लाइफस्टाइल

Relationship Tips : प्रियकर छोट्या-छोट्या गोष्टींवरुन रागवत असेल तर अशी काढा त्याची समजूत

नातं टिकवण्यासाठी छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते.

Aishwarya Musale

जोडप्यांमधलं प्रेमाचं नातं जेवढं मजबूत असतं तितकेच दुप्पट नाजूकही असतं. प्रत्येक जोडप्यांमध्ये छोट्या-मोठ्या गोष्टींवरून शाब्दिक वाद घडत असतात. या वादांनंतर काही जण एकमेकांशी टोकाचा अबोला धरतात.

‘समोरच्याच व्यक्तीची चूक आहे, त्यामुळे मी माघार घेणार नाही. स्वतःहून संवाद साधणार नाही. सॉरी तरी मुळीच म्हणणार नाही’, अशा अ‍ॅटिट्युडमुळे तुमचं इतक्या वर्षांचं नातं तुटण्याची भीती अधिक असते. 

नात्यात आनंद आणि शांतता टिकवून ठेवण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करतो, परंतु असे असतानाही अनेकदा वेगवेगळ्या कारणांमुळे वाद सुरू होतात. अशा स्थितीत आपल्या जोडीदाराला पुन्हा पुन्हा राग का येतो हे समजत नाही.

राग ही एक नैसर्गिक भावना आहे जी प्रत्येक नात्यात असते. याचा परिणाम नातेसंबंधावर होतो. जोडीदाराने कमी रागवावे असे वाटत असेल तर काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

तुमच्या जोडीदाराच्या आवडीनिवडी समजून घ्या

समजा तुम्हाला एखाद्या ठिकाणी फिरायला आवडत असेल तर याचा अर्थ असा नाही की तुमच्या जोडीदारालाही त्याच ठिकाणी फिरायला आवडते.

तुमचा पार्टनर तुम्हाला समजून घेतो आणि तुम्ही त्याची निवड समजून घेता, या दोन्ही गोष्टी कोणत्याही नात्यात खूप महत्त्वाच्या असतात. अनेकवेळा आपण नात्यात आपल्या आवडी-निवडी लादायला लागतो ज्याचा नकारात्मक परिणाम नात्यावर होतो.

मर्यादा ठरवू करू नका

अनेक वेळा नात्यात लोक सीमारेषा ठरवतात ज्यामुळे नाते खूप त्रासदायक बनते. काही काळानंतर नात्यात खूप भांडण होण्याचे हे एक मोठे कारण आहे.

जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या कुटुंबाबद्दल ती गोष्ट जाणून घ्यायची असेल जी सांगण्यास तो तयार नाही तर विषय फार ताणू नका.काही काळाने इतर मार्गांनी ती गोष्ट जाणून घेण्याचा प्रयत्न करा. जोडीदाराचा मूड बघून बोला.

आदर खूप महत्वाचा आहे

आज कोणत्याही नात्यासाठी आदर देणे ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. तुमचा जोडीदार तुम्हाला आदर देईल अशी तुमची अपेक्षा असेल, तर त्या बदल्यात तुम्हालाही त्याला सन्मान द्यावा लागेल. अनेक वेळा आपण आपल्या जोडीदाराशी कोणत्याही स्वरात बोलतो ज्यामुळे नकारात्मकता वाढते.

छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्या

नात्यात आनंद आणण्याचा प्रयत्न करा. जर तुमच्या जोडीदाराला एखादी गोष्ट आवडत नसेल तर त्यांना ती गोष्ट समजावून सांगा आणि त्यांची बाजूही समजून घ्या.

तुमच्या जोडीदाराला तो तुमच्यासाठी किती महत्त्वाचा आहे हे जाणवून द्या. तसेच, कामात मदत करा. यामुळे नात्यातील वारंवार नाराजीची समस्या संपते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT