आज अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) ५६ वा वाढदिवस. जगभरातून त्याला शुभेच्छा येत आहेत. सोशल मीडियावर देखील शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. काल(ता.२६) पनवेलच्या फार्महाऊसवर सलमानला विषारी सापाने चावले. तब्बल सहा तासांच्या उपचारानंतर त्याला डिस्चार्च देण्यात आला असून, त्याची तब्येत बरी आहे. सलमान खान ५६ वर्षाचा झाला असला तरी त्याच्या फिटनेसनवर चाहते फिदा आहेत. सलमान कोणत्या ट्रिक्स वापरतो. त्याचे फिटनेसचे रहस्य काय आहे हे सलमानचा फिटनेस ट्रेनर राकेश उदियार (Rakesh Udiyar)याने सांगितलेली माहिती आज जाणून घेणार आहोत.
अमित साध, विक्की कौशल, आमिर खान, दीया मिर्जा, अरबाज खान, कुणाल कपूर, फातिमा सना शेख अशा सेलेब्रेशनना गेली १६ वर्षापासून राकेश उडियार ट्रेनिंग देत आहे. या सोळा वर्षाच्या ट्रेनिंगमध्ये त्याला सलमानसारखे व्यायामात सातत्य आजपर्यत पाहिले नसल्याचे राकेशने सांगितले. एक विद्यार्थी म्हणून सलमान खूप सपोर्टिव्ह आहे. बऱ्याचदा सलमान स्वत: एक्सरसाइज संदर्भात संपर्क करून माहिती घेतो. असे ही त्याने सांगितले.
राकेश ने सांगितले ,सलमान खान एक्सरसाइज रुटीनमध्ये खूप स्ट्रिक्ट आहे. त्याच्या फिटनेसचे रहस्य म्हणजे त्याचे असणारे सातत्य. तो नियमित व्यायाम करतोच. जरी जिममधे राकेशला यायला वेळ झाला तरी,सलमान व्यायाम सुरु करतो. ज्या-ज्यावेळी शुटिंग नसेल त्यावेळी तो व्यायाम करतोच. तो कधीही एक्सरसाइज मिस करत नाही हेच त्याच्या फिटनेसचे रहस्य आहे.
सलमान हेवी लिफ्टच्या तुलनेत व्हॅाल्यूम ट्रेनिंगला प्राधान्य देतो. वजन उचलण्यापेक्षा जास्त रिपीटेश ट्रेनिंग करायला त्याला आवडते. यामुळे शरीरावर अधिक ताण न पडता बाॅडी मेंन्टन आणि फिट राहण्यास मदत होते. वेट ट्रेनिंगमध्ये सलमान एका सेटमध्ये २० रेप्स..... करतो. याशिवाय सलमान आठवड्यातून ६ दिवस व्यायाम करतो आणि रविवारी रेस्ट घेतो. तो वर्कआऊट दोन पार्टमध्ये करतो. जसं की, चेस्ट-ट्राइसेप्स, बैक-बाइसेप्स, शोल्डर-एब्स, आणि लेग्स. सलमान स्लो कार्डिओ देखील करतो.
सलमान कोणतेही डायट करत नाही. तो सर्व पदार्थ खातो. पण खात असताना त्याला कोणत्या वेळी काय खावे हे समजते. तो कोणतेही पदार्थ प्रमाणात खातो. शिवाय लो कार्ब डायटचा आहारात समावेश करतो. तो दिवसाला ५ ते ६ मील घेतो. त्याच्या आहारात चिकन, अंडी, भात, मसूर, काजू, हिरव्या पालेभाज्या, प्रोटीन शेक याचा समावेश असतो.
टिप्स- वर्कआऊट करण्यापूर्वी प्री- वर्कआऊट आहार घेतला पाहिजे. तर वर्कआऊट नंतर आहार घेण्यास विसरू नका.
सलमान खान वर्कआऊट करत असताना कधीही डिमोटिव्ह होत नाही. तो नेहमी आनंदी असतो. व्यायाम करत असताना हेल्दी वातावरण ठेवतो. या बेसिक गोष्टीकडे तो जाणीवपूर्वक लक्ष देतो. या टिप्स फाॅलो करून तुम्ही देखील सलमान सारखे हिट- फिट राहू शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.