लाइफस्टाइल

तुमचा पार्टनर Sapiosexual आहे का? कसे ओळखाल

बुद्धीमान लोकांशी संबंध ठेवणे काही लोकांना आवडते

सकाळ डिजिटल टीम

मानवी मेंदू हा सर्वात आकर्षक आहे, असे कधी तुम्हाला तुमच्या जोडीदाराने सांगितले आहे का? जर असे खरेच झाले असेल तर तुम्ही सोपिओसेक्शुअलशी डेट करत आहात.
बुद्धीमान लोकांच्या गरजा वेगळ्या असतात. त्यांची आवड, रूची, जगण्याची शैली सर्वसामान्य लोकांपेक्षा खास असते. त्यांना विवेकपूर्ण संभाषण करणे आवडते. किंबहुना त्यांची लैंगिक गरजही तशीच वैचारिक पद्दतीने भागवली जावी, अशी त्यांची इच्छा असते. आपल्या धाटणीशी मिळताजुळता पार्टनर ते शोधत असतात. अशा लोकांना सेपिओसेक्शुअल म्हणता येईल.

म्हणजे एखाद्याला आपल्या पार्टनरबरोबर बीच सेल्फी घेण्यापेक्षा त्याचे बुकशेल्फ बघण्यात जास्त रस असतो. अशा प्रकारच्या व्यकी सेपिओसेक्शुअल असू शकतात. या व्यक्ती आपल्या शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी समोरच्याची बुद्धीमत्ता आणि मन पाहून लैंगिकदृष्ट्या आकर्षिले जातात, अशी सेपिओसेक्शुलिटी पर्सनालिटीची व्याख्या करता येऊ शकते. सेपियन्स हा शब्द शहाणा आणि विवेकी अशा दोन शब्दांचा संयोग आहे. तसेच त्यात लैंगिक हा शब्दही येतो.

सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास तुमची बुद्धीमत्ता पाहूनच समोरच्या व्यक्तीला तुमच्याविषशी लैंगिक आणि मानसिकदृष्ट्या आकर्षण वाटते. सेपिओसेक्शुअल्स स्मार्टनेस आणि तीक्ष्ण निरीक्षण, विचारशक्ती पाहून उत्तेजित होतात. म्हणजेच जर तुम्हाला बुद्धीमत्ता पाहून लैंगिकदृष्ट्या एखाद्याविषयी आकर्षण आणि उत्तेजक वाटत असेल तर तुम्ही सेपिओसेक्शुल आहात, असे तुम्हाला गृहित धरता येईल. जर समोरची व्यक्ती तुमच्याइतकीच बुद्धीमान असेल तर तुम्ही त्या व्यक्तीला डेटही करू शकता.

सेपिओसेक्शुअल्समध्ये आपल्या रोमेंटिक पार्टनरकडे फक्त उच्च बौद्धिक क्षमता असावी, एवढेच अपेक्षित नसते तर प्लॅटोनिक नातेसंबंध आणि मैत्रीलाही हे लोकं समान पसंती देतात. त्यांच्या ग्रुपमध्ये अत्यंत हुशार लोकही असतात. त्यामुळे याकडे तुम्ही कसे बघता यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात.अशा व्यक्तींना जाणून घेण्याचे विविध मार्ग आहेत.

क्षुल्लक संभाषणात रस नसतो - काही लोकं वरवर बोलण्यातच जास्त वेळ घालवता. तर कहींना रोजच्या समस्यांवर आपल्या पार्टनरशी बोलून मोकळे व्हायला आवडते. पण हेच संभाषण सेपिओसेक्शुअल्स लोकांना अत्यंत कंटाळवाणे वाटते. उलट त्यांना स्मार्ट आणि सखोल संभाषण करण्यावर त्यांचा भर असतो. म्हणजेच जर एखाद्या गोष्टीविषयी विश्लेषणपूर्ण आणि अगदी सखोल चर्चा करण्यास तुम्हाला प्रोत्साहन मिळत असेल,. तर समजून जा की तुम्ही अशा व्यक्तीला डेट करताय.

स्मार्टनेसचे आकर्षण- तुम्ही डेटवर गेल्यावर समोरची व्यक्ती तुमच्या यशाबद्दल किंवा तुमच्या संभाषणादरम्यान तुम्ही चर्चा केलेल्या मुद्यांवर तुमचे कौतुक करतो का? तुम्ही समस्या सोडविण्याबाबत जो विचार करता तो त्याला आवडतो, अशी ती व्यक्ती म्हणते का? जर असे खरेच असेल तर इतर कुठल्याही गोष्टींपेक्षा ती व्यक्ती तुमच्या बुद्धीमत्तेकडे अधिक आकर्षित झाली आहे, असे समजावे.

ग्रेट कम्युनिकेटर- सेपिओसेक्शुअल लोक संवाद उत्कृष्ट साधू शकतात. त्यामुळे प्रभावी संभाषण करणाऱया साथीदाराचा शोध ते घेतात. ते कबूल करतात कि सोशल मिडियावर मजकूरात जर टायपो एरर किंवा व्याकरणाच्या चुका अससलेल्या रॅम्बलिंग मजकुराचा तिरस्कार करतात.

डिबेटींग आवडीचे- सेपिओसेक्शुअल लोक खाद्या व्यक्तीने वादविवादाला आव्हान दिल्यावर त्याच्याकडे अधिक खोलवर आकर्षिले जातात. अशा व्यक्तींशी प्रतिवाद करायला ते उत्सुक असतात. त्यांच्याशी वाद घालून ते त्याच्या क्षमतेची परीक्षा बघतात. त्यांना स्मार्ट संभाषण करणे आवडते.

सतत शिकण्यासाठी प्रयत्नशील- सेपिओसेक्सुअल्स लोकांना मनाचा विस्तार करणारी कोणतीही गोष्ट आवडते आणि त्यांना नव्या गोष्टी शिकण्याची इच्छाही जबरदस्त असते. आपली वैचारिक वाढ व्हावी यासाठी ते कायम प्रयत्नशील असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघात कोणी घेतली आघाडी ? भाजप विरुद्ध शरद पवार गटात थेट लढत

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळमध्ये सुनील शेळके यांची दणदणीत आघाडी

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT