Men With Beard: Sakal
लाइफस्टाइल

Beard Men: दाढी असलेले पुरूष खरंच रोमँटिक असतात का? यामागचं संशोधन नेमकं काय सांगतं...

Men With Beard: दाढी असणारे पुरूष रोमँटिक असतात की नाही हे एका अभ्यासावरून समोर आले आहेत.

पुजा बोनकिले

Men With Beards: सर्वच मुलींना प्रेमळ आणि काळजी करणारा जोडीदार हवा असतो. यामुळे जोडीदाराची निवड करताना मुलाच्या स्वभावाकडे तर कधी दिसण्याकडे लक्ष देतात. पण जेव्हा विश्वासार्ह नात्याचा विचार केला जातो तेव्हा या दोन्ही गोष्टीपेक्षा त्या व्यक्तीचे व्यक्तीमत्व आणि गुणवत्ता पाहली जाते.

खरं तर, कोणतेही नातं टिकवून ठेवण्यासाठी एकमेकांबद्दल प्रेम आणि आदर असणे गरजेचे असते. पण नातेसंबंधावर अलीकडेच एक अभ्यास समोर आला आहे, ज्यात दाढी असणारे पुरूष अधिक प्रेमळ आणि विश्वाहार्य असतात. विशेष म्हणजे, या अभ्यासानुसार दाढी नसलेल्या पुरुषांपेक्षा दाढी असलेले पुरुष अधिक प्रेमळ असू शकतात हे सिद्ध झाले आहे.

अभ्यासात आली माहिती समोर

अर्काइव्हज ऑफ सेक्शुअल बिहेविअर मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, दाढी ठेवणारे पुरुष नवीन जोडीदाराच्या शोधात असतातच असे नाही. असे लोक त्यांच्या जोडीदारासोबत आनंदी असतात. तर क्लीन शेव्ह असलेले पुरुष अनेकदा नवीन जोडीदाराच्या शोधात असतात. नातेसंबंधावर झालेल्या या अभ्यासात 18 ते 40 वर्षे वयोगटातील सुमारे 414 पुरूष सहभागी झाले होते.

दाढीचा काय संबंध?

दाढी असलेले पुरूष आणि नातेसंबंधाबाबत काढलेल्या निष्कर्षांमागे अनेक कारणे सांगितली आहेत. त्यात पिहिला युक्तीवाद असा आहे की दाढी वाढवणे आणि त्याची काळजी घेण्यासाठी खुप मेहन घ्यावी लागते. दाढी वाढवणे हे एक कठिण आणि वेळखाऊ काम आहे. यामुळे दाढी असलेले पुरूष संयमी आणि शिस्तबद्ध स्वबावचे असतात.

अभ्यासात असेही म्हटले आहे की एखाद्या व्यक्तीला चेहरा स्वच्छ ठेवण्यासाठी वारंवार क्लीन शेव्ह करावे लागते. पण दाढीने चेहरा स्वच्छ ठेवण्यासाठी चेहऱ्यावर असलेल्या केसांची जास्त काळजी घ्यावी लागते. ज्यासाठी अधिक मेहनत,प्रोडक्ट आणि वेळ लागतो. जो पुरूष चेहऱ्यावरचे केस चांगले ठेऊ शकतो तो सर्व कामे यशस्वीरित्या पुर्ण करू शकतो.

अभ्यासानुसार, ज्या पुरुषांच्या चेहऱ्यावर दाढी असते ते रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर त्यांच्या नातेसंबंधावर आणि कुटुंबाकडे जास्त लक्ष देतात. त्यामुळे या अभ्यासानुसार, पुढच्या वेळी तुम्ही डेटवर जाल तेव्हा चेहऱ्यावर केस असलेल्या पुरुषाचा जोडीदार म्हणून विचार करू शकता.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT