Relationship Tips esakal
लाइफस्टाइल

Relationship Tips : पैशांवरून नवरा बायकोच्या नात्यात दुरावा येतोय? या टिप्स करा ट्राय

प्रत्येकाला आपल्या जोडीदाराकडून अपेक्षा असतात कालांतराने जोडीदाराच्या या अपेक्षांची यादी वाढत जाते.

सकाळ डिजिटल टीम

Relationship Tips : आजच्या धावत्या जगात पैशाने सुख विकत घेता येत नाही हे वाक्य लहान मुलही मानणार नाही. खरंतर आता पैसा हा प्रत्येक नात्याच्या आनंदाची गरज झाला आहे. प्रत्येक सुख-दुःखात सोबत राहण्याचे वचन घेतलेल्या नवरा-बायकोतही पैशावरून वाद होतात अन् परिणाम एकमेकांमधले वाद वाढू शकतात. जिथे दोघेही पार्टनर कमावता आहेत तिथे या वादांना आयतं निमंत्रण मिळतं.

माणसाची प्रत्येक गरज आणि आवड पूर्ण करण्यासाठी पैसा सर्वात महत्वाचा आहे. प्रत्येकाला आपल्या जोडीदाराकडून अपेक्षा असतात. कालांतराने जोडीदाराच्या या अपेक्षांची यादी वाढत जाते. अनेकदा त्यात स्वतःसाठी काहीतरी महागड घेयचं असतं तर अनेकदा आपली जीवन रहाटी बदलावी यासाठी या अपेक्षा वाढत असतात.

मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये आर्थिक समस्या येतच असतात. प्रत्येक घरात ही समस्या येतच असते, पण याच्याकडे दुर्लक्ष करणे तुमचं आणि तुमच्या जोडीदाराचं नातं बिघडवू शकतं. पैशाच्या वादामुळे अनेकदा लग्न मोडतं. अशात जर तुम्ही या टिप्स फॉलो केल्या तर आपले नाते जपू शकाल...

या कारणांमुळे जोडप्यांमध्ये पैशाचा दबाव वाढतो

लग्नानंतर केवळ दोन व्यक्तीच नाही तर दोघांच्याही जबाबदाऱ्याही एका बंधनात बांधल्या जातात. यामध्ये स्वतःच्या आनंद आणि इच्छांसोबतच कुटुंबातील इतर सदस्यांचा खर्च, कर्ज, मुलांचे शिक्षण आणि संबंधित खर्चाचा समावेश आहे.

कधीकधी लोक इतरांशी बरोबरी करण्यासाठी उगाच खर्च करतात आणि यामुळे मतभेद होऊ शकतात.

या गोष्टींमुळे होतात भांडणं

- अनेकदा लोकं आपल्या जोडीदारासोबत आपल्या आर्थिक मुद्द्यांवर चर्चा करत नाहीत.

- आपल्या जोडीदाराचा पैसे खर्च करतांनाचे विचार एकमेकांना पटत नाही.

- नाहक पैशाची केलेली उधळपट्टी.

- उगाच केलेली काटकसर.

पैशावरून झालेली भांडणं नात्याला कमकुवत करतात

जर तुम्ही पैशाशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांवर वारंवार बोलून चिडचिड करू लागलात, तर तुमचा पार्टनर तुमच्याशी पुन्हा त्याबद्दल बोलणे टाळेल शिवाय यामुळे तुमचा पार्टनर तुमच्याशी त्याच्या इच्छा, गरजा याबद्दल काहीही शेयर करणार नाही. तुमच्यातला संवाद तुटक होत जातो. लोकं आपल्या आर्थिक गोष्टी वैयक्तिकपणे हाताळू लागतात, ज्यामुळे नात्यात अंतर निर्माण होते.

या टिप्स करा फॉलो

- आपल्या पार्टनरशी शांत आणि मोकळेपणाने गप्पा मारा.

- जेव्हा तुम्ही आर्थिक समस्यांबद्दल बोलायला बसता तेव्हा तुमच्या जोडीदारापासून काहीही न लपवता कर्ज, उत्पन्न, खर्च आणि गरजा याबद्दल बोला.

- आर्थिक समस्यांवर आपल्या पार्टनरचे म्हणणे नीट ऐका आणि एकत्रितपणे निर्णय घ्या.

- कोणत्याही नात्यात संवाद फार महत्वाचा असतो, तो असेल तर तुमच्यात कधीही दुरावा निर्माण होणार नाही.

नवरा-बायकोंपैकी एकच कमावत असेल तर असे करा मनी मॅनेजमेंट

- नवरा बाहेर जावून कमावतो आणि बायको घराची सगळी व्यवस्था बघते अशी परिस्थिती असेल तर पतीने न मागता घर चालवण्यासाठी दर महिन्याला पैसे द्यावेत.

- बायकोनेही आपल्या घरासाठी गरजेची असलेली एक रक्कम ठरवून घ्यावी.

- एकमेकांना निराश न करता संसार करणं गरजेच आहे.

जर दोघे पार्टनर कमवत असतील तर असे करा मनी मॅनेजमेंट

- जर दोघेही कमवत असतील तर पैशांच्या समस्या लवकर सुटतात. अशात दोघांच्या पैशांचे व्यवस्थित प्लॅनिंग करा.

- शक्यतोवर एकाचाच पगार खर्च होईल याच्याकडे लक्ष द्या म्हणजे दुसऱ्याचे पैसे आपोआप सेव्ह होतील.

- पण हे करतानाही अनेकवेळा जोडप्यांमध्ये भांडणं होतात. त्यामुळेच वेळ पडल्यावर एकमेकांच्या जबाबदाऱ्या घेण्यास तयार असणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघात कोणी घेतली आघाडी ? भाजप विरुद्ध शरद पवार गटात थेट लढत

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळमध्ये सुनील शेळके यांची दणदणीत आघाडी

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT