Relationship  sakal
लाइफस्टाइल

Relationship Tips: ब्रेकअपमुळे निराश आहात? अशी करा आयुष्याची नव्याने सुरुवात

ब्रेकअपनंतर स्वत:ला कसे सावरायचे, जाणून घ्या.

Aishwarya Musale

ब्रेकअप किंवा घटस्फोट अशा गोष्टी आहेत ज्या माणसाला खूप वाईटरित्या मनातून खचवतात. या परिस्थितून गेल्यानंतर काही लोक असे वागतात की आता त्यांच्याकडे जगण्यासाठी अजून काही कारणच उरलं नाहीये.

त्यांच्या डोक्यात सतत हेच विचार येत असतात की आपण ज्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम केलं आज तोच व्यक्ती आपल्या आयुष्यात नाहीये आणि हीच गोष्ट त्यांना डिप्रेशनसोबतच अनेक नकारात्मक गोष्टींनी भरुन टाकते.

ब्रेकअपला अपयश समजू नका

आपण प्रेमात काही उगाच पडत नाही; एखादा माणूस आपल्या मनाच्या खूप जवळ येतो, आपल्या सहवासात सतत असतो, आपणही त्याला मनातलं सगळ सांगतो, पण अचानक जेव्हा छोट्याश्या कारणाने ते नातं तुटतं, तर आपला हिरमुसड होतो आणि आपल्याला हे खूप मोठं अपयश वाटू शकतं.

सर्वात आधी, तुम्ही ब्रेकअप झाला आहे हे स्वीकारा आणि दोघांचे मार्ग आता वेगळे झाले आहेत हे देखील स्वीकारा. तुमच्या मनात कोणते गिल्ट असेल तर ते काढून टाका आणि या गोष्टी लक्षात ठेवा.

काही दिवस बाहेर फिरायला जा

जर तुम्ही एका जागीच राहिलात तर तुम्ही त्याच व्यक्तीचा विचार करत राहाल आणि स्वतःला त्रास करून घ्याल त्यापेक्षा जरा काही दिवस दुसरीकडे फिरायला गेलात तर वातावरण बदलणं तर होईलच पण तुम्हालाही जरा बरं वाटेल.

स्वतःला कधीही कमी लेखू नका

ब्रेकअपचे कारण काहीही असो, परंतु स्वतःला दोष देण थांबवा कारण याने तुम्हाला अस वाटेल की तुम्ही कुठेतरी कमी पडलात आणि नातेसंबंध हाताळू शकत नाही. आपल्या नात्यातील कटू आठवणी विसरून पुढे जाण्यातच शहाणपणा आहे, तरच तुम्ही आत्मविश्वासाने आयुष्य जगू शकाल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah : राज्यात १६० पेक्षा जास्त जागांवर महायुतीचा विजय निश्चित..! : अमित शाह

Yogi Adityanath : काँग्रेसमध्ये इंग्रजांचे ‘जिन्स’, पक्षाकडून जात, भाषेवरून देशात फूट : योगी आदित्यनाथ

Women’s Asian Champions Trophy: गतविजेत्या भारतीय महिला संघाचे घवघवीत यश; जपानवर मात करत गाठलं अव्वल स्थान

Priyanka Gandhi : भाजप सरकारचा महाराष्ट्राशी भेदभाव! प्रियांका गांधी यांचे गडचिरोलीतील सभेत टीकास्त्र

मतदान कर्मचाऱ्यांना यंदा भत्ता मिळणार ऑनलाईन! ट्रायल पेमेंटसाठी आज 1 रुपया पाठवला जाईल; बॅंक खात्यांची होईल खात्री अन्‌ बुधवारपासून उर्वरित रक्कम मिळणार

SCROLL FOR NEXT