Relationship Tips in marathi esakal
लाइफस्टाइल

Relationship Tips : तुम्हाला एखाद्याबद्दल असलेली भावना प्रेम आहे की आकर्षण, कसं ओळखाल?

सकाळ डिजिटल टीम

Difference Between Crush And Love :

 कॉलेज शाळा आणि ऑफिसमध्ये आपले अनेक क्रश असतात. ते लोक आपल्याला आवडत असतात त्यांचा सहवास आपल्याला आवडत असतो पण आपण त्यांच्या प्रेमात आहोत की नाही हे मात्र कळत नसतं. काही मोजकेच लोक असे असतात ज्यांच्यावर आपण प्रेम करतो. आपण त्यांच्या प्रेमात पडतो.

पण आपल्याला जी व्यक्ती आवडते ती आपली फक्त क्रश आहे की तिच्यावर आपलं प्रेम आहे हे ओळखणं गरजेचं आहे. कारण अनेकवेळा या गैरसमजामुळे चांगले मित्र-मैत्रिणी वेगळे होऊ शकतात. त्यामुळेच तुम्हाला एखाद्याबद्दल वाटत असलेली भावना प्रेम आहे की फक्त एक आकर्षण आहे, हे कसे ओळखायचे हे पाहुयात. (Relationship Tips )

प्रेम आणि क्रश म्हणजे काय?

सोप्या भाषेत सांगायचं तर प्रेम ही एक भावना आहे तर क्रश हे आकर्षण आहे. एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडण्याची भावना खूप सुंदर असते. तर एखाद्या व्यक्तीबद्दल वाटणारे आकर्षण तुम्हाला महागात पडू शकते. कारण, आजकाल आकर्षणाला प्रेमाची लेबल लावून अनेक मुलं-मुली वाहवत जात आहेत. त्यामुळेच, खरं प्रेम कसं ओळखायचं हे पाहुयात.

आकर्षण कालांतराने बदलते 

तुम्हाला एखाद्या व्यक्तीची स्टाईल, कपड्यांचा सेन्स, दिसणे आवडत असेल तर ते आकर्षण असेल. कारण, या गोष्टी कालांतराने बदलू शकतात. पण, तुम्हाला माहितीय का? आपल्याला एखाद्या व्यक्तीबद्दल असलेलं प्रेम अतूट असेल तर आपण तिला गुण-दोषांसकट स्विकारतो. हेच खरं प्रेम आहे.

व्यक्तीसोबतच्या भविष्याबद्दल विचार करता का?

तुम्हाला एखाद्या व्यक्तीबद्दल आकर्षण असेल तर तुम्ही फक्त तिचा विचार करता. त्या व्यक्तीला भेटल्यावर काय बोलावं, तिच्यासोबत कुठे जावं असा विचार सतत तुम्ही करत असता. पण, प्रेम असं नसतं. तुम्ही एखाद्या व्यक्तीवर खरं प्रेम करत असाल तेव्हा तुम्ही तिच्यासोबत संपूर्ण जीवन व्यतीत करण्याचे प्लॅनिंग करता. तिच्यासोबत लग्नाची स्वप्न पाहता अन् त्यासाठी तुम्हाला जे काही करावं लागत असेल ती मेहनत घेता.

व्यक्तीची परिस्थिती बदलल्याने प्रेम बदलत नाही

समजा कॉलेजमध्ये चर्चेत असलेली तरूणी किंवा एखादा हँडसम तरूण तुम्हाला आवडत असेल. तर कालांतराने तो तुम्हाला आवडायचा बंद होईल. कारण, तुमच्या त्या क्रशची जागा कोणी इतरांनी घेतली असेल. पण, प्रेमात असं नसतं. खऱ्या प्रेमात ती व्यक्ती एकच असते. मग ते प्रेम शाळेतलं असो वा कॉलेज किंवा ऑफिसमधील.

ऑफिसमधील टॉप रँकमध्ये असलेली एखादी कलिग आपल्याला आवडते तिच्यावर आपलं प्रेम असेल. तर ती कलिग अपयशी झाल्यानंतरही ती तुम्हाला आवडेल. कारण, तुमचं प्रेम तिच्या यशावर नाही तर तिच्यावर असतं. हाच बेसिक फरक प्रेम अन् आकर्षणात आहे.

व्यक्तीमधील गुण-दोष सुधारणारं प्रेम असतं

तु्म्हाला ऑफिसमधील कलिगबद्दल आकर्षण वाटत असेल. पण, तुम्हाला काही वेळाने कळालं की तो व्यसनांच्या आहारी गेला आहे. तो दिसायला फक्त चांगला आहे पण त्यांच वागणं,राहणीमान ठिक नाही. तर तु्म्हाला तो आवडेनासा होता. पण प्रेमात याउलट घडतं. प्रेम असलेली व्यक्ती कितीही चुकली तरी आपण तिला सोडून जात नाही. कारण, प्रेमात आपण जोडीदाराला त्याच्या सर्व गुण-दोषांसह स्विकारतो. त्याच्यात असलेल्या वाईट गोष्टी आपण सुधरवण्याचा प्रयत्न करतो.

क्रश अन् खरं प्रेम असलेली व्यक्ती दूर गेल्यावरच समजतं

तुमचा क्रश तुमच्यापासून दूर गेला तर तुम्हाला फारसा फरक पडणार नाही. कारण, क्रश जीवनातून गेला तरी तुम्ही तुमचं जीवन जगू शकता. पण, तुमचं खरं प्रेम तुमच्यापासून दूर गेलं, त्याच्याशी बोलणं कमी झालं तर तु्म्ही नाराज होता. तुमचं कशातच मन लागत नाही. हाच फरक आहे आकर्षणात अन् खऱ्या प्रेमात. त्यामुळे गोंधळून न जाता तुम्हाला होत असलेली भावना प्रेम आहे की आकर्षण हे ओळखा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mukesh Ambani यांनी खरेदी केलं १००० हून अधिक कोटीचं विमान; देशात असं Jet कोणाकडेच नाही; काय आहे खास?

Yashasvi Jaiswal ने सुनील गावसकरांचा विक्रम मोडला, सर डॉन ब्रॅडमन यांच्या पंगतीत जाऊन बसला

Mumbai Senate Election: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित; सुप्रिया सुळेंची सडकून टीका

IND vs BAN 1st Test : Shakib Al Hasanचं 'काळा' धागा चघळण्यामागचं मॅजिक; दिनेश कार्तिकनं उलगडलं लॉजिक

Priyanka Gandhi: जेपी नड्डांच्या पत्राला प्रियंका गांधींचं उत्तर; म्हणाल्या, चुकीच्या भाषेचा वापर...

SCROLL FOR NEXT