाराचा लेखाजोखा

IND vs AUS: 'रोहितच्या जागेवर असतो, तर मी पण...', ऑस्ट्रेलियाच्या हेडचं हिटमॅनच्या सुट्टीवर भाष्य

AUS vs PAK : पँट सांभाळू की चौकार ...? संकटात सापडला पाकिस्तानचा खेळाडू, Video Viral

Ajit Pawar: अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली; दादांनी स्वतः दिला आवाज अन् मुलगी पुढे आली

SCROLL FOR NEXT