Balon par Jyotish Tips: एखाद्या वेळेस समजा तुम्हाला न हितगुज करता कुणाचा स्वभाव जाणून घ्यायचा असेल तर तुम्ही त्या व्यक्तीच्या डोक्याच्या केसावरूनच त्याच्या स्वभावाचे रहस्य जाणून घेऊ शकता.आपल्या अवतीभोवतीच्या वेगवेगळ्या लोकांचा स्वभाव हा अगदी वेगवेगळ्या पध्दतीचा असतो ही गोष्ट तुम्ही अनुभवलेलीच असेल. अगदी साध जरी उदाहरण घेतलं तर आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची विचारसरणी कधीच सारखी नसते, कुणी रागट असतं तर कुणी खूप प्रेमळ असतं थोडक्यात व्यक्ती तितक्या प्रकारचे स्वभाव आपल्याला पाहायला मिळतात. आजच्या लेखात आपण सामुद्रिक शास्त्रानुसार आपल्या अवतीभवती असणाऱ्या व्यक्तीचे स्वभाव आणि त्यांची वागणूक जाणून घेण्याचा एक सरळ साधा उत्तम मार्ग पाहणार आहोत.
भारतीय तत्त्वज्ञानात ज्योतिषशास्त्राच्या अनेक शास्र आहेत. त्यातील एक मुख्य शास्र म्हणजे सामुद्रिक शास्त्र. या शास्त्रात असे म्हटले आहे की, एखाद्या व्यक्तीचे शरीरकाठी पाहून त्याचा स्वभाव, गुण आणि भविष्य जाणून घेता येते. सामुद्रिक शास्त्रानुसार, तुम्ही एखाद्या व्यक्तीचे केस पाहूनच त्या व्यक्तीच्या स्वभावाचा अंदाज लावू शकता.
● कुरळे केस असलेले व्यक्तीचा स्वभाव नेमका कसा असतो?
सामुद्रिक शास्त्रानुसार ज्या लोकांचे केस कुरळे असतात ते आपल्या कामाच्या बाबतीत खूप गंभीर आणि सर्जनशील असतात असे मानले जाते. कुरळे केस असलेले लोक आपपल्यावर सोपवलेली जबाबदारी ही पूर्ण समर्पण भावनेने आणि सचोटीने पार पाडतात. मेहनत ही कुरळे केस असलेल्या लोकांची खासियत आहे आणि त्या जोरावर ते जातील त्या क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवत असतात.
● मऊ केस असलेल्या व्यक्तीमध्ये नेमके कोणते गुण असतात ?
सामुद्रिक शास्त्रानुसार मुऊ आणि गुळगुळीत केस असलेल्या लोकांमध्ये नेतृत्वगुण मोठ्या प्रमाणात असतात. मऊ केस असलेले लोक आपल्या गोड स्वभावाचा पुरेपुर उपयोग करून इतरांवर फार लवकर प्रभाव टाकतात. सामुद्रिक शास्त्रानुसार मऊ केस असलेले लोक जीवनात खूप सुख आणि समृद्धी मिळवतात आणि समाजात आपल्या कार्याच्या जोरावर प्रसिद्धी मिळवतात.
● पातळ केस असलेल्या व्यक्ती खरचं दयाळू असतात का ?
सामुद्रिक शास्त्रात असे म्हटले आहे की ज्यांचे केस पातळ असतात ते स्वभावाने दयाळू आणि प्रेमळ असतात. असे लोक स्वभावाने सर्जनशील असतात आणि प्रत्येक गोष्टीत काहीतरी नवीन शोधण्यात त्यांचा सदैव प्रयत्न असतो. तसेच पातळ केस असलेले लोक आपल्या मोकळ्या स्वभावामुळे ते न डगमगता सर्व काही सत्य इतरांसमोर मांडायला सदैव तयार असतात.
● सरळ केस असलेले व्यक्ती आयुष्यात प्रत्येक गोष्ट ही अत्यंत हुशारीने करतात.
ज्या व्यक्तीचे केस सुतासारखे सरळ असतात, ती प्रत्येक गोष्ट अतिशय हुशारीने करत असते. त्यांना आयुष्यात कोणतेही काम मिळाले की ते त्या कामाचा सर्व दृष्टीने अत्यंत तंतोतंत बारीक विचार करून मगच निर्णय घेऊन ते काम सुरू करतात. असे लोक कोणत्याही प्रकारची जबाबदारी घेण्यास कधीच नकार देत नाही.
● सोनेरी केसांच्या व्यक्ती शांतता प्रिय असतात.
सामुद्रिक शास्त्रानुसार सोनेरी केस असलेले लोक शांतता प्रिय वातावरण आवडणारे आणि. हुशार मानले जातात. असे लोक आयुष्यात नेहमी आपल्या कुटुंबाला प्राधान्य देतात. खास करून अशा लोकांना कला आणि साहित्यात खूप रस असतो. त्यांच्यात आत्मविश्वासाची कमतरता आहे पण ते त्यांच्या कामात तरबेज आहेत.
काळेभोर केस असलेल्या व्यक्ती अत्यंत शिस्तप्रिय असतात.
ज्या लोकांचे केस काळे असतात ते शिस्तीच्या बाबतीत खूप ठाम मानले जातात. अशा लोकांनी एकदा का कामाची जबाबदारी घेतली की ते पूर्ण करूनच दम घेतात. ते त्यांच्या जीवनातील सौंदर्य आणि प्रामाणिकपणाकडे आकर्षित होतात. ते इतर लोकांना खूप आदर देतात आणि त्या बदल्यात त्यांच्याकडून चांगल्या आदराची अपेक्षा करतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.