Removing Stuck Ring  esakal
लाइफस्टाइल

Removing Stuck Ring : हिऱ्याची अंगठी रूतून बसलीय? हाताला इजा न पोहोचवता अशी काढा अंगठी

अंगठी बोटात अडकली आहे, घाबरू नका हे उपाय करा

Pooja Karande-Kadam

Removing Stuck Ring : गर्भावस्थेत किंवा इतर काही कारणास्तव हात सुजला असताना तुमच्या बोटांतील तुमची आवडती अंगठी बोटात घट्ट रुतून बसल्याचा अनुभव तुम्हालाही आला असेल.

अशा वेळी योग्य पद्धतीनं अंगठी बोटांतून बाहेर न काढता आल्यानं बोटांनाही इजा होण्याची शक्यता असते. किंवा अंगठीच न काढता आल्यानं ती बोटांत आणखीनच घट्ट रुतून बसते आणि त्यामुळे आरोग्यालाही धोका पोहचण्याची शक्यता असते.

पण, बोटात घट्ट रुतून बसलेली तुमची आवडती अंगठी तुमच्या बोटांना इजा न पोहचवता आणि अंगठी सुरक्षित ठेऊन काढण्याची पद्धत अगदी सोपी आहे. ती कशी काढायची ते पाहुयात.

अनेक वेळा बोटांमध्ये अंगठी अडकते आणि ती काढणे अशक्य वाटते. अशा परिस्थितीत घाबरून जाण्याऐवजी काही ट्रिक्सची मदत घेतली तर ते सहज बाहेर येऊ शकते.

अमेरिकन सोसायटी फॉर सर्जरी ऑफ द हँडच्या मते, अनेक वेळा सांधेदुखीमुळे शरीरात बदल होतात. वजन वाढतं, अपघातामुळं हात सुजतो. त्यावेळी लोकांना अंगठी काढताना अनेक वेळा त्रास सहन करावा लागतो. जर तुमच्यासोबतही असे काही घडले असेल तर आम्ही तुम्हाला बोटांमधील अंगठी कशी सहज काढू शकता ते सांगत आहोत.

घट्ट अंगठी नकोच, कारण

जर्नल ऑफ हँड सर्जरीमध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार, खूप घट्ट अंगठी घातल्याने दीर्घकालीन आकुंचन होऊ शकते, जी खूप चिंतेची बाब आहे. कारण त्यामुळे 'एम्बेडेड रिंग सिंड्रोम' होऊ शकतो जी धोकादायक स्थिती आहे

घट्ट अंगठी घालण्याचे तोटे माहीत असूनही बरेच लोक घट्ट अंगठी घालतात. पण जर तुम्हाला घट्ट अंगठी घातल्यामुळे संसर्ग झाला तर त्याची शक्यता आणखी वाढेल. नंतर हा संसर्ग बोटांसह संपूर्ण हातामध्ये पसरु शकतो. अशा त्रस्त लोकांवर उपचार करणे खूप कठीण होऊन जाते आणि शेवटी डॉक्टरांना हात कापावा लागतो.

बोटात अंगठी अडकली की नाहक त्रास सहन करावा लागतो

बोटात अडकलेली अंगठी कशी काढायची

रिबन वापरा

सर्व प्रथम बोटांना तेल लावा. आता एक सॅटिन रिबन घ्या आणि ती रिंगमध्ये ठेवा आणि एक प्रकारे बाहेर काढा. अशा प्रकारे रिबनचा अर्धा भाग अंगठीच्या एका बाजूला असेल आणि अर्धा दुसऱ्या बाजूला असेल. आता ही रिबन अंगठीच्या समोरच्या जॉइंटवर हळूवारपणे गुंडाळा आणि ती चांगली धरून ठेवा. आता रिबनला अंगठीच्या मागच्या बाजूने पुढच्या बाजूला हलवत असताना दुसऱ्या बाजूला खेचत राहा. अशा प्रकारे अंगठी सहज बाहेर येईल.

व्हॅसलीनचा वापर

तुम्ही एका चमच्यात व्हॅसलीन घ्या आणि त्यात व्हिटॅमिन ई तेलाचे दोन थेंब घाला. ते चांगले मिसळा आणि अंगठी आणि त्या बोटाला 1 मिनिट मालिश करा. आता हळू हळू रिंग गोल गोल फिरवून बाहेर आणा. लक्षात ठेवा की जबरदस्तीने खेचू नका, गोलाकार हालचालीत बोटाने बाहेर काढा. अंगठी काही वेळात सहज बाहेर येईल.

थंड पाणी वापरा

एका मोठ्या भांड्यात थंड पाणी ठेवा आणि त्यात थोडा वेळ हात बुडवा. असे केल्याने हातांची सूज कमी होईल. 5 ते 10 मिनिटांनंतर, बेबी ऑइल किंवा कोणत्याही प्रकारचे कंडिशनर लावा आणि ती फिरवत असताना अंगठी ओढा. ते सहज बाहेर येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crizac IPO: क्रिझॅक आणणार 1000 कोटींचा आयपीओ, सेबीकडे पेपर्स जमा...

'शाका लाका बूम बूम' मधील संजूची लगीनघाई; किंशुक वैद्यला लागली हळद, 'या' ठिकाणी पार पडणार लग्नसोहळा

Share Market Closing: शेअर बाजारात जोरदार तेजी; सेन्सेक्स-निफ्टी अडीच टक्क्यांनी वाढले, आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये तुफान खरेदी

AUS vs IND 1st Test: पहिल्याच दिवशी १७ विकेट्स! भारत-ऑस्ट्रेलियाची फलंदाजी कोलमडली, पण गोलंदाजांनी मैदान गाजवलं

Latest Maharashtra News Updates : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यांनी घेतला शहरी वृक्ष व्यवस्थापन कार्यशाळेत भाग

SCROLL FOR NEXT