Bike Modification RTO Rules in Maharashtra: अनेकांना जसं आपण नीट नेटके राहतो चांगले कपडे घालतो त्याप्रमाणेच आपल्या दुचाकीलाही नीट नीटकं ठेवणं तिचं काळजी घेणं आवडतं. मग ती बाईक असो किंवा स्कुटी.
आपल्या दुचाकीवर जीवापाड प्रेम करणारे अनेक तरुण तुम्ही आजवर पाहिले असतील. रस्त्यावर धावणाऱ्या असंख्य बाईक्समध्ये आपली बाईक हटके दिसावी असं प्रत्येक बाईकप्रेमीला वाटतं. यासाठी अनेक जणं बाईक मॉडिफाय Bike modify करत असतात.
बाईकमधील काही साधे बदल वगळता जर तुम्हाला बाईकमध्ये मोठे बदल करायचे असतील तर त्यापूर्वी तुम्हाला RTO ची परवानगी घेणं बंधनकारक आहे . अन्यथा तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो किंवा तुमचं लायसन्सही रद्द होवू शकतं. RTO Rules for modification of Motor Bikes
१ एप्रिल २०२३ पासून RTO ने बाईक मॉडिफिकेशनचे नियम अधिक कठोर केले आहेच. त्यामुळे बेकायदेशिर रित्या बाईक मॉडिफाय करणाऱ्यांना मोठा दंड भरावा लागू शकतो इतकचं काय जेलही होवू शकते.
त्यामुळे बाईक माडिफाय करण्यापूर्वी RTO चे नियम जाणून घेऊनच बाईकमध्ये बदल करणं केव्हा अधिक चांगलं ठरेल. त्यासाठी कोणत्या प्रकारचं मॉडिफिकेशन कायदेशीर आणि कोणतं बेकायदेशीर हे जाणून घेणं गरजेचं आहे.
या मॉडिफिकेशनला आहे परवानगी Valid bike Modification
कायद्यानुसार बाईकमध्ये काही छोट्या बदलांना परवानगी आहे. यात तुम्ही गाडीवर काही ग्राफिक्स डिझाईन करू शकता. मात्र गाडीचा मुळ रंग बदलणार नाही हे यावेळी लक्षात ठेवा.
तसचं तुम्ही बाईकमधील इंजन बेली, टेल टिडी, डिकल्स, विज़र्स, विंगलेट मध्ये बदलं करू शकता.
बाईक मॉडिफिकेशन करताना तुम्ही गाडीचे टायर Tyres बदलू शकता. हे पूर्णपणे कायदेशीर आहे. मात्र गाडीच्या मॉडल वेरियंटला सपोर्ट करणारेच टायर तुम्ही बसवू शकता. गाडीच्या क्षमतेला आणि मॉडलला सपोर्ट न करणारे टायर बसवणं अवैध आहे.
हे देखिल वाचा-
या मॉडिफिकेशनला RTO ची परवानगी नाही
बाइक मध्ये एग्जॉस्ट कैन (exhaust can), ओपन साइलेंसर, हॅन्डल तसचं इंजिनमध्ये बदल करण्यास मनाई आहे.
बाईकचं इंजिन आणि रंग बदलण्यास सक्त मनाई आहे.
याशिवाय गाडीचे आरसे काढणं, फॅन्सी नंबर प्लेट हे देखील बेकायदेशिर आहे.
एकंदरितच बाईक मॉडिफाय करताना त्यात मोठे बदलं करणं बेकायदेशिर आहे. तुम्ही केवळ साधारण बदल करू शकता. मात्र तरिही तुम्हाला बाईकचा रंग किंवा इंजिन बदलायचं असेलच तर त्यासाठी तुम्हाला RTO ची परवानगी घ्यावी लागेल. म्हणजेच तुम्हाला RTO ची NOC गरजेची आहे. फार्ममध्ये तुम्हा बाईकला कोणता रंग द्यायचा आहे हे नमूद करावं लागेल. त्यानंतरच RTO कडून रंग बदलण्यासंदर्भातील ऑर्डर दिल्या जातील.
बाईकचा रंग बदलण्यासाठी असा करा RTO ला अर्ज
ज्या आरटीओ (RTO) कार्यालयात तुमच्या बाईकचं रजिस्टेशन झालंय त्या कार्यालयात तुम्हाला आरसी बुक सहित बाईकच्या रंगाचे आणि किमतीचे तपशिल जमा करावे लागतील.
बाईकचा रंग बदलण्यासाठी एनवीएम फार्म भरा. त्यानंतर रंग मॉडिफिकेशनसाठी आरटीओच्या परवानगीसाठी तुम्हाला काही दिवस प्रतिक्षा करावी लागेल.
आरटीओची परवानगी मिळाल्यानंतर तुम्ही कोणत्याही अधिकृत वर्कशॉपमधून बाईकचा रंग बदलून घेऊ शकता. ज्या रंगासाठी आरटीओ परवानगी दिलीय तोच रंग बाईकला देणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही पुन्हा मत बदलून वेगळा रंग निवडू शकत नाही.
गाडीचा रंग बदलल्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला आरटीओ ऑफिसमध्ये जावं लागेल. यावेळी तुम्हाला बाईकच्या बदललेल्या रंगाचा सॅम्पल म्हणजेच एखादा फोटो परवानगी पत्रासह आरटीओमध्ये जमा करायचं आहे.
आरटीओ अधिकारी तुमच्या रजिस्टेशन सर्टिफिकेटमध्ये नव्या रंगाचा उल्लेख नमूद करेल. यासाठी तुम्हाला आरटीओटी ठरलेली फी भरावी लागेल.
बाईकचं इंजिन बदलण्यासाठीही तुम्हाला पुन्हा आरटीओ कार्यालयात धाव घ्यावी लागेल. बाईकचं इंजिन बदलल्यास Bike Re registration करावं लागेलं. यासाठी तुम्हाला नवा अर्ज द्यावा लागेल. जुनं आणि नवं इंजिन हे एकाच इंधनावर चालणार असावं ही अट आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.