लाइफस्टाइल

शॅम्पूला म्हणा गुडबाय, ‘या’ Homemade Herbal Care वॉशने केस होतील काळेभोर, लांबसडक आणि चमकदार

Kirti Wadkar

केसांची काळजी घेत असताना आपण केस चमकदार आणि मऊ होण्यासाठी वेगवेगळ्या शॅम्पूचा वापर करतो. अलीकडे शॅम्पू Shampoo सोबतच कंडिशनरचाही वापर केला जातो. बाजारात असलेल्या या वेगवेगळ्या उत्पादनामुळे केसांना तात्पुरती चमक येते. Say No to Shampoo use traditional Products for hair care

मात्र कालांतराने या प्रोडक्ट्समधील केमिकल्सचा केसांवर Hair विपरीत परिणाम होतो. यामुळे केस निस्तेज आणि निर्जीव दिसू लागतात. तसंच केस गळणे Hairfall, केस कमी वयातच पांढरे होणं अशा वेगवेगळ्या समस्या यामुळे उद्भवतात. Homemade Herbal Hair Wash:

भारतात पूर्वी केस स्वच्छ राहण्यासाठी शिकाकाई आणि रिठ्याचा वापर केला जात असे. मात्र कालांतराने याची जागा साबणाने घेतली आणि त्यानंतर शॅम्पूने (Hair Wash Shampoo). त्यामुळेच पूर्वीच्या लोकांचे केस हे दीर्घकाळ दाट, लांब आणि काळभोर राहत.

मात्र शॅम्पूचा वापर सुरु झाल्यानंतर केसांच्या अनेक समस्या निर्माण होऊ लागल्या.  आजही आपण केस स्वच्छ धुण्यासाठी जर पुन्हा या पारंपरिक गोष्टींचा वापर सुरू केला तर केसांचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होऊ शकते. 

शिकाकाई आणि रिठाची हर्बल पावडर तयार करून या पावडरचा तुम्ही हेअर वॉश म्हणून उपयोग करू शकता. यामुळे केस नैसर्गिकरित्या स्वच्छ होऊन केसांमध्ये चमक येईल. तसंच केस गळणे देखील कमी होऊ शकते.

हर्बल हेयर वॉश पावडर साहित्य- हर्बल हेअर वॉश तयार करण्यासाठी चार चमचे शिकाकाई, दोन चमचे रीठा, दोन चमचे मेथी, एक चमचा कडूलिंबाची पानं घ्यावी. तसचं काही वाळलेली जास्वंदाची फूल घ्यावीत.

हे देखिल वाचा-

हर्बल हेअर वॉश पावडरची कृती- सर्व साहित्य चांगलं बारिक करून घ्यावं सर्व साहित्य वेगवेगळं बारिक करावं. एकत्रित करू नये. त्यानंतर सगळ्या जिन्नसांची पावडक एकत्र मिस्क करावी आणि एका हवा बंद बरणीत भरून ठेवावी. यासाठी तुम्ही बाजारात मिळणाऱ्या पावडरचा देखील उपयोग करू शकता. मात्र त्या शुद्ध असतील याची खात्री करून घ्यावी. 

हेअर वॉश कसं वापराल

गरजेनुसार पावडर एका वाटीत घ्यावी. त्यात थोडं पाणी टाकून जाड पेस्ट तयार करून घ्यावी. या पेस्टने केस आणि केसांच्या मुळांना हलक्या हाताने मसाज करावं. थोडा वेळ ही पेस्ट केसांना तशीच राहू द्यावी. त्यानंतर स्वच्छ पाण्याने केस धुवावेत  

हर्बल हेअर वॉशचे फायदे-

शिकेकाई- शिकेकाईमध्ये सॅपोनिन नावाचा घटक असतो त्यामुळे फेस निर्माण होते. शिकेकाईमुळे केस आणि स्कॅल्पला पोषण मिळतं. शिवाय शिकेकाईच्या वापरामुळे अकाली पांढऱ्या होणाऱ्या केसांवर नियंत्रण मिळवणं शक्य आहे. 

रीठा- रीठा हे एक नैसर्गिक हेअर क्लिंजर आहे. हे केसातील घाण आणि तेल स्वच्छ करण्यास मदत करतं. तसचं केसांच्या वाढीसाठी रीठा उपयुक्त आहे. रिठ्यामुळे केस काळे आणि मऊ होण्यासही मदत होते. 

कडूलिंब- कडूलिंबामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म असल्यामुळे केसातील कोंडा दूर होतो. शिवाय केस वाढीसाठी आणि केसांना नैसर्गिकरित्या काळे करण्यासाठी कडूलिंबाची मदत होते.

हे देखिल वाचा-

मेथी- मेथीमुळे केस गळणं थांबतं. यामुळे निस्तेज केसांना पोषण मिळण्यास मदत होते. मेथीमधील निकोटिनिक ऍसिड केसांसाठी फायदेशीर आहे. यामुळे केस गळणं थांबण्यासोबत केसांच्या वाढीसाठी मदत होते. केस चमकदार होतात.

जास्वंद- हिबिस्कक म्हणजेच जास्वंदीच्या फुलांमध्ये अमीनो ऍसिड असतं. यामुळे केसांना कंडीशनिंग होतो. त्यामुळेच या हर्बल हेअर वॉशने केस धुतल्यानंतर तुम्हाला पुन्हा कंडीशनर वापरण्याची गरज भासणार नाही. 

आठवड्यातून दोन वेळा या हर्बल हेअर वॉशचा वापर केल्यास तुम्हाला काही दिवसांमध्येच फरक जाणवेल. या हेअर वॉशच्या वापरामुळे तुमच्या केसांच्या अनेक समस्या दूर होतील. यामुळे केस गळणं थांबेल तसचं केस दाट आणि चमकदार होतील. अकाली पांढरे केस होण्याच्या समस्येवरदेखील हा हेअर वॉश उपयुक्त ठरेल. 

त्यामुळे तुमच्या केमिकलयुक्त शॅम्पू ऐवजी आता घरातच तयार करा नैसर्गिक गुणांनी परिपूर्ण असलेली ही हर्बल हेअर वॉश पावडर. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT