आजकाल अनेक प्रकारच्या ब्रा बाजारात उपलब्ध आहेत. महिलांना आरामदायक वाटतील, खेळताना त्रासदायक ठरणार नाहीत. तसेच, ब्रेस्टचा शेप मेंटेन करतील असे विविध प्रकारच्या ब्रा आहेत. त्यातही पॅडेड ब्रा खास आहे. कारण, स्तनांचा आकार लहान असलेल्या अन् स्तनपान करणाऱ्या मातांसाठी आरामदायक अशी ही ब्रा आहे.
बॅडेड ब्रा रेग्युलरपेक्षा जरा वेगळ्या असतात. यांमध्ये पॅड घातलेले असतात ज्यामुळे निपल्सही झाकले जातात. महिलांची पहिली पसंती अशा पॅडेड ब्राला आहे.
पण जेव्हा या ब्रा खराब होतात, लूज होतात तेव्हा त्या फेकून दिल्या जातात. पॅडच्या वरील ब्रा खराब झाली असली तरी आतील पॅड चांगल्या स्थितीत असते. त्याचा वापर तुम्हाला अनेक कामात होऊ शकतो. अशाच या पॅड्सचा कसा वापर केला जाऊ शकतो हे पाहुयात.
पिन सेफर बनवा
तुम्ही हेअर स्टाईल करण्यासाठी वापरणाऱ्या पिना ठेवण्यासाठी यांचा वापर करू शकता. टोकदार असेलल्या हेअरपिन्स इतरत्र हरवल्या, पडल्या तर लहान मुलांना इजा होण्याची शक्यता असते.
एका प्लास्टिकच्या डबीवर हे पॅड फेव्हिस्टीकने चिटकवा. आणि हेअर पिन्स त्यामध्ये लावून ठेवा. तुम्ही आकर्षक सजावटीत या पिन्स ठेवल्या तर ते एखादी शोभेची वस्तू ठेवलीय असेही दिसेल.
हेअर स्टाईलसाठी वापरा
आजकाल पफ घालण्याची फॅशन आहे. केसांचा समोरील भाग फुगवून पिनअप केला जातो. आणि मागे अनेक प्रकारच्या हेअरस्टाईल केल्या जातात. तुम्ही या पॅडचा वापर करून पफची हेअरस्टाईल अगदी पटकन करू शकता. फक्त केसांचा पुढील भाग वेगळा करून पॅड केसांवर पिनअप करून घ्या. त्यानंतर पफसाठी बाजूला केलेले केस त्या पॅडवरून पिनअप करा.
तुम्ही जून्या ड्रेसला लावू शकता.
तुम्ही एखादा स्लिवलेस ड्रेस, वनपिस घेतला असेल. ज्यात ब्रा घालणे गरजेचेच असते. पण पट्ट्या दिसतील म्हणून तुम्ही ब्रा घालणे टाळत असाल. तर, हे जुने पॅड तुमच्या खूप कामी येतील. तुमच्या ड्रेसला आतील बाजूस ब्रेस्टवर हे पॅड शिवून घ्या. त्यामुळे तुम्हाला आरामदायक वाटेल. आणि ब्रा घालण्याची गरजही पडणार नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.