Relationship Tips esakal
लाइफस्टाइल

Relationship Tips : या गोष्टी परफेक्ट असतील तर तुमचं नातं कधीच तुटणार नाही!

तुमचा जोडीदारावर विश्वास आहे का?

Pooja Karande-Kadam

Relationship Tips : आजकाल जितकी लग्न जमतात त्याहून अधिक ती मोडल्याच्या केस आहेत. सहजच कधी कोर्टाच्या बाहेर फेरी माराल तर लक्षात येईल, घटस्फोटाच्या किती केसेस सुरू आहेत. लग्न जमवणं आणि ते टिकवणं यात जमिन आसमानाचा फरक आहे 

काहीवेळा कुटुंबियांनी ठरवलेलं तर काहीवेळ प्रेमविवाह केलेले लग्न मोडतात. यात कारणही किरकोळ असतात. काही लग्न आर्थिक अडचणींमुळे मोडतात. तर काही संशयावरून मोडतात.

लग्न झाल्यावर केलं जाणारं एकमेकांच कौतुक जेव्हा एकमेकांवर टिका करण्यात बदलतं. तेव्हा नात्यात कलह सुरू होतात. जर तुम्हालाही तुमच्यात असलेलं प्रेम संपू नये असं वाटत असेल तर काही गोष्टींचा विचार करणं गरजेच आहे.(Relationship Tips : How strong is your relationship? Find out from these 4 things, you will be able to remove the shortcomings)

नात्यातलं प्रेम अन् प्रेमाची माणसं जपता आली पाहिजेत.  जर तुम्हालाही तुमचं प्रेम जपायचं असेल तर हे प्रश्न स्वत:ला विचारा. ज्यामुळे तुमच्या नात्यात असलेला दुरावा संपेल आणि नव्या प्रेमाची अनुभूती तुम्हाला घेता येईल.

तुम्ही जोडीदाराचा आदर करता का?

तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारू शकता की तुमच्या जोडीदाराचा तुम्हाला किती आदर आहे. आपण एकमेकांना किती समजून घेतो. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही एकमेकांचा आदर करत असाल तर तुमच्यातील नाते घट्ट आहे.

कारण,एकवेळ प्रेम देऊ नका, हट्ट पुरवू नका पण कोणाचाही अपमान करणं चुकीचच आहे. जोडीदाराकडून मिळालेला अपमान जास्त लक्षात राहतो. त्यामुळेच जोडीदाराला प्रेम देता तितकच त्याला रिस्पेक्टही द्या. (Husband Wife

तुमचा जोडीदारावर विश्वास आहे का?

विश्वास हा प्रत्येक नात्याचा पाया असतो. तुम्ही स्वतःला हा प्रश्न देखील विचारू शकता की तुमचा त्यांच्यावर किती विश्वास आहे. तुमच्यामध्ये शंका घेण्यासारखे काही आहे का, जर उत्तर 'नाही' असेल तर याचा अर्थ असाही होतो की तुमचे नाते मजबूत आहे.

तुम्ही तुमचं नातं जितकं पारदर्शक ठेवाल तितकं ते अधिक घट्ट होईल. त्यामुळे तुमच्यावर जोडीदाराला शंका येईल असं काही लपवू नका. आणि तसेच जोडारालाही तुम्ही तितकी मोकळीक द्या.  

तुम्ही एकमेकांना समजून घेता का?

जर तुमचा जोडीदार तुम्हाला प्रत्येक प्रसंगी साथ देत असेल तर तुम्ही एकमेकांना समजून घेण्यात यशस्वी ठरला आहात. कुटुंबातील इतर सदस्यांसमोर जोडीदाराचा कोणी अपमान केला तर तुम्ही जोडीदाराची बाजू घेता. तर तुम्ही एक चांगले जोडीदार आहात.

जोडीदाराच्या आजारापणात तुम्हाला न सांगता त्याच्या भानवा, दुखणं समजत असेल. तर हा तुमच्या नात्यातील प्लस पॉईंट ठरतो.  (Relationship Tips)

तुम्ही एकमेकांपासून किती दिवस दूर राहू शकता का?

कागी जोपड्यांमध्ये एकमेकांना सोडून राहतोय असं काही फिलिंगच दिसत नाही. तुमचा जोडीदार घरी नसेल तर तुम्ही त्याच्या आठवणीत व्याकूळ होत असाल तर तुमचं नातं परफेक्ट आहे. ही ओढ दोन्ही बाजूने असायला हवी.

जर तुम्हाला असे वाटत असेल की तुम्ही तुमच्या जोडीदारापासून 1 आठवड्यापेक्षा जास्त काळ दूर राहू शकत नाही किंवा तुमचा पार्टनर देखील तुमच्यापासून एक आठवड्यापेक्षा जास्त काळ दूर राहू शकत नाही, तर हे दर्शवते की तुमच्यातील नाते खूप मजबूत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT