Caring Thought For Daughter 
लाइफस्टाइल

वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलींचा हक्क नेमका किती?

आपल्याकडे मुलींना कायमच परक्याचं धन म्हटलं जातं.

सकाळ डिजिटल टीम

आपल्याकडे मुलींना कायमच परक्याचं धन म्हटलं जातं. लग्नानंतरही सासर तिचं पहिलं घर असं सांग माहेरच्या अनेक गोष्टींमधून तिला वगळलं जातं. विशेष म्हणजे अनेकांना माहेरच्या संपत्तीची वाटणी होत असताना तिचा विसर पडतो. परंतु, कायद्यानुसार, मुलीचा वडिलांच्या संपत्तीवर मुलांइतकाच हक्क असतो. त्यामुळेच, वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलीचा नेमका किती वाटा किंवा हिस्सा असतो याविषयी जाणून घेऊयात.(relationships daughters right in ancestral property in india)

कायद्यानुसार मुलींना समान हक्क

हिंदू वारसाहक्क कायद्याअंतर्गंत Hindu Succession Act अविवाहित मुली या Hindu Undivided Family कुटुंबातीलच एक सदस्य असतात. त्यामुळे वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलींना समान हक्क दिला जातो. २००५ मध्ये केंद्र सरकारने Hindu Succession Act 1956 मध्ये काही बदल केले. या बदलानुसार, मुलींना मुलांच्या बरोबरीने वडिलांच्या संपत्तीमधील हक्क मिळेल असं स्पष्ट केलं. २००५ नंतर मुलींनादेखील Hindu Succession Act मध्ये कर्ता म्हणजेच प्रॉपर्टीच्या हक्कदाराचे अधिकार देण्यात आले. हे हक्क प्रथम केवळ मुलांनाच मिळत होते.

२०१८ मध्ये या कायद्यात पुन्हा बदल करण्यात आले. त्यानुसार, वडिलांच्या संपत्तीवर केवळ मुलीचाच नाही तर मुलीच्या मुलांचादेखील (नातवंडांचा) हक्क असेल असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं. थोडक्यात, जन्मानंतर मुलीचा वडिलांच्या संपत्तीवर हक्क आहे. त्यामुळे तिच्या वाट्याला आलेली संपत्ती ती भावाला, बहिणीला किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीला देऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार , GRAP-4 लागू...

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

आज सायंकाळी 6 वाजता थंडावणार प्रचाराच्या तोफा! मतदानापूर्वीच्या 30 तासातील हालचालींवर भरारी पथकांचा वॉच; बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान

Amit Shah : राज्यात १६० पेक्षा जास्त जागांवर महायुतीचा विजय निश्चित..! : अमित शाह

SCROLL FOR NEXT