Divorce Couple 
लाइफस्टाइल

टॉक्सिक रिलेशनशीप म्हणजे काय?

शर्वरी जोशी

पहिल्यांदाच प्रेमात पडलेले अनेक जण सतत आपल्या पार्टनरचा म्हणजेच जोडीदाराचा विचार करत असतात. अनेकदा हे लोक स्वत:पूर्वी जोडीदाराचा विचार करतात आणि त्यांना पहिली प्रायोरिटी देतात. मात्र, कालांतराने नात्यातील हा गोडवा कमी होऊ लागतो. परिणामी, नात्यात अनेकदा दुरावा येऊ लागतो. यातूनच मग हे नातं टॉक्सिक रिलेशनशीपकडे वळू लागतं. म्हणूनच आज आपण टॉक्सिक रिलेशनशीप म्हणजे काय आणि नात्यातील टॉक्सिक कसं ओळखावं ते पाहुयात. (relationship-tips-reasons-behind-toxic-relationship-ssj93)

टॉक्सिक रिलेशनशीप म्हणजे काय?

टॉक्सिक रिलेशनशीपमध्ये पार्टनर केवळ स्वत: चा विचार करत असतो. आपल्या जोडीदाराला काय वाटतंय, त्याच्या भावना काय याचा त्याला जराही विचार नसतो. विशेष म्हणजे अनेकदा जोडीदार एकमेकांपासून दूर पळण्याचा प्रयत्न करत असतात. या नात्यात प्रेमाचा लवलेशही नसतो.

'या' पद्धतीने ओळखा टॉक्सिक रिलेशनशीप

१. उणीवा शोधणे -

जर नात्यात प्रेम असेल तर त्यातील गोडवा टिकून राहतो. जोडीदार एकमेकांच्या प्रेमाचा आदर करतात. पण जर तुमच्या नात्यात दुरावा निर्माण होत असेल आणि तुम्हाला जोडीदारासोबत बोलताना, फिरताना कंटाळा येत असेल तर तुम्ही टॉक्सिक रिलेशनशीपकडे वळत आहात हे समजा. तसंच कधीकाळी तुमच्यावर जीवापाड प्रेम करणारा जोडीदार सतत तुमच्यातील चुका, उणीवा काढत असेल तर हे टॉक्सिक रिलेशनशीपचं पहिलं लक्षण आहे.

२. जोडीदारासोबत स्पर्धा -

जोडीदारासोबत भांडण झाल्यावर आपण ते भांडण मिटवण्याचा प्रयत्न करतो. मात्र, टॉक्सिक रिलेशनशीपमध्ये जोडीदार भांडण करताना जिंकण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे, भांडण झाल्यावर तो तुमच्याकडून सॉरी म्हणावं अशी अपेक्षा करतो किंवा आपण कसे योग्य हे सांगण्याचा कसोशीने प्रयत्न करतो. या सगळ्यात आपला जोडीदार दुखावला जातोय याचीही त्यांना फिकीर नसते. ते सतत आपण कसे योग्य हे सांगायचा प्रयत्न करतात.

३. बोलण्याची पद्धत बदलणे -

एकेकाळी प्रेमाने बोलणारा जोडीदार अचानकपणे ओरडून किंवा चिडून बोलत असेल तर नात्यात दुरावा आलाय समजावं. किंवा, बरेचदा तुम्ही बोलत असताना तो इरिटेट होऊ लागतो. तुमचं बोलणं त्याला नकोसं होऊ लागतं.

४. द्वेष निर्माण होणे -

टॉक्सिक रिलेशनशीपमध्ये अनेकदा व्यक्ती आपल्या पार्टनरचा तिरस्कार किंवा द्वेष करु लागते. तसंच जोडीदाराचं यश त्यांच्या डोळ्यात खुपू लागतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदींच्या काँग्रेसवरील टीकेपासून ते वर्षा उसगांवकरांनी केलेल्या मोठ्या खुलाशापर्यंत, वाचा आजच्या महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

Nashik Crime : एमजी रोडच्या मोबाईल मार्केटमध्ये ‘ॲपल’ची बनावट ॲक्सेसरीज्‌; गुन्हे शाखेच्या युनिट एकचा छापा

Russell, Pooran, Hetmyer यांची श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेतून माघार; तर १७ वर्षीय खेळाडूला संघात स्थान

Team India ला मोठा धक्का! Shivam Dube टी-20 मालिकेतून बाहेर, 'या' खेळाडूला मिळाली संधी

Mumbai Metro Line 3 ला मोदींकडून हिरवा कंदील; आधी मजुरांशी संवाद, नंतर विद्यार्थ्यांशी गप्पा, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT