Sadhguru Health Tips esakal
लाइफस्टाइल

Sadhguru Health Tips : या पदार्थांसमोर नॉन व्हेजही फेल, प्रोटीन मिळवण्यासाठी खुद्द सद्गुरु खातात या 3 गोष्टी

शरीरात उर्जेचा स्तर वाढवण्याचे आणि मांसपेशी मजबूत बनवण्याचे आणि शरीराला ताकद देण्याचे काम प्रोटीन करते.

साक्षी राऊत

Sadhguru Health Tips : प्रोटीन शरीरासाठी फार आवश्यक आहे. शरीराच्या विकासासाठी शरीरात योग्य प्रमाणात प्रोटीन असायला हवं . शरीरात उर्जेचा स्तर वाढवण्याचे आणि मांसपेशी मजबूत बनवण्याचे आणि शरीराला ताकद देण्याचे काम प्रोटीन करते.

शरीरात प्रोटीनच्या कमतरतेमुळे स्नायू कमकुवत होणे, अंगदुखी आणि थंडी जाणवणे, शरीरात सूज येणे आणि वेदना होणे, केसांच्या समस्या, त्वचेचे आरोग्य आणि चमक कमी होणे, त्वचा कोरडी होणे, हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणे, मुलांमध्ये वाढ कमी होणे. , रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होणे इत्यादी गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.

प्रोटीन मिळवण्यासाठी काय करावे?

चिकन, मटण, अंडी किंवा मासे यांसारखे मांसाहारी पदार्थ हे प्रोटीनचे उत्तम स्रोत आहेत, असे अनेकदा तुम्ही ऐकले आणि वाचले असेल. हे खरे आहेच पण काही शाकाहारी पदार्थांमध्ये प्रोटीन चांगल्या प्रमाणात आढळतात. असे सद्गुरु जग्गी वासुदेव यांचे म्हणणे आहे. त्यांनी सांगितले की, चला तर सद्गुरुंच्या मते, कोणत्या शाकाहारी पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन आढळतात ते जाणून घेऊया.

रोज शरीराला किती प्रोटीनची गरज असते?

सगळ्यात आधी हे समजून घेणे गरजेचे आहे की शरीराला किती प्रोटीनची आवश्यकता आहे. प्रोटीनची गरज की प्रत्येक व्यक्ती आणि त्याच्या शरीरयष्टीनुसार वेगळी असू शकते.

१) वयस्कर पुरुषांनी रोज ५०-६० ग्राम प्रोटीन खाण्याची गरज आहे.

२) वयस्कर महिलांची प्रोटीनची गरज जवळपास ४५-५५ ग्रॅम असू शकते.

३) जर तुम्ही जास्त फिजीकल अॅक्टिव्हिटीज करत असाल तर तु्म्हाला प्रोटीनची आवश्यकता जास्त असू शकते.

सद्गुरु सांगतात प्रोटीन मिळवण्यासाठी कोणत्या गोष्टी खाव्या ते

सद्गुरु सांगतात की, नॉनव्हेज मधून जास्त प्रमाणात प्रोटीन मिळते. हे खरंच आहे. पण शाकाहारी पदार्थांमधूनही प्रोटीन मिळतं. भारतासारख्या देशात कित्येक वर्षांपासून शाकाहारी लोक दाळी आणि फळे खातात. ज्यातून त्यांना भरपूर प्रमाणात प्रोटीन मिळते.

जर तुम्ही नॉन व्हेज खात नसाल तर बीन्सचे सेवन वाढवा. यात भरपूर प्रमाणात प्रोटीन असते. बीन्सचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. ते अधिक खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कमी करण्यास, ब्लड शुगर कमी करण्यास आणि शरीरात हेल्दी बॅक्टेरिया वाढवण्यास मदत होऊ शकते. याचे उत्तम स्त्रोत आहेत, वाटाणे, राजमा, काळे चणे, सोयाबीन, पिंटो बीन्स, नेवी बीन्स आणि पीनट्स. (Health)

वाटाणे

हिरवे वाटाणे हे प्लान्ट बेस्ड प्रोटीनच्या सर्वोत्तम स्त्रोतांपैकी एक आहे. तुम्ही वाटाणे भाजी, कोशिंबीर, चाट या स्वरूपात खाऊ शकता. हिरव्या वाटाण्यांत सामान्यतः 20-25% प्रोटीन असतात. एक कप वाटाण्यांत सुमारे 10 ग्रॅम प्रोटीन असतात.

दाळी

दाळींमध्ये भरपूर प्रमाणात मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स असतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही दाळीचं सेवन रोज करू शकतात. मसूर, मूग, चणा दाळ आणि हरभऱ्याच्या दाळी प्रोटीनव्यतिरिक्त फायबर, लोह आणि कॅल्शियमसारखे पोषक तत्व असतात. अर्धा कप शिजलेल्या दाळीत १४० कॅलरी आणि १२ ग्राम प्रोटीन असतात. (Protein)

डिस्क्लेमर - वरील लेख सामान्य माहितीवर आधारित असून सकाळ समुह याची पुष्टी करत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Press Conference: 'एक है तो सेफ है' राहुल गांधींनी उघडली तिजोरी अन् निघाला अदानी-मोदींचा फोटो, Video Viral

Latest Maharashtra News Updates : नाशिकमधील रेडीसन ब्लू हॉटेलवर निवडणूक आयोगाची कारवाई

ऋषभ पंतसारखाच आणखी एका क्रिकेटपटूचा भीषण अपघात; गाडीचा झालाय चुराडा...

भावासाठी उदयनराजे मैदानात! 'झुकेगा नही साला' म्हणत, कॉलर उडवत शिवेंद्रराजेंना मताधिक्‍याने विजयी करण्याचं केलं आवाहन

Nawab Malik : मतदानाच्या एक दिवस आधीच नवाब मलिक यांचे 'एक्स' अकाऊंट हॅक

SCROLL FOR NEXT