Saving Tips esakal
लाइफस्टाइल

Saving Tips : मैत्रिणींनो, घर खर्चाला पैसे संपवू नका, या सोप्या टिप्सने करा हजारोंची Saving

बचत करण्यासाठी प्रत्येक महिलेने या टिप्सची मदत घ्यावी

Pooja Karande-Kadam

Saving Tips : योग्य प्रकारे पैसे वाचवले की भविष्यासाठी कामास येतात. आपल्या स्वत:ला पैसे वाचवण्याची सवय तर हवीच सोबत कुटुंबातील इतर सदस्यांना ही सवय लावावी. योग्य तिथे खर्च करावा आणि योग्य तिथे पैसे वाचवावे.

घरातील मुलांनाही लहानपणापासूनच फालतू खर्च आणि बचत याबद्दल स्पष्टीकरण द्यावे. पैशांची बचत केल्यास भविष्‍यात अडचणींना सामोरे जाण्यापासून वाचता येऊ शकतं.

बचत करण्यासाठी प्रत्येक महिलेने या टिप्सची मदत घ्यावी. पैसे वाचवण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला याबद्दलच्या काही टिप्स सांगणार आहे. (Saving Tips : Money saving tips for housewives)

बचत ही आजच्या काळाची गरज आहे पण घरखर्चानंतर पैसे वाचवणे थोडे कठीण होऊन बसते. मुलांची फी, खाण्यापिण्याच्या वस्तू आणि घराशी निगडीत छोट्या-छोट्या गोष्टींसाठी खूप खर्च करावा लागतो. मात्र, काही गोष्टींची काळजी घेऊन आपण बचत करू शकतो. (Saving Tips)

स्वयंपाकातूनही वाचवा पैसे

स्वयंपाक करताना लक्षात ठेवा जर तुम्ही तुमचा प्रत्येक महिन्याचा खर्च पाहिला तर लक्षात येईल की स्वयंपाकघरातील डाळी ते मसाले खरेदी करण्यासाठी खूप खर्च करावा लागतो.  

अशा परिस्थितीत, आपण सामग्रीचा योग्य वापर करणे आवश्यक आहे, उदाहरणार्थ, जर आपण मसूरची भाजी करणार असाल तर त्यापूर्वी किती लोक मसूर खाणार आहेत याचा विचार करा. असे केल्याने कडधान्य कधीही जास्त होणार नाही आणि तुम्हाला अन्न फेकून द्यावे लागणार नाही. (Saving)

कोणती भाजी किंवा कडधान्य जास्त झाली असेल तर ती फेकून देण्याऐवजी इतर मार्गाने खाण्याचा प्रयत्न करा. उदाहरणार्थ, उरलेल्या भाजीत पीठ मळून तुम्ही पराठे बनवू शकता.

थोड्या-थोड्या वेळाने बचत करा

सामान्य लोकांसाठी एकाच वेळी खूप पैसे वाचवणे अवघड आहे पण थोडे थोडे वाचवणे सोपे आहे. जर तुम्ही 50 रुपये 1 महिना सतत वाचवले तर काही महिन्यानंतर ते 1.5 हजार होतील. चतीसोबतच पैसे बँक आणि पोस्ट ऑफिसमध्ये जमा करा जेणेकरून तुम्हाला व्याज मिळेल.

उदाहरणार्थ, मसाल्यांचे छोटे पॅकेट खरेदी करण्यासाठी तुम्हाला जास्त खर्च करावा लागेल. दुसरीकडे, जर तुम्ही वस्तू एकत्र खरेदी केल्यात, तर तुम्हाला काही टक्के सूट मिळते. आजकाल अनेक शोरूममध्ये एक वस्तू खरेदी केल्यावर दुसरी मोफत मिळते. अशा परिस्थितीत, आपण अशा सामग्री मिळवून पैसे वाचवू शकता. या सर्व गोष्टींसोबत हेही लक्षात ठेवा की जास्त सामान घेऊ नका.

गरज नसलेल्या वस्तूंची खरेदी थांबवावी

अनेकदा मॉल किंवा मार्केटमध्ये गेल्यावर आपण अनावश्यक वस्तू खरेदी करतो, एकीकडे यामुळे फालतू खर्च होतो, तर दुसरीकडे अशा सवयी वाईट असतात. अशा परिस्थितीत जेव्हा मुले एखाद्या गोष्टीबद्दल खूप हट्ट करत असले किंवा आपलं ही मन उगाचच नको त्या वस्तूंकडे जात असेल तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करण्यात काही गैर नाही. 

रोज 10 रुपये गल्ल्यामध्ये टाका

तुम्ही सेविंगसाठी दररोज दहा रुपये गल्ल्यामध्ये टाकू शकता. वर्षाच्या अखेरीला हे पैसे इमरजेंसी फंड म्हणून तुम्हाला कामी येतील. तुम्ही यापेक्षा जास्त पैसे वाचवू शकत असाल तर वाचवा. यामुळे तुम्ही जास्त सेविंग करु शकता आणि तुमचे फायनेंशियल स्टेटस देखील सुधारेल.

पैसे वाचवण्याची सवयीचा इतरांना द्या सल्ला

सर्वांना पैशाचे महत्त्व जाणून घेणे खूप गरजेचे आहे. त्यामुळेच तुम्ही प्रत्येकाला पैसे वाचवण्याबद्दल माहिती द्या.

कुटुंबातील सर्वांना समजावून सांगा की तुम्ही जे पैसे कमवत आहात ते फक्त सर्वांच्या भविष्यासाठी आहे. हे पैसे मिळवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे हुशारीने आणि योग्य ठिकाणीच खर्च केले पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: माहीम मतदारसंघात चोख सुरक्षा व्यवस्था

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT