Relationship Tips how to say sorry to partner esakal
लाइफस्टाइल

Relationship Tips : चूक केलीय पण जोडीदाराची माफी मागायला कमीपणा वाटतोय? या गोष्टी लक्षात ठेवा!

how to say sorry to partner: तुमच्या जोडीदाराला योग्य पद्धतीने सॉरी कसं म्हणावं?

Pooja Karande-Kadam

Relationship Tips :  नात्यात भांडणे खूप सामान्य आहेत. अनेकदा पार्टनर छोट्या छोट्या गोष्टींमध्ये एकमेकांशी भांडतात. काही वेळा हे छोटे-मोठे भांडण ब्रेकअपचे ही कारण बनते. अशावेळी भांडणानंतर जोडीदाराला कसं पटवायचं हे तुम्हाला माहित असणं खूप गरजेचं आहे. जोडीदाराची माफी मागण्याचा योग्य मार्ग तुम्हाला माहित असेल.

जेव्हा आपण नातेसंबंधांना महत्त्व देतो तेव्हा सॉरी म्हणणे, मन वळवणे आणि माफी मागणे खूप महत्त्वाचे असते. पण, तुमच्यासोबत असे कधी घडले आहे का की, तुम्ही एखाद्या मित्राची, नातेवाईकाची किंवा जोडीदाराची माफी मागितली, पण ती गोष्ट सुधारण्याऐवजी बिघडली!

तुमच्या जोडीदाराला योग्य पद्धतीने सॉरी कसं म्हणावं हे तुम्हाला माहित असेल तर तुमचं नातं निरोगी राहिल. प्रेम व्यक्त करण्याच्या मार्गाप्रमाणेच सॉरी म्हणण्याची पद्धतही कळली पाहिजे. चला तर मग आम्ही तुम्हाला सॉरी म्हणण्याचे 4 मार्ग सांगतो, ज्यामुळे तुमचं नातं मजबूत राहील.

तुम्ही तुमच्या जोडीदाराची फसवणूक केली असेल, तर तुम्ही ही गोष्ट लपवू शकत नाही. तुमच्या जोडीदाराचा विश्वास परत मिळवण्यासाठी, तुम्ही दाखवून दिले पाहिजे की तुम्ही तिच्या भावना तुम्ही समजू शकता. तिचा विश्वास परत मिळवण्यासाठी आवश्यक ते बदल तुम्हाला करणे गरजेचे आहे.

 तुम्ही गमावलेला विश्वास पुन्हा निर्माण करण्यासाठी तुम्हाला तुमची विश्वासार्हता परत मिळवणे आवश्यक आहे. प्रत्येक नात्याचा पाया विश्वास असतो. तुमच्या नात्यात त्या गोष्टीची कमी आहे.

चुका मान्य करा

 सॉरी म्हणण्याचा उत्तम मार्ग म्हणजे आपल्या जोडीदाराला सांगणे की आपल्या वर्तनाबद्दल आपण किती खेद व्यक्त करता. अशा वेळी सॉरी म्हणताना गिल्ट नीट व्यक्त करा. मला तुझी चूक सांग.

चुकीची जबाबदारी घेणे

जोडीदाराला सॉरी म्हणताना नेहमी लक्षात ठेवा की, ही तुमची चूक आहे. कोणत्याही संकोचाशिवाय आपल्या जोडीदारासमोर आपल्या वाईट वागणुकीची जबाबदारी घ्या.

पश्चाताप होणे

जोडीदारासोबत झालेल्या वाईट वागणुकीबद्दल पश्चात्ताप करा. जर तुम्ही आवेशात काही बोललात तर माफी मागा आणि त्याबद्दल तुम्हाला खेद आहे हे सांगा. तुम्ही त्यांना वचन देता की भविष्यात कोणतीही चूक होणार नाही.

हेही वचन द्या

भांडण वाढले तर जोडीदाराची माफी मागताना अशी चूक पुन्हा होणार नाही याची खात्री द्या. तुम्ही केलेली चूक पुन्हा करणार नाही, असे त्यांना सांगा. तसेच जोडीदाराला पुन्हा आनंदी करण्याचे मार्ग अजमावून पहा.

इगो दाखवू नका 

मी कधीच चूक करू शकत नाही, मी कधीच चुकीचा असू शकत नाही, असा विचार अनेक पुरुषांमध्ये असतो. पण त्याची आय, मी, माय सेल्फ ही वृत्ती सर्वकाही बरोबर करण्याऐवजी सर्व काही खराब करू शकते, कारण त्याची ही सवय त्याला स्त्रियांची माफी मागू देत नाही आणि यामुळे त्यांचे नाते बिघडते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT