Relationship tips esakal
लाइफस्टाइल

Relationship Tips : पार्टनर प्रेम नाही तर तूमचा वापर करतोय, कसं ओळखाल?

जोडीदार तूमचा केवळ वापर करून घेतोय?

सकाळ डिजिटल टीम

प्रेम ही एक सुंदर भावना आहे. आणि पार्टनर एकमेकांना आनंदी ठेवण्यासाठी काहीही करायला तयार असतात. प्रेमात पडल्यावर लोक एकमेकांच्या प्रेमात आंधळे होतात. त्यामूळे खोटे प्रेमही त्यांना खरे वाटू लागते. डोळ्यावर प्रेमाची पट्टी असल्याने पार्टनर आपल्याला फसवत आहे हेही स्पष्ट दिसत नाही.

प्रेमात पडल्यावर जग सुंदर होतं असं म्हणतात. त्यामूळे सगळ्या जगाकडे डोळसपणे पाहण्याचा स्वभाव बदलून आपण नकळत फसवले जातो. आपले मित्र, कलिग आपल्याला याची जाणिव करून देत असतात. पण, पार्टनरवरील प्रेमात आपण आकंठ बुडालेलो असतो. त्यामूळे ते आपल्याला दिसत नाही. अशावेळी पार्टनर आपला केवळ वापर करून घेतोय हे कसं ओळखावं ते पाहुयात.

त्याला वेळ असेल तेव्हा बोलतो?

केवळ तूमचा काहीतरी फायदा आहे म्हणून तूमच्यासोबत राहणारा जोडीदार त्याच्यावेळेनुसार तूम्हाला वेळ देतो.तसेच, जेव्हा एखाद्या गोष्टीची गरज असते तेव्हा तो जवळीक साधतो, लाडीगोडी लावतो आणि काम झालं की तूम्हाला फाट्यावर मारतो. तेव्हा समजून जा की तूम्ही ब्रेकअप केलेलं चांगलं ठरेल.

तो नेहमी बरोबर

नात्यात असताना कोणत्याही चुकीला तो तूम्हाला जबाबदार धरतो. अगदी गाडीतील पेट्रोल संपलं तरी तूमच्यावर जाळ काढतो. उगीच चीडतीड करतो तर समजून जा की तो तूमच्यावर खरं प्रेम करत नाही. जर जोडीदार तुम्हाला प्रत्येक चुकीच्या गोष्टीसाठी जबाबदार धरत असेल तर ते तुमच्यासाठी योग्य नाही हे समजून घ्या.

पार्टनरला तूम्ही की तूमचा पैसा महत्त्वाचा ?

मर्जी गाजवतोय?

याशिवाय अनेकवेळा असे घडते की पार्टनर त्याची मर्जी तूमच्यावर चालवत आहे. किंवा पार्टनर त्याच्या/तिच्या इच्छा तुमच्यावर लादत असेल. त्याच्या मनाविरूद्ध तूम्ही वागलात तर तो रागवत असेल तर अशा व्यक्तीपासून दूर गेलेलं चांगलं.

पार्टनरवर अंधळा विश्वास टाकू नका

लग्नाचा विषय काढून तर बघा

तुम्ही खूप दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये आहात आणि आता लग्न करू इच्छित असाल. पण, बराच काळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतरही, जर तुमचा जोडीदार लग्नाबद्दल बोलताना चिडला, किंवा तो लग्न करायला टाळत असेल तर सोडून द्या त्याला. कारण तो फक्त तूमचा पैसा किंवा फिजिकल गोष्टींसाठी तूमच्या जवळ आहे.

मित्र/मैत्रिणी महत्त्वाचे?

जोडीदार तूमच्यासोबत प्लॅन बनवतो आणि अचानक खोट सांगून मित्रांसोबत जातो. तो तूम्हाला वेळ देत नाही. तर त्याला तूम्ही आवडत नाही. तरीही तो तूमच्या सोबत का आहे याचे उत्तर तूम्हीच शोधा आणि लवकर वेगळे व्हा.

फ्लर्ट करतो

तूम्ही सोबत असताना किंवा नसताना तूमचा जोडीदार इतर मुलींशी किंवा मुलांशी फ्लर्ट करत असेल तर त्याला तूमच्यात इंटरेस्ट नाही हे समजून जा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT