Sandalwood Oil Benefits esakal
लाइफस्टाइल

Sandalwood Oil Benefits: निस्तेज त्वचा, खड्डे, डाग आणि बरंच काही; चेहरा मोत्यासारखा चमकवेल चंदनाचे तेल

चंदनामुळे ताणतणावही नाहीसा होतो

Pooja Karande-Kadam

Face Care Tips : झपाट्याने बदलत असलेल्या लाइफस्टाइलमुळे आपल्या शरीराला जास्त त्रास सहन करावा लागत आहे. कधी लोकांना वेट लॉस करायचं असतं त्यावेळ ते डायटमध्ये पचायला हलके पदार्थ खातात. वजन कमी झालं की पुन्हा ते आवडीचे पदार्थ खातात. त्यामूळे त्याचा आपल्या शरीरावर आणि त्वचेवर वाईट परिणाम होतो.

जास्त प्रमाणात फास्ट फूड खाणे आणि व्यायामाचा अभाव यामुळेही आपल्या शरीरात स्थुलता येते. त्यामुळेही चेहऱ्याची चमक नाहीशी होते. निस्तेज चेहऱ्यावर डाग आणि खड्डे गर्दी करतात. त्यावर आणखी कॉस्मेटीक्स आणि मेकअपचा भडीमार करून चेहरा अधिकच खराब होतो.

तुम्हीही अशा चेहऱ्याला अन् त्यावर केलेल्या प्रयोगाला कंटाळला असाल तर तुमच्यासाठी आज एक फायद्याची गोष्ट सांगतो. चेहऱ्याला वेगवेगळ्या कॉस्मेटीक्सपेक्षा जे नैसर्गिक आहे ते लावले तर त्याला इफेक्ट थेट अन् जास्त वेळासाठी होतो. (Sandalwood Oil Benefits: The glow and brightness of the face has been snatched, then try sandalwood oil then see the difference)

अनेक वर्षांपासून त्वचा, केस आणि आरोग्याशी संबंधित समस्या चंदन आणि त्याचे तेल वापरले जात आहे. चंदनाचे तेल चंदनाच्या झाडापासून मिळते. चंदनाचे झाड त्याच्या अद्वितीय लाकडासाठी आणि गोड सुगंधासाठी प्रसिद्ध आहे.

चंदनाचं झाड जितकं जून असेल तितकं त्यांचे तेल चांगल्या क्वालिटीचे मानले जाते. चंदनाच्या तेलामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. त्यामुळे सौंदर्यप्रसाधनांमध्ये त्याचा विशेष वापर केला जात आहे. चला जाणून घेऊया त्वचेला चंदनाच्या तेलाचे असेच काही फायदे. (Sandalwood Benefits)

मॉइश्चरायझिंग करते

चंदन तेल हे एक उत्तम नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे, जे त्वचेला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. कोरड्या किंवा निर्जलित त्वचेसाठी हे विशेषतः फायदेशीर आहे. त्याच्या वापराने त्वचा मऊ आणि गुळगुळीत राहते.

दाहक-विरोधी

चंदनाच्या तेलामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात जे लालसरपणा, सूज आणि चिडचिड कमी करण्यास मदत करतात. ते अनेकदा वापरा

बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करते

चंदनाच्या तेलामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि बुरशीविरोधी गुणधर्म असतात, जे मुरुमांवर उपचार करण्यासाठी आणि त्वचेवर हानिकारक जीवाणूंची वाढ रोखण्यासाठी प्रभावी ठरू शकतात.

त्वचेवरील खड्डे कमी करते

चंदनाच्या तेलाचे तुरट गुणधर्म त्वचेची मजबूती टिकवून ठेवण्यास आणि छिद्र कमी करण्यास मदत करतात. तेलकट किंवा कॉम्बिनेशन स्किन असलेल्या लोकांसाठी हे तेल खूप फायदेशीर आहे.(Skin Care Tips)

नेहमी तरूण ठेवते

चंदनाचे तेल अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध आहे, ते मुक्त रॅडिकल्सचा सामना करण्यास मदत करते ज्यामुळे त्वचा अकाली वृद्धत्व होते. चंदनाचे तेल बारीक रेषा आणि सुरकुत्या हाताळण्यासाठी देखील उपयुक्त आहे.

त्वचेची चमक वाढवते

चेहरा उजळ व्हावा, गोरा व्हावा म्हणून आजकाल पार्लरमध्येही अतोनात खर्च केला जातो. पण तरीही थोड्या दिवसांपूरतं उसनं मागितल्यासारखं सौंदर्य आपल्या वाट्याला येतं. जर तुम्हाला नॅचरल ब्युटी हवी असेल तर तुम्ही चंदनाचे तेल चेहऱ्याला लावावे. चंदनाच्या तेलाचा नियमित वापर केल्याने त्वचेचा रंग सुधारतो. त्वचा तेजस्वी दिसते.

डाग दूर करा

चेहऱ्यावर असलेले डाग घालवण्यासाठी कोणत्याही औषधांपेक्षाही चंदनाचे तेल जास्त फायदेशीर ठरेल. चंदनाच्या तेलाचे औषधी गुणधर्म त्वचेवरील डाग आणि काळे डाग दूर करण्यासाठी देखील खूप प्रभावी आहेत.

ऍलर्जी घालवते

वातावरणातील बदलामुळे सतत ऍलर्जीचा त्रास होणं हे सामान्य समस्या बनली आहे. अशावेळी त्वचेवर चंदनाचे तेल एक्जिमा आणि सोरायसिस सारख्या त्वचेशी संबंधित अनेक समस्यांपासून आराम देते. लहान मुलांच्या अंगावर उठलेले रॅशेज सुद्धा यामुळे कमी होतात. (Face care tips)

सनबर्नपासून आराम

चंदनाच्या तेलातील थंड आणि दाहक-विरोधी गुणधर्म देखील सूर्यप्रकाशाच्या त्वचेपासून आराम देण्यासाठी खूप प्रभावी आहेत. तुम्हाला उन्हाळ्याच्या दिवसात होणाऱ्या घामोळ्या, रॅशेज यावरही चंदनाचे तेल गुणकारी आहे.

आरामदायी अरोमाथेरपी

त्वचेला अनेक फायदे देण्यासोबतच, चंदनाच्या तेलाचा सुगंध तणाव कमी करण्यासाठी आणि मनाला आराम देण्यासाठी देखील अत्यंत प्रभावी आहे. चंदनामुळे ताणतणावही नाहीसा होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati : 'बसप' इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक का लढवत नाही? मायावतींनी सांगितले 'हे' कारण

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींच्या नागपूरमधील रॅलीत मोठा राडा, काॅंग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले अन्....

"Fake Narrative फार काळ टिकत नाही"; पंतप्रधान मोदींनी केलं विक्रांत मेस्सीच्या द साबरमती रिपोर्टचं कौतुक

Latest Maharashtra News Updates live : महाराष्ट्रात चोरांचे सरकार,मल्लिकार्जुन खर्गेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT