Sawan Vrat Food News श्रावण महिन्यातील उपवास हे भाविकांसाठी एक महत्त्वाचा उत्सव असतो. यावेळेस भक्तगण देवीदेवतांची आराधना करून उपवासही करतात. आध्यात्मिक साधना करून देवीदेवतांचे आशीर्वादही घेतात. श्रावणातील उपवास करण्यास धार्मिक महत्त्व लाभलेच आहेच.
पण याव्यतिरिक्त श्रावणातील उपवासाच्या निमित्ताने आपल्याकडे शरीर डिटॉक्स करण्याचीही मोठी संधी असते. या उत्सवामुळे आपणास शारीरिक व मानसिक आरोग्यासही अनेक लाभ मिळतात. तर मित्रांनो आपणही श्रावणातील उपवास करत असाल तर आहारामध्ये आरोग्यास लाभदायी असणाऱ्या पेयांचा समावेश करावा. ज्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होणार नाही, असा सल्ला आहारतज्ज्ञांकडून दिला जातो.
याव्यतिरिक्त आपण कलिंगड, काकडी आणि संत्रे यांसारख्या फळांचाही समावेश करू शकता. कारण यामध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते. महत्त्वाचे म्हणजे उपवासादरम्यान कॅफिन आणि साखरयुक्त पेय टाळावेत. कारण शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. परिणाम थकवा अधिक जाणवू शकतो.
तसे पाहायला गेले तर उपवासाकरिता आपण वेगवेगळ्या फळांचा ज्युसही पिऊ शकता. ज्यामुळे शरीर निरोगी व हायड्रेट राहते. पण ‘नारळाचे पाणी’ हे एक लोकप्रिय पेय आहे. यामुळे शरीराला इलेक्ट्रोलाइट्सचा पुरवठा होतो आणि शरीर हायड्रेटही राहते.
याव्यतिरिक्त आपण फळांचा रस, हर्बल टी, साखर मिक्स न करता लिंबू पाणीही पिऊ शकते. या पेयांद्वारे शरीर हायड्रेट राहतेच शिवाय आवश्यक पोषक घटकांचा आणि अँटी-ऑक्सिडंट्सचा देखील शरीराला पुरवठा होतो.
उपवासादरम्यान थोड्याथोड्या अंतराने फराळेच सेवन करावे. शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढावी, याकरिता तज्ज्ञांचा सल्ला घेऊन आहारात सुफरफूड्सचा समावेश करावा.
फळांमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर, व्हिटॅमिन सी आणि पोटॅशिअम या पोषकघटकांचा साठा असतो. ज्यामुळे शरीरातील ऊर्जेची पातळी टिकून राहते.
शरीर हायड्रेट राहण्यासाठी व शरीराला पुरेशा प्रमाणात पोषकघटकांचा पुरवठा व्हावा याकरिता लस्सी, दूध आणि ताक यासारख्या दुग्धजन्य पदार्थांचाही आपण समावेश करू शकता.
उपवासादरम्यान दिवसभर उपाशी राहू नये. फळे आणि सुकामेव्याचे सेवन करावे.
पाककृती तयार करताना रॉक सॉल्ट किंवा सेंध मिठाचा वापर करावा.
साखरऐवजी गूळ वापरावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.